उदाहरणालंकार - लक्षण ३
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
आतां, ह्या अलंकाराच्या वाक्याचा शाब्दबोध सांगतों ( उदाहरणार्थ )
या अलंकाराचें उदाहरण म्हणून आलेल्या अमितगुण० इत्यादि श्लोकाच्या वाक्याचा शाब्दबोध, क्तियेला प्रधान मानणार्या व आख्याताला गौण मानणार्या वैयाकरणांच्या मतें खालीलप्रमाणें होतो:-
असंख गुणांनीं युक्त पदार्थ हा या शाब्दबोधांतील कर्ता, ह्या कर्त्याचें एका दोषामुळें ( ही ) निंदेचा विषय होणें हा येथील अवयवी; सर्व औषधांचा राजा जो लसूण त्याचें, एका उग्र गंधामुळें निंदेचें विषय होणें, हा ( वरील अवयवीचा ) अवयव. आतां प्रथमांत कर्ता हा विशेष्य व आख्यातार्थ हें त्याचें विशेषण ( असतें ) असें मानणार्या नैयायिकांच्या मतें प्रस्तुत श्लोकांतील वाक्यार्थाचा शाब्दबोध असा-
उग्र गंधामुळें निंदेला विषय होणें हें या वाक्यांत विशेषण; व त्या विशेषणाचा आश्रय जो लसूण तो शाब्दबोधांत अवयव; आणि असंख्य गुणयुक्त पदार्थाचें, एका दोषामुळें ( ही ) जें निंदा विषय होणें त्याचा आश्रम हा या शाब्दबोधांतील अवयवी समजावा.
ह्या अलंकारांत, सामान्य आणि विशेष अशा दोन प्रकारच्या वाक्यार्थांपैकीं विशेषवाक्यार्थांमध्यें, क्तियेचा अन्वय ( क्तियेची पुनरावृत्ति करून ) व्हायलाच पाहिजे; कारण त्याशिवाय त्या विशेष वाक्यामध्यें असलेला जो विशेषरूप दुसरा हेतु त्याच्याशीं त्या क्तियेचा अन्वय जुळणार नाहीं.
याचप्रमाणें या अलंकारांत, ज्या ठिकाणीं यथा हा शब्द आलेला असेल, त्या ठिकाणीही, ( सामान्य व विशेष असलेल्या दोन वाक्यांच अन्वय व्हावा म्हणून क्तियापदाची द्विरुक्ति करावी लागते ). आतां ‘ उपकारमेव इत्यादि उदाहरण अलंकाराच्या अलंकाराच्या श्लोकांत, प्रथमार्धाचा वाक्यार्थ ( म्ह० शाब्दबोध ) असा-
प्रथम पहिल्या वाक्यांत, विपत्तींत सांपडलेला सद्गुणी मनुष्य ह्याला विशेष्य मानावा; व त्या विशेष्याचे, उपकाराला अनुकूल अशी कृति करणारा ’ हें विधेयविशेषण करावें. ह्या पूर्व वाक्यार्थाचा मूर्च्छित अथवा मृत पारा दृष्टांत असल्याने, हा उत्तरवाक्यार्थ पूर्ववाक्यार्थाचा एक-देश आहे; व ह्या उत्तरवाक्यार्थाचा पूर्ववाक्यार्थ गुण म्ह० गुणीभूत आहे,
असें काहींचें म्ह० नैयायिकांचें ’ मत. [ यांच्या मतें यांतील वाक्याचा विपत्तींत सांपडलेला सद्गुणी मनुष्य हा कर्ता, व तो कर्ता उपकार करणें ह्या क्तियेला अनुकूल अशी कृति करणारा ’ असा शाब्दबोध समजावा. ] आतां वैयाकरण मतानें विपद्नत सद्गुण ह्या कर्त्यानें केलेली पूर्ववाक्यांतील क्तिया ही मुख्य; म्ह० पूर्ववाक्यार्थ प्रधान, व उत्तर वाक्यार्थ हा त्याला गौण; अर्थात त्या उत्तरवाक्यार्थ्याचा एकदेश ही त्या पूर्ववाक्यार्थाला गौण-जसें घटं आनय ’ ह्यांतील घट हा जो अवयव त्याला नील हें विशेषण लावलें तरी सुद्धां तो नील हा पदार्थ आनय ह्या क्तियेचें घटाप्रमाणेंच कर्म होऊ शकतो.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP