कृष्णदासांची कविता - माबळभट चरित्र
श्री कृष्णदासांनी लिहीलेली काव्ये महानुभावीय स्वरूपाची आहेत.
श्रीकृष्णाय नम: ॥ शुक उवाच ॥
आइकै राया परिक्षिति । श्रीकृष्णाची ष्यांती । पुतना मारुनी निभ्रांती । सकळ वीचारी पडीले ॥१॥
ते सकळ पडले चिंतावनी । तंव रावो म्हने बुधि न सांधा रे कवनी । तया गोकुळा जाउनी । झडकरी ठाइ घाला ॥२॥
तंव भट म्हने राया विनंती परिंयेसी । रीठासुर देइ मजपासी ॥ मग मी काये करीन तयासी । तें परीयेसी राया ॥३॥
तवं रीठासुर उभा राहिला । तेनें वीडा घेतला । रीठागांठीमध्यें रीगला । मग भट नीगाला गोकुळांसी ॥४॥
मग तो गेला आपुलीया घरासी ॥ उपरवाइले बोभातो बाइलेसी । नवि प्रति देइ मजपांसी । मी जातो गोकुळासी म्हणौनिया ॥५॥
ते म्हने तुम्ही जाता गोकुळा । ते घृत देति सवे न्यावा नळा । तंव तो म्हणे पापिणी अमंगळा ॥ अपसव्ये काये बोलिली ॥६॥
मग तये अवेश्वरी । भट नीघाला झडकरी । सुर्योउदये नंदाचा घरी । आला गोकुळामाजी ॥७॥
मग भट बोलीला आसीरवचन । नंद दोघी कर जोडुन । भटासी केलें नमन । नंदराये ॥८॥
म्हणे गा नंदराया । देवो आले तुझीया ठाया ॥ मग नमस्कार करुनि येश्वदामाया । पुसे बाळकाचे नांव ॥९॥
तवं गर्गाचार्य बोलती । याचे बहुत रुपें असती । आणि नामें दीसती । सहस्त्रकोटी ॥१०॥
हा परब्रह्मअवतारु । करील दैत्यांचा संहारू । साधुसंता देउनि अभयेकरु । स्थापील हा ॥११॥
ऐसे सांगोनि गेला जाण । आणि गर्गाचार्य आपण । तव महाबळभट आले लवकरून । गोकुळासी ॥१२॥
तंव म्हणे नंदरावो परियेसी । करजोडुनी साष्टांग तुम्हासी ॥ मग चंदनाचा पाट तयासी । बैसावया दीधला ॥१३॥
तवं भट म्हणे मागो आलो वर्शासन । नंदा कीर्ति बहुत जाली तुझी जाण । आणि आम्हासी देतासी दान । म्हणौनि आलो मागावया ॥१४॥
धृतासाठी आणिला नळा । काई पापिणी अमंगला । तुम्ही तवं अंत:क्रनी निर्मळा । ज्ञानिये चतुर ॥१५॥
मग चरणक्षाळण जालें । गंधवीडें समर्पिलें । मग आश्चर्ये वाटलें । महाबळभटासी ॥१६॥
तंव गोकुळामाझारी । मंगळ आनंद घरोघरी । पाहुं आल्या अवघ्या नारी । म्हणती पुत्र झाला येश्वदेसी ॥१७॥
भट पुसे नंदा तुम्हा पुत्र जाला । सांघो श्रावण मास अष्टमीला । रोहिणी नक्षत्री जन्मला । भाग्य तुझें ॥१८॥
याचें जन्मनांव काय सांघा साम्हासी । तंव भट म्हणे येश्वदेसी । याचें जातक बर्तुन देइन तुम्हासी । मग आम्हा बहुत दान होइल ॥१९॥
पुढें पातडें मांडलें उकलुनी । तंव येश्वदेनें पाट दीधला आणौनी । म्हणे नंदा आतां ब्रह्मवाणी । आइक माझी ॥२०॥
आंगोळीया लेखिनु वीचारुनी पाहे । डोइ हालवे नेत्रीं अस्वपात ये । म्हणें आहा कटकटा ऐसें काये । जालें गा देवा ॥२१॥
तंव नंद म्हणे भटो कैसें वर्तले । याचे जातक कैसें नीघालें ॥ तंव भट म्हणे नव्हेची भले । यासी जन्म झाले मुळावरी ॥२२॥
शनि राहो मंगळ केतु । द्दष्टी ग्रह असे सांघतु । अर्धरात्री अष्टमी आतु । दोहीं नक्षत्रीं जन्मला ॥२३॥
अरे हा कुळक्षेवो करील । याची जयावरीं द्दष्टी पडेल । तो मुक्तीतें पावेल । ऐसे सत्य जाण ॥२४॥
यातें टाकीजें यमुनें डोहीं । यासी आणिकु वीचारु नाही । परी मजसी बाळ दावी कांहीं । वीचारू असे ॥२५॥
रीठगांठीचि माळा । ते मी घालीन याचीया गळां । मग सर्वासी होईल भला । नंदराया ॥२६॥
मग नंदु रावो वीनंती करी । स्वामी येकादा प्रेत्नु करी । तंव भट म्हणे कांही चिंता न करी । बाळ दाखवी आम्हासी ॥२७॥
तंव बाळ आले भटें देखिलें द्दष्टी । तो चतुर्भुज जगजेठी । मग रीठागांठी घातली कंठी । भटें कपटरूपें ॥२८॥
तंव तो रीठासुरू । तेणे बाळकाचा करावा संव्हारू । कंठी चेपुनी जंव मारावें लेकरूं । तंव काइ वर्तले ॥२९॥
तंव तेणें बाळके तो मणी । धरुनीं घातला वदनी । तो फोडीला कडाडुनी । तंव येश्वदा मनी दचकली ॥३०॥
ते मुखीं आंगोळी घालुनी पाहे । तंव असुध मांस देखताये । मग भटें भयें मानीलें पाहे । कैसे हे लेकरूं ॥३१॥
तंव मातेनें पाहीलें मुख । मग बालकें केला घोख । त्या वेगळे देखिलें येक । मर्दिला रीठासुरू ॥३२॥
मग भट गजबजीला । तो उठुनी पळु लागला । पुढां काये वर्तांतु वर्तला । तो आइकावें श्रोतेजन ॥३३॥
हा पुत्र तुम्हा नव्हें द्या कवणा । ऐसे भट बोलीला वचना । तंव हासीला यदुराणा । मग वींदाने मोकलीलें भटावरी ॥३४॥
जंव वर्तत होता खोटेंपणें । तंव तोंडावरी पीढे बैसलें जाऊन तेणें । तोंड सुजवीलें गहने । मग पळौ लागला भयभीतु ॥३५॥
बैसु घालता होता पाटु । तेनें घेतला उचाटु । पीढीयांचा जाला घडघडाटु । घरोघरीचीया ॥३६॥
तेलातुपांची मापें । तें चालिली पैं सानुपे । मोगरीया द्वांवती कोपें । मारू करिताती भटासी ॥३७॥
तव साळीग्राम गडबडीलें ॥ देव्हारपाट साउभे आले । आगळाचें सूर सुटलें । खेळ खेळो बाळलीला ॥३८॥
नंदरायाचा बैसावयाचा पाट थोर । तो पाठीवरी बैसला निष्ठुर । घृतालागी आणिला होता नळा थोर । तोचि मस्तकीं वाजतु असे ॥३९॥
वोटयावरील माथली । तेचीं भटाचें मस्तकीं लागली । तेनें बहीरू जाला तयेवेळी । कांहीं आइको नये ॥४०॥
तंव भटें केला महाशब्द म्हणें पाहो आलों तुमचें कौतुक । आम्हासी मार बहुत होत । तुम्हीं पाहता वीनोद नंदा ॥४१॥
मोगरीया लाटनी पोळपाट । म्हणे तीये सुयाचे पोट । कासावीस जाला म्हणौनी पीटीलें लल्हाट । भटें आपुलें पैं ॥४२॥
गरगरा भोंवरी आली भटासी । तंव काष्टयंत्र होता वेसीपासी । ते हस्तपादीं रीगती कैसी । तेणें अंतु नाही तयाचेया दु:खा ॥४३॥
तळमलीतु आला वेसीपासी । धोत्र सुटलें नझ परीयेसी । मळमूत्र वाहे तयासी । वीटंबना होत असे ॥४४॥
घरीची काष्टें राहिली । मग रानकाष्ठा आज्ञा दीधली । तवं चहुकडेहुन चालली । तया भटावरी ॥४५॥
मग चालविलें कुळवे नांगर । म्हणे भटा थीर रे थीर । तें नुडौनी बैसती थोर । तया भटालागी ॥४६॥
पीसाटीया वेसीबाहीरी आला । होनें घालताती घाला । मग तो मधुरेसी आला । संकष्टें परीयेसा ॥४७॥
तो जीवें न मारावा । ऐसा नीरोपु जाणावा । तेवेळीं येकेची घाइ पुरा करावा । परी आज्ञा नाहीं देवाची ॥४८॥
तवं तो दीसा मुली जाला । आणि नझची पळो लागला । म्हणे हें काष्टें घेतील प्राणांला । तवं लोक येती पहावया ॥४९॥
तवं तो पळत मथुरेसी आला । धोत्र सुतलें नज्ञची देखिला । जन पाहावयासी आला । मथुरा पुरीचा ॥५०॥
दुते धरुनी भटासी । कंसाजवळी आणीले परीयेसी । मुर्छना येउनी भूमीसी । पडला सभेमाजी ॥५१॥
तवं कंसु मनी दचकला । बहुत जीव्हारी खोचला । मग म्हणे काये जाले या ब्राह्मणाला । नेणु कैसें नर्तलें ॥५२॥
देखौनि भटाचा वेदना ॥ वीस्मो पावले नरनारी जन । म्हणती कवण माव जगजीवना । जालीया भटासी ॥५३॥
थोर जाला हाहाकारू । तंव आकासीं देखिलें कुळेवें नांगरूं । म्हणती सकळ समाचारू । भटा काये वर्तलें हे ॥५४॥
तव भटाची मुर्छना हरली । क्षीना एका सावध जाला तये वेळीं । मग बोलीला तये वेळीं । महाबळभटु ॥५५॥
तवं तो भट बोलीला परीयेसी । राया मी गेलुं गोकुळासी । रीठागांठी घातली बाळकासी । तयेवेळीं ॥५६॥
तवं तो नंदाचा बाळु । रीठामणी धरीला केवळु । मुखिं घातला तये वेळीं । तो मर्दिला मुखीं ॥५७॥
ऐसा वधीला रीठासुरु । मग मज जाला काष्ठांचा मारु । ऐसा वर्तमान वीचारु । जाला कंसराया ॥५८॥
रीठासुर दैत्य दारुण । त्याचा बाळकें घेतला प्राण । पुढां कैसें वर्तले जाण । तें सांधैल कृष्णदास तानों ॥५९॥
इति श्री भागवते म्हापुराणे । परमहंससंहितायां श्री दशमस्कंदे । महाबळभट कथननाम शोडशोऽध्याय: ॥१६॥
श्रीपरब्रह्म । नमो नमामीहं.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP