मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री देवी विजय|एकादश स्कंध| अध्याय तिसरा एकादश स्कंध अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा एकादश स्कंध - अध्याय तिसरा श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय. Tags : devi vijaypothipuranदेवी विजयपुराणपोथीमराठी अध्याय तिसरा Translation - भाषांतर श्रीगणेशायनमः । भूतशुद्धीकरुन । करावेंविभूतिधारण । श्रुतिस्मृतीपुराण । प्रमाणदेतीभस्माशी ॥१॥अग्निहोत्राचेहोययजन । त्यातीनीअग्नींतून । भस्मप्रयत्नेंआणून । धारणकर्णेद्विजांनीं ॥२॥श्रोत्रिय अन्नपाचन । संबंधीभस्म आणून । शुद्रेंकरावेंधारण । दावाग्नीजात इतरांनी ॥३॥ब्रम्हचारीसमिधाधन । करींतेंभस्मलाविजेतेण । ग्रहस्थानेंऔपासन । वानप्रस्थेंतैसेची ॥४॥श्रोत्रियभस्मयतीशीं । तेंयुक्ततीनवर्णाशीं । भस्मधारणविप्राशी । श्रुतीसांगेसद्धर्म ॥५॥कपिलागाईचेंशेण । अधरकीजेंसंपादन । गोळेत्याचेवाळवून । शिवमंत्रेठेविजे ॥६॥चित्रापौर्णिमेचेदिवशीं । शिरोव्रतसंकल्पाशीं । करुनीशुद्धमानसीं । विरजाहोमकरावा ॥७॥तेसमईंगोळेदहन । त्याअग्नीतकरुन । त्याभस्माचेंधारण । नखशिखांतकरावें ॥८॥आजन्म अथवाबारा । वर्षेंकिंवाषदवत्सरा । तीन अथवाएकवत्सरा । षण्णमासवातीनमास ॥९॥एकमासवाबारादिन । षटदिनकिंवात्रिदिन । निदानीचाएकदिन । शिरोव्रतकरावे ॥१०॥हेंवेदोक्तशिरोव्रत । जोब्राम्हणनाचरित । तयाचेंकर्मव्यर्थजात । जन्मादारभ्यसर्वही ॥११॥करितांहेंउत्तमव्रत । सर्वकर्मेंसफलहोत । सर्वसिद्धीसाधत । शिवतुल्यविप्रतो ॥१२॥अग्नित्यादिमंत्रेंकरुन । भस्मकीजेंधारण । अर्धचंद्राकारशोभन । त्रिपुंड्रधारणकरावें ॥१३॥अनामिकाचतुरानन । मध्यमातीनारायण । अंगुष्ठतोशिवजाण । अंगुलित्रयत्रिपुंडा ॥१४॥कनिष्ठाआणितर्जनी । वर्ज असेअनुष्ठानीं । पितृकर्मावांचुनी । तर्जनीस्पर्शनसावा ॥१५॥भोजन आणिदानें । करावेपांचीबोटानें । निषेधहोयतर्जनीनें । तेणगुणेंनिषिद्ध ॥१६॥शिरांदिजेंभस्मोत्धूलन । तेंचिजाणभस्मस्नान । अखंडकरितांभस्मधारण । अखंडपदपावतसे ॥१७॥भस्मकरीपापासी । भस्मनामभस्मासी । रक्षणकरीधर्त्याशी । रक्षानामयाकरितां ॥१८॥ऐश्वर्यदेतधारणें । भूतीनामत्याकारणें । कांतिप्रदहेंदेखणें । भसितनामयाकरितां ॥१९॥भस्मत्रिपुंड्रभाळीं । तोदुजाचंद्रमौळी । बाहुग्रीवाह्रत्कमळीं । विधिदृष्टचर्चावें ॥२०॥एकदांमुनिशिखामणी । दुर्वासतोमहाज्ञानी । अखंडभस्मचर्चुनि । रुद्राक्षधारणकेले असे ॥२१॥शिव अंबेभगवती । शिव उमेशलोकपती । एवंगर्जेमहापती । सहजगेलापितृलोकां ॥२२॥कव्यवालादिपितर । सन्मानुनीमुनिवर । गोष्टीकरितीप्रेमभर । परस्परबैसुनी ॥२३॥कुंभीपाककुंडाथोर । तेथेंचिअसेकिंचितदूर । शब्द ऐकिलेदुःखकर । दुर्वासानीप्राण्यांचें ॥२४॥हायहायपुरेपुरे । मेलोंमेलोंअरेअरे । पुसिलेंतेव्हांमुनिवरें । कोणरडतीदुःखित ॥२५॥पितरम्हणतीनर्कवासी । कुंभिपाकींअतिसायासी । रडतीएवंअहिंर्निशीं । कर्णमनांत्रासद ॥२६॥पाहूंम्हणोनिनिघाला । कुंडासमीपमुनिआला । कुंभीपाक अवलोकिला । मुखखालींकरुनिया ॥२७॥तोवर्तलेंनवल । प्राण्यांसुखझालेसकळ । हसतीनाचतीबहुळ । आनंदलेसर्वही ॥२८॥स्वच्छझालेंजलसीतल । सुगंधवायूपरिमळ । मृदंगविणाकाहल । मधुरध्वनीहोतसे ॥२९॥सुखझालेंस्वर्गाहून । चकितझालेदूतपाहून । दुर्वासहीचकितहोऊन । गेलानिघून अन्यस्थळीं ॥३०॥ दूतींकळविलेंयमाशीं । यमपातलासत्वरेशी । वार्ताकळवीइंद्रासी । अष्टादिग्पाळपातले ॥३१॥ ब्रम्हविष्णूतेथेंआलें । कुंभिपाकींसुखझालें । पापाचेंआतांभयकाय ॥३२॥ ईशसंकल्पसत्य । केवींझालाअसत्य । नकळेंकोणाइंगित । कायकारणम्हणुनी ॥३३॥ब्रम्हविष्णूदेवसकळ । गेलेतेव्हांशिवाजळ । नमूनतयावृत्तसकळ । सांगीतलेंविष्णूनें ॥३४॥हरम्हणेनवलकाय । भस्ममहिमानकरीकाय । ममभक्तदुर्वासजाय । कुंभिपाकपहाया ॥३५॥पातकातेंभस्मकरी । अपवित्रतेंपवित्रकरी । भस्मलावितांशिरीं । ममरुपतोप्रत्यक्ष ॥३६॥अधोमुखेंअवलोकिले । भस्मकणत्यांतपडले । भस्मस्पर्शेंदिव्यझालें । महातीर्थकुंडतें ॥३७॥पितृतीर्थलोकपावन । झालेंतेंआजपासून । मल्लिंगकरास्थापन । देवीप्रतिमास्थापिजे ॥३८॥पित्रेश्वरपित्रेश्वरी । पितृतीर्थतेंसाचारी । सर्वतीर्थांमाझारी । श्रेष्ठतीर्थजाणिजे ॥३९॥एवंवाक्य ऐकून । सदाशिवासीनमून । परत आलेसर्वजण । देवीशिवस्थापिले ॥४०॥विमानशिवेंधाडिलें । प्राणीसर्वकैलासांनेले । शिवलोकीराहिले । भद्रगण अद्यापि ॥४१॥तेथून अन्यस्थळांवरी । कुंभिपाकरचिलादूरी । शिवभक्ततेथवरी । नजातीऐसेंकेलें ॥४२॥ऐसेंभस्माचेंमहिमान । नारदासांगेनारायण । सवेंचकथिलेंमुद्राधारण । द्वादशतिलकवैष्णवाचे ॥४३॥विष्णुआगमपाहून । करतोंम्हणेवर्णन । हरिद्राआणिगोपीचंदन । उर्ध्वपुंड्रहरिनामें ॥४४॥पुन्हाकरुनविचार । बोलेनारदामुनिवर । श्रुतिसिद्धनिर्धार । भस्मपुंड्रचंद्रसा ॥४५॥श्रुतीचेअधिकारी । विप्रक्षत्रीयसदाचारी । भस्मधारणसाचारी । शिवविष्णुप्रेयस ॥४६॥वेदविहितएकभसित । तिर्यकतिलकवर्णित । तेचिसदाद्विजाउचित । इतरत्र इतरासी ॥४७॥तीनशतसत्याहत्तर । भस्ममहिमाअपार । वर्णनकेलासेथोर । संक्षेपरुपदेवीनें ॥४८॥श्रीदेवीविजयेएकादशेतृतीयः ॥३॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP