मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री देवी विजय|चतुर्थ स्कंध| अध्याय आठवा चतुर्थ स्कंध अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा चतुर्थ स्कंध - अध्याय आठवा श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय. Tags : devi vijaypothipuranदेवी विजयपुराणपोथीमराठी अध्याय आठवा Translation - भाषांतर श्रीगणेशायनमः । देवीकथापरमपवित्र । तयांमाजीकृष्णचरित्र । प्रसंगेंवर्णीशक्तिपौत्र । अभिमन्युपौत्रासी ॥१॥श्रोतीसादरकीजेमन । कृष्णगाथाअतिपावन । संक्षेपेंयेथेंवर्णन । सविस्तरकृष्णखंडी ॥२॥तेथीचाघेऊनिआधारा । किंचिद्वर्णिलासेविस्तार । श्रवणेज्याच्यादुःखभार । एकसरेनासती ॥३॥देवकीगर्भीमुरारी । दिवसांमासातेजभारी । भारावतरणार्थहरी । वसेगर्भीशापबळें ॥४॥सर्वदेवगुप्तयेती । प्रेमेंकरितीगर्भस्तुती । नवमासहोतांपूर्ती । प्रसवसमयपातला ॥५॥कंसकरीतसेजतन । रक्षितीसदाअसुरगण । नीजनयेकंसालागुन । मनींठसलाआठवा ॥६॥कारागृहकेलेंबळकट । प्राकार असतीतयाआठ । जडलीतयादृढकपाट । लोहकुलुपेंचढविली ॥७॥सहस्रसहस्रराक्षस । रक्षितीएकएकद्वारास । सावधबैसलेअहर्निश । नग्नखड्गेघेऊनिया ॥८॥दाहवामासश्रावण । अष्टमीआणिपक्षकृष्ण । रोहिणीअर्धरात्रीकृष्ण । चंद्रोदईप्रगटला ॥९॥बाळाचेपाहूनिमुख । दोघांवाटलेंसुख । सवेंचिझालेंबहुदुःख । घातिलदुष्टम्हणूनी ॥१०॥ तवझालीआकाशवाणी । आलीवसुदेवाचेंकांनीं । वसुदेवापुत्रघेऊनी । सत्वरजाईंगोकुळां ॥११॥बाळठेवीतिचेशयनीं । कन्येसियेघेऊनी । मीआपुलेंमायेनी । मोहिलेंसर्वरक्षक ॥१२॥मोकळोंसर्वकपाटें । पाडिलेंसर्वनिद्रानेटें । तुजाईंमोकळयावाटें । त्वरेंयेईनिर्भय ॥१३॥एवंऐकिलेंवचन । मोकळींद्वारेंपाहून । त्वरेंबाळासिउचलून । गमनकरीराजमार्गे ॥१४॥नेणकोणीनागरिक । पूरवाहेयमुनोदक । परीआदिमायेचेंकौतुक । कटीमात्रझालीनदी ॥१५॥वसुदेवगेलागोकुळीं । पूर्वींचमायागर्भीआली । त्याचवेळींप्रगटली । नेणेंयशोदानिद्राभरे ॥१६॥स्वयेंचहोऊनिदासी । कन्यादिलीवसुदेवासी । बाळनिजवीयशोदेपासी । गुप्तझालीसत्वर ॥१७॥ परांबेचेकौतुक । नजाणतींब्रम्हादिक । पामरकायकंसएक । जाणूंशकेचरितहें ॥१८॥वसुदेव आलाबंदिखानां । मंचकीठेविलीकन्या । पूर्ववत् कपाटादिबंधना । अनकदुंदुभीअवलोकी ॥१९॥सावधझालेराखणार । तोंऐकतीरुदनस्वर । त्वरेंसांगतीसमाचार । कंसाम्हणतीपुत्रझाला ॥२०॥ऐकतांचिधांवेखळ । वसुदेवाशींमागेबाळ । हाचिशत्रूकेवळ । देईसत्वरीम्हणेतो ॥२१॥वसुदेवदुःखेंकरुन । कन्यादेईआणून । म्हणेनघेईइचाप्राण । पुत्रनाहींकन्याही ॥२२॥कन्यापाहुनीकंस । विस्मयकरीमानस । आकाशवाणीनारदास । खोटेंपणकेवींहें ॥२३॥दृढमाझेंकारागारी । वसुदेवकायकृत्रिमकरी । सावधरक्षक असतीद्वारीं । देवमायानकळेही ॥२४॥कन्याअसोअथवासुत । निश्चयेंकरावाघात । म्हणोनिकन्यापाईंधरित । शिळेवरीमाराया ॥२५॥तवतीनिष्टूनगेली । गगनोंउभीटाकली । कंसाप्रतिबोलिली । मेघगंभीरवाणीनें ॥२६॥कायदुष्टामारुनिमज । प्रबलशत्रूझालातुज । मृत्युगिळीलसहज । उपायकांहींनसेची ॥२७॥एवंकंसावदोनी । अष्टभुजातीमोहिनी । सुरेंपूजिलीयेऊनी । विंध्यपर्वतींस्थिरावे ॥२८॥विंध्याचलींत्रिकोण । स्थलनिर्मूनीसुलक्षण । तीनरुपेंकरुनिसगुण । राहीलीतेथेंयोगमाया ॥२९॥कालीलक्ष्मीसरस्वती । त्रिगुणातीपरंज्योती । बलिप्रियाकृपामूर्ती । भक्तवत्सलानिर्गुणा ॥३०॥ नंदगृहीप्रगटली । नंदानामपावली । भक्तकार्येसाधिली । करुणामयमूर्तिती ॥३१॥ असोकंसेंवाक्य ऐकिलें । मनचिंतेनेंपोळलें । सवेंचिदैत्यपाचारिले । आज्ञादेईतयांशीं ॥३२॥ पूतनावत्सधेनुक । प्रलंबकेशीव्योमबक । ग्रामीशोधूनबाळक । नाशकराम्हणतसे ॥३३॥विष्णुअसेआपुलावैरी । त्याचेविप्रसहाकारा । धेनुदुग्धघृतेंकरीं । पोषणहोयदेवांचें ॥३४॥गाईब्राह्मणवधावे । यज्ञादिकहोऊंनद्यावे । क्षीणसहजस्वभावें । देवहोतील अशक्त ॥३५॥मगकरावादेवघात । निष्कंटकतेव्हांचिहोत । निघालेअसुरत्वरित । आज्ञावंदुनमस्तकी ॥३६॥असोइकडेनंदाघरीं । पूर्वींचशेषजन्मकरी । तवपातलाश्रीहरी । पुत्रोत्सवनंदाते ॥३७॥पुत्रझालाम्हणून । गोपिसांगतीनंदालागून । नंदेंबहुहर्षेंकरुन । द्रव्यभांडार उघडिलें ॥३८॥पुत्राचेपाहिलेंमुख । चंद्रहीतेथेंअधोमुख । नंदाझालेंपरमसुख । जातकादिसर्वकेलें ॥३९॥अपारवेचिलेंधन । याचकांवरीवर्षलाघन । जेथेंप्रगटेनारायण । उणेंकायमगतेथें ॥४०॥ पाचारिलागर्गमुनी । नंदेंतयातेपूजुनी । म्हणेप्रगटलेसुतदोनी । जातकवदेस्वामिया ॥४१॥गर्गेकरुनिगणित । जातकतेव्हांवर्णित । आनंदलाह्रदयांत । विष्णुअंशजाणोनी ॥४२॥मुनिह्मणेदोघेपुत्र । यांचेअपारचरित्र । धन्यभाग्यतुझेंगोत्र । पुत्र ऐसेप्रगटले ॥४३॥वडिलपुत्राचेऐकवृत्त । अतिशयेंहाबलवंत । नामेंबलरामविख्यात । असुरनाशकरीलहा ॥४४॥आकर्षणजहालेंगर्भांत । तेणेंसंकर्षणविख्यात । हलमुसलशस्त्रकरांत । धरीलम्हणोनीहलधरहा ॥४५॥ हाधाकुटातुझासुत । चरित्रयाचेअदभुत । वर्णावयाअशक्यहोत । किंचिततुजसांगतो ॥४६॥कंसांदिकसकलदुष्ट । लीलामात्रेंकरीलनष्ट । पृथ्वीचेंसर्व अरिष्ट । दूरकरीलभारहा ॥४७॥धर्माचेकरीलस्थापन । भक्ताचेकरीलपालन । होईलहाजगन्मोहन । नृपसर्ववंदिती ॥४८॥सोळासहस्रपन्नास । आणीक आठस्त्रियायास । प्राप्तहोतीलबहुवस । संततिअपारजाणपा ॥४९॥वसुदेवाचाहासुत । वासुदेवनामेंविख्यात । मनासर्वांचेआकर्षित । कृष्णनामयाकरितां ॥५०॥असंख्यनामेंअपारगुण । विष्णुअवतारयासीजाण । शेषतोचिसंकर्षण । पूर्वपुण्येंलाधलासी ॥५१॥एवंगर्गेकथिलें । नंदाचेंमनहर्षलें । दोघांपाळणांघातले । नामेंठेविलींउत्सवें ॥५२॥नित्यउत्सवनंदाघरी । गोपीगातीसुस्वरी । गुप्तरुपेंस्वर्गनारी । नित्यगोकुळींराहतीत्या ॥५३॥तवतीबालघातिनी । पूतनाआलीनंदसदनीं । अतिसुंदररुपकरोनी । प्रवेशलीराजवाडा ॥५४॥स्तनांतरीविषठेविलें । वरीअतिमधुरबोले । पाहतांसर्वभुलले । रुपलावण्येंकरुनी ॥५५॥आलीनीटयशोदेजवळी । म्हणेतूंभाग्याचिपुतळी । पुत्राप्रस उनीगोकुळीं । धन्यधन्यजाहलीस ॥५६॥मनींधरोनियाआस । आलेंमीतवगृहास । पहावेंतुझेंपुत्रास । कडियेघ्यावेंम्हणोनी ॥५७॥एवंमृदुवाक्येंकरुनी । यशोदेसीमोहुनी । कृष्णाघेतलेउचलोनी । कडियेखांदाखेळवी ॥५८॥ सवेंचिकरीचुंबन । प्रेमदाखवावरुन । म्हणेमनींतुजलागून । वधीआतांकंसारे ॥५९॥ यशोदेसीतेंनकळें । दूरगेलीकार्यबळें । अवसरपाहतांचिवेळे । पुतनासाधीस्वकार्य ॥६०॥ विषभरित आपुलास्तन । झडकरीमोकळाकरुन । कृष्णमुखींदेऊन । पान्हावलीविषपान्हा ॥६१॥दोनीहस्तेंस्तनधरिला । कृष्णेंपिण्याआरंभकेला । क्षणनलागतांशोषिला । प्राणवायुतियेचा ॥६२॥गात्रेंसर्वओढिलीं । तेव्हांदुष्टेशींव्यथाझाली । बाळाशीपरतांढकली । परीनसुटेतोचिकटला ॥६३॥आक्रोशकरीराक्षसी । सोडीसोडीऐशावचनाशी । सत्यकरीतोह्रषीकेशी । सोडविलीभवबंधें ॥६४॥मुखींधरिलास्तन । मानिलेतिजमातेसमान । पोंचविलीवैकुंठसदन । दयासागरेश्रीरंगें ॥६५॥असोतीपूर्वरुपेंकरुन । पृथ्वीपडलीतरफडून । सवेचीसोडिलाप्राण । हातपायझाडूनिया ॥६६॥कृष्णचिकटलासेस्तनी । हांसेखिदळेसुखानी । यशोदा आलीधाऊनी । घोरशब्द ऐकतां ॥६७॥गोपगोपिसर्वमिळाले । प्रुतनापाहतांभ्याले । प्रेतजेव्हांओळखिले । स्वस्थजाहलेकिंचित् ॥६८॥पाहिलाबाळतिचेंह्रदयीं । यशोदाधांवेउचलूनिघेई । प्रेमेंआलिंगूनीत्दृदयीं । रुदनकरीमायेनें ॥६९॥पुत्रासीपाजिलेंस्तन । सवेंचिकरीलिंबलोण । म्हणेईश्वरेरक्षिलाप्राण । आजिमाझेंबाळाचा ॥७०॥पूतनेचखिडेंकरुन । गोपेंकेलेंतिचेदहन । पुण्यकरीअपारधन । नंद आनंदेकरुनिया ॥७१॥कांहींदिवसलोटत । तवशकटासुरयेत । बालभावेंमारुनीलाथ । कृष्णमारीदैत्याते ॥७२॥सवेचितृणावर्त आला । अपारवायुतेव्हांसुटला । अंधकारबहुझाला । गोकुळांमाजीएकसरे ॥७३॥दैत्येंकृष्णाउचलिले । उड उनीआकाशींनेले । अतिजडहोऊनीवहिले । कृष्णेंदैत्यदडपिला ॥७४॥अतिभारेंभूमिपडला । असुरप्राणासिमुकला । नंदादिकांआनंदझाला । कृष्णमुखनिहाळिती ॥७५॥ कृष्णरामदोघेकुमर । रांगतीखेळतीसुकमार । गोपगोपीसुखसागर । पूर्वपुण्येंलाधलें ॥७६॥कृष्ण अंगणींरांगत । मृतिकाघालीमुखांत । मुख उकलोनिमातापाहत । विश्वरुपदेखिलें ॥७७॥एवंनानालीलाकरीत । दोघेंसर्वांसुखदेत । पांचवर्षांचेझालेसुत । गोपासवेंखेळती ॥७८॥सवेंघेउनीगोपकुमार । वत्सेंचारीनंदकुमर । अनेकखेळमनोहर ॥७९॥बकासुरपातलावनीं । बैसलामुखपसरोनी । कृष्णेंफाडिलाचोंचधरुनी । मुकलाप्राणातोटुष्ट ॥८०॥अघासुरकृष्णेंमारिला । वत्सेंचारितांबत्सकाला । कृष्णेंखेळतांचिवधिला । धेनुकासुरतैसाची ॥८१॥गोपबाळेंसवेंघेउनी । रात्रीजायगोपसदनीं । दहीदुग्धलोणीचोरुनी । स्वयेंखायखाऊंघाली ॥८२॥नवनीतघेऊनहरी । स्वहस्तेमर्कटाचारी । गोपीयेतांपाहेदुरी । पळोनिजाईसत्वर ॥८३॥गोपीयेऊनीगृहाशीं । कागाळीसांगतीमातेशी । कृष्णम्हणेखोटेंबोलशी । केव्हांआलोंघरांतुझ्या ॥८४॥एवंअनेकचरित्र । करीकृष्णकोमलगात्र । मातामंथितादधिपवित्र । धरिलेयेऊनीखीते ॥८५॥म्हणेमजदेईस्तनपान । यशोदादेईतयालागून । तवदुध उतलेंम्हणून । कृष्णाटाकूनीतीगेली ॥८६॥कृष्णेंतेव्हांकायकेल । दधिभांडेफाडिलें । दहीताकसर्वसांडिलें । स्वयेंलोणीखातसे ॥८७॥तवयशोदाबाहेर आली । दधिनाशेंतीकोपली । यष्टिघऊनीधांवली । पाहुनीपळालाकृष्णवेगें ॥८८॥मागेंयशादाघांवे । परीकृष्णहातींनपवे । श्रमितपाहूनीसवें । गवसलादेवगुरु ॥८९॥करुनियादीनवदन । कृष्णकरीरुदन । तीम्हणेतुजबंधन । करितेंआतांखोडकरा ॥९०॥दावेंआणूनासत्वरी । उखळींबांधिलाहरी । आपणगेलीगृहांतरी । उखळासहकृष्णपळे ॥९१॥नारदशापेंनलकूबर । यमल अर्जुनवृक्षथोर । मधूनजायदामोदर । ऊलूखल अडकलें ॥९२॥ कृष्णेंस्वबळेंकरुनी । वृक्षपाडिलेउपडोनी । दिव्यरुपतेहोऊनी । गेलेस्वर्लोकीनमूनिया ॥९३॥धांवलेगोपशब्द ऐकून । कृष्णासीबांधिलेंपाहून । आश्चर्यकरितीसर्वजन । वृक्षकेवीतुटलेहो ॥९४॥कृष्णासीसोडिलेंनंदें । उचलूनघेतलाआनंदें । यशोदाधांवलीखेदें । लिंबलोणकरीतसे ॥९५॥त्रेपनश्लोकभागवत । श्रीकृष्णाचेचरित । प्राकृतेंअंबावर्णित । भक्तजनताराया ॥९६॥चतुर्थस्कंदेअष्टमोध्यः समाप्त ॥८॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP