तृतिय स्कंध - अध्याय पहिला

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । भक्तिभावेंकरुन । श्रीगुरुसीव्हावेशरण । मस्तकीनमावेचरण । प्रेमाश्रुनीभिजवावें ॥१॥

गुरुचेजेजरणरज । शरीरींस्पर्शतासहज । अनेकजन्मीचे अकाज । नष्टहोयतेक्षणीं ॥२॥

श्रीगुरुचेंपादोदक । सेविताचीमोक्षसुख । प्रासितां प्राप्तहोतसें ॥३॥

श्रीगुरुमाझीमाता । श्रीगुरुमाझापिता । कुळगोत्र आणिमाता । सखामाझागुरु ॥४॥

श्रीगुरुनिमजतारिलें । पापसमस्तवारिले । बंधनसर्वसोडिले । मोकळेकेलेंमजलागी ॥५॥

गुरुनीशोधिलीकाया । गुरुनीदाविलीमाया । गुरुनी केलीदया । ओळखकेलीअंबेची ॥६॥

मीतोंमहापापिष्ठ । महापातकीवरिष्ठ । कामीलोभीभ्रांतदुष्ट परितारिलेयागुरुनें ॥७॥

नानायोनींभवंडिता । पूर्वपुण्येंमनुष्यता । तयामाजीविप्रता । उत्तमकुलीजन्मलों ॥८॥

श्रीगुरुचरणसांपडले । सहज जाउनीवंदिले । तत्काळचिनिवारिले । श्रीगुरुनीमाझेंदुःख ॥९॥

गुरुभक्ताचीमाउली । गुरुभवतापाचीसाउली । मस्तक अर्पितांचीपाउली । नवलकेलेगुरुरायें ॥१०॥

कृपा दृष्टीअवलोकिलें । पुसतीकायझाले । उदासमुखकेले । भयवाटेंकींमानसी ॥११॥

जन्ममरणकालपाशी । भयनसेतेअविनाशी । जन्मादिकनाहींतुजसी । सुखमूर्तीअव्यय ॥१२॥

परीमायेचेबळेकरुन । भांतझालेतुझेमन । तयासीहोतासमाधान । अद्वैततुज सापडलें ॥१३॥

समाधानहोयमानसी । गुजसांगतोपरियेसी । ह्मणोनीकर्णीउपदेशी । श्रीगुरुदयाळतो ॥१४॥

पुनरपिसांगेमजसी । जपवित्वाअहेर्निशी । कृपाकरील परेशी । आदिमायापरांबा ॥१५॥

गुजपडतांचीकानी । श्रद्धाउपजलीमनीं । सर्वत्रभासेते जननी । सदगुरुच्याप्रतापे ॥१६॥

मनाजाहलेसमाधान । उरलेंनाहींकार्यकारण । एक उरलेसेभजन । यावद्देह असेहा ॥१७॥

गुरुकृपेहेंचिसुचलें । तिचेचरित्रतीचबोले । भागवतहेप्राकृतझालें । भवाब्धीचीहीनांव ॥१८॥

तिसरेंस्कंदाचेंकथन । जनमेजय पुसेव्यासालागुन । अंबामखविधान । केवींकर्णेंबोधिजे ॥१९॥

अंबाकोणकोठेंझाली कायगुणकिमर्थ आली । केवींरुपस्वभावखोली । सांगिजेमजदयाळा ॥२०॥

ब्रह्मांडकेवीजाहलें । कोणद्रव्यकोणीकेलें । ब्रह्माविष्णूरुद्रवहिले । सगुणवानिगुर्ण ॥२१॥

स्वतंत्रकिंवापराधान । मृत्युधर्मीकींचिदघन । आहेतकींकालाधीन । हर्षशोक असेकीं ॥२२॥

तिघांचीसांगास्थानें । ऐश्वर्ययांचींकारणें । बोधिजेमजकृपेनें । श्रवणेच्छापुरवावी ॥२३॥

वेदव्यासवदेउत्तर । नृपाप्रश्नतुझादुस्तर । पूर्वींमाझेंहीअंतर । संशययुक्त असेबहु ॥२४॥

मगम्यानारदासी । एवमेवकेलेप्रश्नासी । हंसोनिबोलिलामजशीं । देवर्षीतोनारद ॥२५॥

ह्मणेमीहीसंशयेकरुन ॥ पुसिलेंपित्याशीजाऊन । सृष्टीकर्तामुख्यकोण । तीनदेवामाझारी ॥२६॥

ब्रह्मांडरचिलेंकोणी । सर्वोत्कृष्टजोत्रिभुवनी । सर्वश्रेष्ठजोत्रिभुवनीं । विस्तारुनिसांगावें ॥२७॥

ब्रह्मदेवह्मणेनारदा । कोणजाणेऐशावादा । शक्यनसेगोविंदा । रागवानकोणीनजाणे ॥२८॥

पूर्वीजगनष्टजाहलें । एकार्णव असेंभरलें । भूतमात्रजैंप्रकटले । पंकजीउत्पन्नझालोंमी ॥२९॥

कोणमजमातापिता । कोणमज उत्पादिता । जळकेवींसंचलेंआतां । आधारनेणेंत्याचामी ॥३०॥

तवपंकजपाहीलें । कर्दमापासावहझालें । कर्दमीचजलसंचलें । तर्किलीम्याआधारशक्ति ॥३१॥

सहस्त्रवर्षेपर्यंत । जातहोतोंकमलनालांत । परीअंतनलागलातेथ । श्रमलोंफारनारदा ॥३२॥

तप ऐसीऐकिलीवाणी । बैसलोंमगकमलासनी । एकाग्रचित्तकरोनी । सहस्त्रवर्षेतपकेलें ॥३३॥

सृज ऐसीझालीवाणी । नकळेंमजसृष्टिकरणी । इतक्यांतपातलेअसुरदोनी । मधुकैटभदुधर्ष ॥३४॥

शिरलोंभयेंकमलांत । ततुवाटाउतरत । पुढेंदेखिलाजगन्नाथ । निद्रिस्तझालाशेषावरी ॥३५॥

प्रार्थिलामीबहुवस । किंचिदपिनकळेंत्यास । प्रार्थीमग शक्तीस । सोडूनदूरठाकली ॥३६॥

तेव्हांउठिलानारायण । युद्धकरुनिदारुण । मारिलेअसुरदोघेजण । देवींकृपेंतेधवा ॥३७॥

इतक्यांत आलाशंकर । तिघोंकेलानमस्कार । देवीह्मणेसृष्टिस्थितिसंहार । करातिघेंअनालस्यें ॥३८॥

ऐकुनीऐशावचना । मगम्या केलीप्रार्थना । केवीकरावीरचना । नेणोआह्मीदेवते ॥३९॥

मायकरीहस्यवदन । तवएक आलेविमान । त्यांत आम्हाबैसऊन । निराळमार्गेचालली ॥४०॥

एकक्षणाभीतरी । दिसूंलागलीवैखरी । वनेंउपवनेंग्रामनगरी । पर्वतनद्यासमुद्र ॥४१॥

पशुपक्षीमृगवानर । स्त्रीपुरुषनृपमनोहर । अश्वहस्तीशकटभार । पाहूंतवस्वर्गदिसे ॥४२॥

नंदनचैत्ररथादिवन । विहारकरितीदेवगण । तवइंद्रऐरावतीबसून । देवासहफिरतसे ॥४३॥

पाहूनझालोंविस्मित । विमानचाललेंत्वरीत । तवतोअतिसुशोभित । देखिलाआह्मीसत्यलोक ॥४४॥

ब्रम्हसभेमाझारी । मूर्तिमान्वेदचारी । कुमारनारदादिमुनिवरी । सेवितपाहिलाचतुर्मुख ॥४५॥

दुजामीचतुरानन । विस्मितझालेसभाजन । आमुचाब्रम्हासनातन । दुसराकोणतूंअससी ॥४६॥

तैंमीकेलेंभाषण । कोणचाअसेसनातन । हीतोंनेणवेखूण । कर्ताकोणमीनेणें ॥४७॥

विमान तेथुनीचालिलें । तवकैलासापाहिले । यक्षगणतेथेंसंचले । अलकापुरीदेखिली ॥४८॥

शिबिकेमाजीकुबेर । बैसूनीनिघेबाहेर । तवदेखिलाशंकर । वृषारुढयेतसे ॥४९॥

दशभुजतोपंचवदन । गंगाधरशशिमंडण । पिंगटजटापंचदशनयन । भुजगभूषण भूपती ॥५०॥

शूलडमरुखड्गतोमर । प्रासपरशूधनुर्धर । बाणशक्तिकपालकर । गौरीबैसेवामांगी ॥५१॥

गणपतीआणिषडानन । पुढेंमागेंदोघेजण । लक्षावधीरुद्रगण । सवेंचालतीजयाच्या ॥५२॥

शिवेंपाहिलेंशिवासी । नवलझालेंमनासी । विमानगेलेवैकुंठासी । वायुवेगेंतेधवा ॥५३॥

तेथेंअपारसंपत्ती । साक्षाद्विराजेरमापती । असतिकुसुमकांती । चतुर्भुजशोभलें ॥५४॥

शंखचक्रगदाकमल । हस्तांतशोभतीविमल । नारदादीभक्तमंडल । सेवितिसर्वसर्वेश्वरा ॥५५॥

गरुडारुढनिघेबाहेर । भूमिलक्ष्मीअंकावर । विष्वक्‍ सेनादिसमोर । चालतीज्याच्याआनंदें ॥५६॥

पाहतांतयासीअभिनव । मोहितझालोंआम्हींसर्व । समस्तनासलागर्व । स्वकर्तृत्वाचातेवेळीं ॥५७॥

तवविमानगेलेंदूर । देखिलापुढेंसुधासागर । मणिमयद्वीपथोर । तयामाजीपाहिलें ॥५८॥

अनेकवक्ष अनेकवेली । कल्पतरुचीदाटीजाहली । उद्यानेंबहुशोभली । वापीकूपसरोवरें ॥५९॥

तयामाजीदेखिलेंनगर । असतीज्यासीसप्तप्राकार । गगनचुंबीतगोपुरे । चतुद्वारेंशोभतीं ॥६०॥

पांचसातनवखणी । घराचीजाहलीदाटणी । त्याश्रीपुराचीठेवणी । बाराव्यांतवर्णिलीसे ॥६१॥

मुख्यतेथेंसेवनी । शक्तीअसतीदोघीजणी । दंडिणीआणिमंत्रिणी । अपारयांचेंशक्तिसैन्य ॥६२॥

सरस्वतीरमापार्वती । कोटिशःतेथेंअसती । महासिद्धिराबती । जीच्यासेवनीअखंड ॥६३॥

ऐसीश्रीभुवनेश्वरी । बैसलीसेमंचकावरी । मंचकाचेचारीखुरीं । देवचारदेखिले ॥६४॥

ब्रह्माआणिमाधव । रुद्र आणिसदाशिव । पांचवाजाहलापरमशिव । हंसतूलवितानतेथें ॥६५॥

वरीविरा जेईश्वरी । षोडशवर्षासुकुमारी । मदनरतीच्याहारी । ओंवाळूनिटाकिजे ॥६६॥

विधीसांगेनारदासी एवंरुपेंपाहिलेंतीशी । अनंतकरनेत्रासी । पहातांविस्मितसर्वझालों ॥६७॥

कोणदेशकोणग्राम । कोणस्त्रीकायनाम । कोणमार्ग आह्मासुगम । नकळे कांहीतेकाळी ॥६८॥

तवबोलिलानारायण । हीचसर्वांचेकारण । ओळखिलीपूर्वीचि खूण । इणेचिमज उपदेशिले ॥६९॥

हीचसर्वांचीजननी । हीचविश्वाचिपालिनी । हीच अंतीसंव्हारिणी । उत्पादिनीपुन्हाहीच ॥७०॥

चलाजाऊंदर्शनासी । वंदूदिव्यपदांबुजासी । जरीगतीनोहेआम्हाशी । द्वाराशींचतिष्ठावे ॥७१॥

अवलोकावेचरण । जेणेंचुकेजन्ममरण । जन्मघेतलीयाचाशीण । निवारणहोयकी ॥७२॥

व्यासम्हणेनृपती । तिघेहीतेव्हांतेथेजाती । द्वारामाजीतिष्ठती । तवजाहलेस्त्रीरुप ॥७३॥

स्त्रीरुपझालेपाहूनी । विस्मितजाहलेंमनीं । प्रवेशतिअंतः सदनीं । वंदितिचरणतेधवा ॥७४॥

पदजेव्हांवंदिलें । पदनखडोळांजडलें । सर्वब्रह्मांडपाहिलें । बिंबलेंतेंदर्पणी ॥७५॥

शतवर्षेंतेथेंचीमीनले । देहममत्वाभूलले । चित्रापरीरेखिलें । पायामाजीतेदेव ॥७६॥

अठठावनएकशत । श्लोकेंवर्णिलेंदिव्यचरित । श्रीपुरगमन अदभुत । देवीकृपेंतिघांचे ॥७७॥

देवीविजयतृतीयस्कंदेप्रथमोध्यायः समाप्तः ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP