द्वितीय स्कंध - अध्याय पहिला
श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.
॥ श्रीगणेशायनमः ॥ श्रीसरस्वत्यैनमः । आद्यावंदूंसरस्वती । जीसाक्षान्मूलप्रकृती । कोटिचंद्रापरीकांति । सत्वमूर्तीसुंदर ॥१॥
दक्षिणहस्तजोपहिला । धरिलीतेणेंरुद्रा क्षमाळा । सव्येदुजासोज्वळा । अंकुशधरलाजियेनें ॥२॥
वरचेशोभेवामकरी । वीणा वाजेसुस्वरी । वामबाजूंचौथेकरीं । पुज्यपुस्तकशोभलें ॥३॥
मूळविद्यामूळवाणी । गीताभार तीब्रह्माणी । हीचशद्बाचीखाणी । अक्षरविद्यामहापूर्वा ॥४॥
जीवाचावेदध्वनी । स्मृतीं शास्त्रींपुराणीं । नानाभाषाभाषिणी । हीचएकविकासे ॥५॥
इद्रचंद्रहरीहर । शेष रंचिदिवाकर । जीसकरितीनमस्कार । साष्टांगनमनतीसमाझें ॥६॥
प्रथमस्कंदीं सूत । शुकजन्मातेंनिरुपित । व्यासोत्पत्तीविचारीत । ऋषीपुनःसूतातें ॥७॥
तीकथाअतिसुंदर । श्रोतींऐकिजेसादर । द्वितीयस्कंदमनोहर । भागवतश्रीदेवीचें ॥८॥
सूतह्मणेउपरीचर । राजपुत्र अतिचतुर । तयासंतोषेपुरंदर । विमानसुंदरदेतसे ॥९॥
आकाशमार्गेंविमानीं । विचरेसुखेंबैसोनी । अद्रिकानामेंकामिनी । रतिरुपिणीतयाची ॥१०॥
एकदांतीऋतुस्नाता । मनींइच्छितस्वकांता । तेचिदिनीतयासीपिता । श्राद्धार्थमृग आणह्मणे ॥११॥
श्रेष्ठमानूनिपितृवचन । प्रवेशकरीमहावन । भार्येमाजीवेधलेंमन । वीर्यस्खलनजाहलें ॥१२॥
वृथानोहेंमाझेरेत । मनींऐसेविचारीत । वटपत्रपुटींठेवित । ससाण्याशीदीधलें ॥१३॥
ह्मणेममगृहींजाऊन । येईआद्रिकेसीदेऊन । पक्षीनिघाला आज्ञावंदुन । चोंचेतद्रोणधरियेला ॥१४॥
तवमार्गीदुजाएक । ससाणापातलाअणिक । भक्ष्यजाणोनी एकाएक । वेगेंझडपघातली ॥१५॥
दोघेतेव्हायुद्धकरीत । द्रोणपडला यमुनेंत । मासोळीतत्काळभक्षित । राजवीर्यदैवयोगें ॥१६॥
पक्षीगेलेमनोगती । मत्सी झालीगर्भवती । विप्रशापेंदेवयुवती । गिरिकानामेंशफरीही ॥१७॥
हीएकदायमुनेंत । सहजहोतीक्रीडत । विप्रएकस्नानकरीत । खोडीकेलीतयाची ॥१८॥
विप्रपद आकर्षिला । पाहूनब्राह्मणकोपला । सवेचीशापदीधला । होयमत्सीदुष्ठेतूं ॥१९॥
प्रार्थनाकरितां द्रवला । मग उःशापवदला । मनुष्यसंततीतुजला । होतांचिजाणशापांत ॥२०॥
तीचि जाणाहीशफरी । जाळेटाकोनिभिल्लधरी । मत्सीनेऊनीत्यानेंघरी । चिरिलीत्याणेस्वहस्तें ॥२१॥
तवकन्याआणिपुत्र । मदनरुप अतिविचित्र । सुलक्षण आणिसुगात्र । निषाद पाहूनतोषला ॥२२॥
बाळ उचलोनीसत्वर । राजासिदेईधीवर । वृत्त ऐकूनीउपरीचर । परम आश्चर्यकरीतसे ॥२३॥
पुत्रघेतलाठेवून । कन्यादिलीनिषादालागून । निधी सांपडतांअर्धधन । प्राप्तकर्त्यादेइजे ॥२४॥
ऐसीशास्त्रमर्यादा । जाणोनिकन्यानिषादा । देवोनीपुत्रसंपदा । अर्धघेतलीराजानें ॥२५॥
मत्स्यनामतोविख्यात । नृपझालासूर्य वंशांत । तोदेशनामपावत । मत्स्य ऐसेअद्यापी ॥२६॥
कन्यातीदाशसदनीं । राहेसुखेंइंदुवदनी । तवएकदापरशरमुनी । प्राप्तझालास्वइच्छें ॥२७॥
निषादासीह्मणेऋषी श्वर । आह्मासीजाणेंयमुनापार । नौकाआणिसत्वरा । तातडीआहेआपणा ॥२८॥
निषादेकरितांभोजन । ऋषीचेऐकिलेंवचन । कन्येसीसांगेपैलनेउन । तपोधनासीयेईजे ॥२९॥
ऐकतांचीउडुप आणिलें । माजीऋषीबैसले । हातींघेउनियाअवले । नौकानेईते कालीं ॥३०॥
षोडषवर्षातीतरुणी । दोनीहातेंखेवीतरणी । पुष्टस्तनस्पष्टपणी । दिसतीतेव्हांमुनिवर्या ॥३१॥
पाहतांचिमुनीमोहिला । मदनेंस्वशरेताडिला । अंतरी व्यथितजाहला । नसुचेमगकांहींच ॥३२॥
दक्षिणहस्तेंतिचाहस्त । धरिलातेव्हांआकस्मात । आलिंगनकरुंपहात । झिटकारुनतीबोले ॥३३॥
अहोतुम्हीब्राह्मण उंच । मीतोभिल्लीअतिनीच । टाकोनिधर्माचीरुच । अधर्मकरुंपाहता ॥३४॥
सोडासोडा ममहात । पैलतोपितादेखत । ममदेहीघाणीयेत । विटेनाकींमानस ॥३५॥
ऋषीम्हणे सुंदरी । मदनेंव्यापिलोंअंतरीं । अनुकूलहोयप्रेमभरी । माग इच्छितजेंअसे ॥३६॥
बोलुनीत्वरित । धुकेंरचिलेंअकस्मात । योजनगंधातिजप्रत । केलीतत्काळतपोबळें ॥३७॥
जीपूर्वीमीनगंधा । ऋषीकरीयोजनगंधा । अतिपरिमळसुगंधा । लुब्धषटपदधांवती ॥३८॥
ऋषिकृत्यपाहुनी । विस्मयजाहलातिचेमनीं । म्हणेपैलपारजाउनी । इच्छितसाधीआपुलें ॥३९॥
एवंमुनीसीशांतवीलें । उडुपपैलथडानेलें । भूमीदोघेउतरले । सवेचिआलिंगीतियेसी ॥४०॥
तवतीह्मणेहोमुनी । तुह्मीजालमजभोगुनी । मीहोईनगर्भिणी । पिताकायह्मणेल ॥४१॥
जरीमजवरीप्रसन्न । तरीद्यावेंवरदान । पुत्रव्हावातुजसमान । जगवि ख्यातमहायोगी ॥४२॥
नकळोंहेकोणासी । कन्यात्वमाझेंननासी । अक्षयभोगी नसुगधासी । तारुण्यसदाअसावें ॥४३॥
अवश्यह्मणोनिऋषी । रममाणजाहलाति येशीं । स्नानकरुनयमुनेशी । निघूनगेलास्वतंत्र ॥४४॥
तत्कालप्रसवलीसुत । दुजाजे वींपद्मजात । जटाधारीदीप्तिमंत । साक्षाद्विष्णूअवतरला ॥४५॥
निघालामातेसीवंदून । ह्मणमातपाजाईन । सुखेंऐसपितृसदन । स्मरतांप्रगटेमतुजजवळी ॥४६॥
प्रगट विलेतम अमुप । स्थळझालेंकृष्णरुप । जन्मस्थानकृष्णद्वीप । कृष्णद्वैपायननामत्याचें ॥४७॥
वेदाचेविभागकेले । चारशिष्यपढविले । सुमंतुजैमिनिपैल । वैशंपायनतो चौथा ॥४८॥
असितदेवलशुक । पुराणाचेंप्रवर्तक । महाभारतसम्यक । रचिलेंस्वयेगुरुनें ॥४९॥
तत्काळझालीगभर्वती । सवेचपावलीप्रसूती । सतीआणिसत्यवती । नामपावलीव्यासमाता ॥५०॥
पुनःस्वस्थळांतीगेली । दाशासमीपबैसली । कोणीही तीसनोळखिळी । प्रसुतादिलक्षणें ॥५१॥
एवंव्यासजन्मकथन । ऐकविंलेपरमपावन । महच्चरित्र ऐकून । संशयाविष्टव्हावें ॥५२॥
जयांचेंचरित्र ऐकतां । झाडणीहोयपाप पर्वता । जीअवश्यभवितव्यता । होणेंतेचिअचूक ॥५३॥
नातरीदाशकन्येशी । मोहें केवीमहाऋषि । कर्तव्यजेंमहामायेशी । घडेतेंचीसर्वथा ॥५४॥
श्लोकभागवतींशत । व्यासजन्मकथांमृत । परांबावदलींप्राकृत । सुरसपुण्यदचरित्रहें ॥५५॥
द्वितीयस्कंदे प्रथमोऽध्यायः ॥ अ० १ ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP