ज्याच्या दृष्टिपुढें सुर सेना समरांत परम दम्रा त्या ॥
शुंभ्र विलोकी निहता प्राणसम ध्वस्तपरमद भ्रात्या ॥१॥
त्याही विलोकी ध्वस्ता विध्वस्ताऽशेष सुर सभा सेना ॥
ज्याच्या नव नव सुयशा हुनि मजा अमृत सुरस मासेना ॥२॥
बंधु वर्धे सैन्य वधें शुंभ क्षोभें लयाऽग्निशों तोलें ॥
त्या देवीसि कडकडुनि जड कडु निपडुचि रणीं असें बोलें ॥३॥
साऽहंकारे दृष्टें दुर्भे शौर्य धरुं नको गर्व ॥
अन्याचें बळ आश्रय करुनि करिशी युद्ध हें वृथा सर्व ॥४॥
श्रीद्र्ग्या त्यासि ह्मणे रे दृष्टा ऐक साधु धी रहिता ॥
मी एकलीस आहें या विश्वा माजी साधु धीर हिता ॥५॥
ज्या ब्रह्माणी प्रमुखा माझ्याचि विभुति जाण पापा हें ॥
मजमाजि समस्ताही झा करितात प्रवेश हा पाहें ॥६॥
हें ह्मणतां ब्रह्माणी प्रमुखा त्या देवता स्व गेद्दांत ॥
सर्वा प्रवेशल्पा त्या दुर्गेच्या तत्क्षणीं च देहांत ॥७॥
देवींच्या वृदांतें निरुपिजे जेवि भुमि कुंभातें ॥
नेउनि विलायासि ह्मणे सर्वाद्या सर्वभुति शुंभातें ॥८॥
होतीं प्रगट त्रिजगीं साधु हित करुनि असाधु वध मांजीं ॥
म्यां आअरिली रुपें तीं सुबहुमतें श्रुतींस अधमा जीं ॥९॥
मी एकलीच आतां उरलें आहेंरणांत न चपाप ॥
हुं हाणबाण जण स्त्रीं न मज तुला घडेल नच पाप ॥१०॥
ऐसें बोलुनि देवी आरंभी भव्य समर सन्नास ॥
ज्यातें पाहुनि झाले सर्व महेद्रादी अम्र सत्रास ॥११॥
शस्त्रास्त्रें देवींनें जीं त्या समरांत सोडिलीं होतीं ॥
शुभें प्रतिशस्त्रास्त्रें योजिनिं तत्काळ मोडिलीं होतीं ॥१२॥
देवींही शुंभाच्या खडी लीलेंकरुनि शस्त्रातें ॥
अस्त्रातेंही उडती वात जसा शुष्क सुक्ष्म वस्त्रातें ॥१३॥
परमेश्वरी करी जें ग्री वर्णु आज काय बा हुं तें ॥
परशस्त्रांस्त्रतें चि न दे बहुत शिव्या हि लाज बाहु तें ॥१४॥
कोंडी पळभरि शुभ श्रीमज्जगदीश्वरीस शरभवणीं ॥
पर शर झाले दुर्गा शर वृंदीं जेंविं सिंह शरभ वनीं ॥१५॥
ह्मणति सुरा झगटतसे शिरिं द्याया वामपाद परें मेला ॥
परमेला हा जिंकिले तरि पुरविनि काम पादम रमेला ॥१६॥
स्वाच्छादक शर पटलें छेदुनि खंडुनि शंभ चापतें ॥
जेविं परा विद्या जनि मृति हेत्वऽज्ञान रुप पापतं ॥१७॥
मग शुंभ शक्तितं धरी चक्रें खंडी तिला हि परमा ती ॥
शतचंद्र चर्म असि घे त्याची हि करावया सि पर माती ॥१८॥
चुरिलें शिवा शरांनी त्या असिसश चर्म रविकराऽमळ ॥
कीं अविनीताचें यश करितां हि सयाय पविकरा मळतें ॥१९॥
केला जगदाद्येनें लीलेनें संगरीं विरथ बकला ॥
बहुधा बहुधाष्टयेधें मुद्गर न रहावया शिर थबकला ॥२०॥
येता धांवत खडी बाणांही मुद्गरां शिवा राया ॥
तरी येचि शालि राशि प्रति जैसा मुद्रराशि वाराया ॥२१॥
न पर भृतिसि साहे माशीशी स्पर्शतां जसा कृष्टी ॥
जगदंबेच्या हृदयीं हाणी धावोनि दृष्ट तो मृष्टी ॥२२॥
देवी क्षितिवर धडलड पाडी हाणुनि उरीं अरीस तंळें ॥
होईल सुबहुत कसें आत्यगुणें सागरापरीस तळें ॥२३॥
सहसा उडुरि शिवेतें घेउनि गगनांत जाप मग नींच ॥
जरिहि निरधारा तो करी अरिशींबाहुयुद्ध गगनींच ॥२४॥
ते प्रथम सिद्ध मुनि जन विस्मय कारण नियुद्ध बहुरुचिर ॥
झालें त्या श्रीदुर्गा दैत्याशी खंगिणी अतुल सुचिर ॥२५॥
सुचिर नियुध व्योमीं करुनि धरुनि अरिहरिसहगजातें ॥
सुखव्हाया फिरवि अधिक जरि सकळांपारिसरिसहगजांतें ॥२६॥
फिरवुनि भरभर गरगर अंबा लंब सनिभ मुकेशी ॥
ती आपटी महिवरी शुंभ तनु जीवना मति मुकेशी ॥२७॥
उठुनि वळुनि मुष्टि सबळ कुंदुकसा तो पुन्हा उसळला जो ॥
त्या पाहुनि नच लवणें स्ववृत्त ह्मणतां पुन्हा मुसळ लाजो ॥२८॥
नीच निमट त्या ह्मणुनि मुष्टि विदारुनि वक्ष माराया ॥
तेव्हां सदयाहि करीं जगदंबा लेश न क्षमा राया ॥२९॥
शुंभातें जयमुलेम शुलें हृदयांत चंडिका ताडी ॥
शत्रु शतशमनशीला लीलालेशेम्चि भुतळीं पाडी ॥३०॥
झाला असतां तो खळ सुर मद नग भित नव क्षण रणातें ॥
पावे शुलाघातें होतां मग भिन्न वक्ष मरणातें ॥३१॥
पडतां तेणें सकळा भु सद्वीपा ससागरा सनगा ॥
कांपविली एक न स्या देवींचें मात्र कापलें मन गा ॥३२॥
मग लागल्या कराया रायामागें चि यान सागगा ॥
तो जेविं ताप मोह प्रद होय न तेविं मानस गगा ॥३३॥
विश्व प्रसन्न झालें होय जसें भास्करोदयीं कमल ॥
उप्तात मेघशमले सर्व व्योम प्रकाशलेम अमल ॥३४॥
झाले प्रहर्ष निर्भर मानस सुरज जे महाधिनें गलित ॥
गंधर्वाहीं केलें गान शिवासद्यशोमृतें ललित ॥३५॥
वाजविलीं बहु वाद्यें त्या शत सहस्त्र वादकांहीं हो ॥
तद्रव हित कर्णाला न व रुचला इतर वाद कांहीं हो ॥३६॥
अतिमुदित अप्सरांचे गण तेव्हा नाचले शत ज्ञाते ॥
निज भान धरुं तेती न च त्यांचे नाच लेश तज्ज्ञा ते ॥३७॥
मंद सुंगंध सुशीतळ वायु सदा लागले वहायास ॥
सुप्रभ होय दिवाकर त्यांचे पद्म ही सुखें पहायास ॥३८॥
पेटत नव्हते पुर्वी जे अग्नि सुखें चि पेटले हो ते ॥
होते खिन्न मुदित मग होउनि बहु त्यांसि भेटले होते ॥३९॥
कांदबिनी शिवेतें जो शतमखमुख तयाहि लेखातें ॥
चातक मयुर ऐसें तच्चारितहि अमृतवर्ष लेखा तें ॥४०॥
समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : January 28, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP