संकीर्ण - कलम ३६४ ते ३६७

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.


मोठी बंदरे व विमानतळ यासंबंधी विशेष तरतुदी. ३६४.
(१) या संविधानात काहीही अंतर्भूत असले तरी, राष्ट्रपती जाहीर अधिसूचनेद्वारे असा निदेश देऊ शकेल की, अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा दिनांकास व तेव्हापासून---
(क) संसदेने किंवा राज्य विधानमंडळाने केलेला एखादा कायदा, एखादे मोठे बंदर किंवा विमानतळ यांना लागू होणार नाही अथवा त्या अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा अपवादांसह किंवा फेरबदलांसह त्याना लागू होईल. अथवा
(ख) एखादा विद्यमान कायदा हा, एखादे मोठे बंदर किंवा विमानतळ यांच्या बाबतीत उक्त्त दिनांकापूर्वी केलेल्या किंवा करण्याचे वर्जिलेल्या गोष्टी खेरीजकरून एरव्ही. निष्प्रभावी होईल. अथवा अशा बंदराला किंवा विमानतळाला लागू होताना. अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा अपवादांसह किंवा फेरबदलांसह प्रभावी होईल.
(२) या अनुच्छेदात---
(क) “ मोठे बंदर” याचा अर्थ, संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या किंवा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या द्वारे किंवा त्याखाली मोठे बंदर म्हणून घोषित केलेले बंदर. असा आहे आणि त्या त्या वेळी अशा बंदराच्या सीमांमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व क्षेत्रांचा त्यात समावेश आहे.
(ख) “विमानतळ” याचा अर्थ. हवाईमार्ग, विमाने व विमानचालन यासंबंधीच्या अधिनियमितींच्या प्रयोजनार्थ. व्याख्य केल्याप्रमाणे विमानतळ. असा आहे.

संघराज्याने दिलेल्या निदेशांचे अनुपालन करण्यात किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यात कसूर केल्याचा परिणाम. ३६५.
या संविधानात असलेल्यांपैकी कोणत्याही तरतुदीखाली संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराचा वापर करून दिलेल्या कोणत्याही निदेशांचे अनुपालन करण्यात किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यात कोणत्याही राज्याने कसूर केली असेल त्या बबतीत त्या राज्याचे शासन या संविधानाच्या तरतुदींना अनुसरून चालवणे शक्य नाही. अशी परिस्थिती उद्‌भवली आहे. असे राष्ट्रपतीने ठरवणे कायदेशीर होईल.

व्याख्या. ३६६.
या संविधानात, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर. पुढील शब्दप्रयोगांना याद्वारे नेमून दिल्याप्रमाणे ते ते अर्थ असतील. ते म्हणजे:---
(१) “ कृषि-प्राप्ति” याचा अर्थ. ज्या व्यक्त्तीच्य प्रजनकांपैकी पिता किंवा त्या पुरुष परंपरेतील अन्य कोणीही मूळचा युरोपीय आहे किंवा होता. पण जी व्यक्त्ती भारताच्या राज्यक्षेत्राच्या आत अधिवासी आहे आणि अशा राज्यक्षेत्रात केवळ तात्कालिक प्रयोजनांसाठी स्थायिक झालेल्या नव्हे तर त्यात नित्यश: रहिवासी असलेल्या माता-पित्याच्या पोटी जी जन्मली आहे किंवा होती ती व्यक्त्ती. असा आहे;
(३) “अनुच्छेद” याचा अर्थ. या संविधानाचा अनुच्छेद असा आहे;
(४)“ कर्जाऊ घेणे” यात, वर्षासने देऊन पैसे उभारणे हे समाविष्ट आहे व “कर्ज”
याचा अर्थ तदनुसार लावला जाईल;

(४क)    *    *    *    *    *
(५)“ खंड” याचा अर्थ, ज्या अनुच्छेदात तो शब्दप्रयोग येतो त्याचा खंड. असा आहे;
(६) “निगम कर” याचा अर्थ. तो कर जेथवर कंपन्यांनी द्यावयाचा आहे तेथवर प्राप्तीवरील कोणताही कर. असा आहे आणि ज्याच्या बाबतीत पुढील शर्ती पूर्ण होतात असा तो कर आहे:---
(क) तो कृषि-प्राप्तिच्या संबंधात आकारणीयोग्य नाही;
(ख) कंपन्यांनी भरावयाच्या कराला लागू होतील अशा कोणत्याही अधिनियमितींच्या द्वारे त्या करांच्या बाबतीत. कंपन्यांनी व्यक्त्तींनी व्यक्त्तींना द्यावयाच्या लाभांशांतून कोणतीही वजात करण्याचा प्राधिकार देण्यात आलेला नाही;
(ग) असे लाभांश मिळणार्‍या व्यक्त्तींच्या एकूण प्राप्तीची भारतीय आयकराच्या प्रयोजनार्थ गणना करताना अथवा अशा व्यक्त्तींनी द्यावयाच्या किंवा त्यांना परतावायोग्य असलेल्या भारतीय प्राप्तिकराची गणना करताना याप्रमाणे भरलेला कर हिशेबात घेण्यासाठी कोणतीही तरतूद अस्तित्वात नाही;
(७)“ तत्स्थानी असलेला प्रांत”. “तत्स्थानी असलेले भारतीय संस्थान” किंवा” तत्स्थानी असलेले राज्या” याचा अर्थ, शंकास्पद बाबतीत. विशिष्ट प्रस्तृत प्रयोजनाकरता, यथास्थिति, तत्स्थानी असलेला प्रांत. तत्स्थानी असलेले भारतीय संस्थान किंवा तत्स्थानी असलेले राज्य म्हणून राष्ट्रपती ठरवील असा प्रांत. भारतीय संस्थान किंवा राज्य. असा आहे;
(८)“ ऋण” यात. वर्षासनांच्या रुपाने मुद्दल रक्कमांची परतफेड करण्याच्या कोणत्याही आबंधनाबाबतचे कोणतेही दायित्व व कोणत्याही हमीनुसार असलेले कोणतेही दायित्व सामविष्ट आहे आणि “ ऋणभार” याचा अर्थ तदनुसार लावला जाईल:
(९)“ संपदा शुल्क” याचा अर्थ, त्या शुल्कासंबंधी संसदेने किंवा राज्य विधानमंडळाने केलेल्या कायद्यांच्या तरतुदींन्वये मृत्युनंतर संक्रामित होणार्‍या किंवा अशाप्रकारे संक्रामित होत असल्याचे मानल्या जाणार्‍या मालमत्तेचे उक्त्त कायद्यांद्वारे किंवा त्याखाली  विहित करण्यात येतील अशा नियमांना अनुसरून जे प्रधान मूल्य विनिश्चित लेले असेल त्यावर किंवा त्याच्या संदर्भात निर्धारित करावयाचे शुल्क. असा आहे:
(१०)“ विद्यमान कायदा“ याचा अर्थ, कोणताही कायदा. अध्यादेश. आदेश. उपविधी. नियम किंवा विनियम करण्याचा अधिकार असलेल्या कोणत्याही विधानमंडळाने, प्राधिकार्‍याने किंवा व्यक्त्तीने या संविधानाच्या प्रारंभापूर्वी पारित केलेला किंवा केलेला असा कायदा. अध्यादेश. उपविधी. नियम किंवा विनियम. असा आहे;
(११) “फेडरल न्यायालय” याचा अर्थ. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट, १९३५ खाली घटित झालेले फेडरल न्यायालय. असा आहे;
(१२) “माल ” यात सर्व सामग्री, विकाऊ वस्तू व जिन्नस समाविष्ट आहेत:
(१३)“ हमी” यात, एखाद्या उपक्रमाचा नफा विनिर्दिष्ट रकमेपेक्षा कमी पडल्यास पैसे भरण्याचे या संविधानाच्या प्रारंभापूर्वी पत्करलेले कोणतेही आबंधन समाविष्ट आहे;
(१४) “उच्च न्यायालय” याचा अर्थ. या संविधानाच्या प्रयोजनार्थ जे कोणत्याही राज्याचे उच्च न्यायालय म्हणून मानले गेले आहे असे कोणतेही न्यायालय, असा आहे आणि त्यात---
(क) या संविधानाखाली उच्च न्यायालय म्हणून घटित किंवा पुनर्घटित झालेले भारताच्या राज्यक्षेत्रातील कोणतेही न्यायालय. आणि
(ख) संसदेकडून कायद्याद्वारे या संविधानाच्या सर्व किंवा त्यांपैकी कोणत्याही प्रयोजनांसाठी उच्च न्यायालय म्हणून घोषित केले जाईल असे भारताच्या राज्यक्षेत्रातील अन्य कोणतेही न्यायालय. समाविष्ट आहे.
(१५)“भारतीय संस्थान” याचा अर्थ. डोमिनिअन ऑफ इंडियाच्या सरकारने ज्याला असे संस्थान म्हणून मान्यता दिली होती. असे कोणतेही राज्यक्षेत्र. असा आहे;
(१६) “भाग” याचा अर्थ, या संविधानाचा भाग, असा आहे;
(१७) “ पेन्शा” याचा अर्थ, कोणत्याही व्यक्त्तीला किंवा तिच्या बाबतीत प्रदेय असलेले कोणत्याही प्रकारचे पेन्शन-मग ते अंशदायी असो वा नसो-असा आहे. आणि त्यात अशाप्रकारे प्रदेय असे निवृत्तिवेतन. अशा प्रकारे प्रदेय असे उपदान व भविष्य निधीत वर्गणी म्हणून दिलेल्या रकमांच्या परतीदाखल अशा प्रकारे प्रदेय असलेली रक्कम किंवा रकमा.-त्यांवरील व्याज किंवा त्यांतील अन्य कोणतीही भर यासह किंवा त्याविना-समाविष्ट आहेत;
(१८)“आणीबाणीची उद्‌घोषणा” याचा अर्थ. अनुच्छेद ३५२ च्या खंड (१) खाली प्रसृत केलेली उद्‌घोषणा, अस आहे.
(१९) “ जाहीर अधिसूचना”. याचा अर्थ. भारताचे राजपत्र किंवा. यथास्थिति, एखाद्या राज्याचे राजपत्र यातील अधिसूचना. असा आहे;
(२०) “रेल्वे” यात---
(क) संपूर्णपणे नगरपालिका क्षेत्रात असलेला ट्राममार्ग. किंवा
(ख) संपूर्णपणे एका राज्यात असलेला व संसदेने कायद्याद्वारे रेल्वे नसल्याचे घोषित केलेला अन्य कोणताही दळणवळण मार्ग.
हे समाविष्ट नाहीत;
(२१)     *    *    *    *    *    *
(२२) “ अधिपती” याचा अर्थ, ज्याला राष्ट्रपतीने ” संविधान सव्विसावी सुधारणा अधिनियम. १९७१” याच्या प्रारंभापूर्वी कोणत्याही वेळी भारतीय संस्थानाचा अधिपती म्हणून मान्यता दिली होती असा राजा. संस्थानिक किंवा अन्य व्यक्त्ती अथवा. जिला राष्ट्रपतीने अशा प्रारंभापूर्वी कोणत्याही वेळी अशा अधिपतीचा उत्तराधिकारी म्हणून मान्यता दिली होती अशी कोणतीही व्यक्त्ती. असा आहे.
(२३) “अनुसूची” याचा अर्थ. या संविधानाची अनुसूची, असा आहे;
(२४) “अनुसूचित जाती” याचा अर्थ. या संविधानाच्या प्रयोजनार्थ, अनुच्छेद ३४१ खाली अनुसूचित जाती जसल्याचे मानले गेले आहे अशा जाती. वंश किंवा जमाती अथवा अशा जातीचे. वंशाचे किंवा जमातींचे भाग अथवा त्यातील गट. असा आहे;
(२५) “अनुसूचित जनजाती” याचा अर्थ. या संविधानाच्या प्रयोजनार्थ अनुच्छेद ३४२ खाली अनुसूचित जनजाती असल्याचे मानले गेले आहे, अशा जमाती किंवा जमातीसमूह अथवा अशा जमातींचे किंवा जमातीसमूहांचे भाग अथवा त्यातील गट, असा आहे;
(२६) “ कर्ज रोखे ” यात रोखेपुंजी (स्टॉक) समाविष्ट आहेत.
(२६क)     *    *    *    *    *
(२७) “उपखंड” याचा अर्थ. ज्या खंडात तो शब्दप्रयोग येतो त्याचा उपखंड. असा आहे;
(२८) “कर-आकारणी ” यात. कोणताही कर किंवा प्रकर-मग तो सरसकट असो. स्थानिक असो वा विशेष असो-बसवणे समाविष्ट आहे. आणि “कर” याचा अर्थ तदनुसार लावना जाईल.
(२९) “प्राप्तीवरील कर” यात. अतिरिक्त्त नफा-कराच्या स्वरूपाचा कोणताही कर समाविष्ट आहे;
(२९)“ मालाची विक्री किंवा खरेदी यावरील कर “ या शब्दप्रयोगात पुढील करांचाही समावेश होतो:---
(क) एखाद्या संविदेच्या अनुसार असेल त्याच्यातिरिक्त्त इतर रीतीने. कोणत्याही मालावरील मालकीहक्काचे रोखीने. आस्थगित प्रदानावर किंवा अन्य मूल्यवान प्रतिफलार्थ हस्तांतरण करण्यावरील कर;
(ख) एखाद्या कार्य-संविदेची अंमलबजावणी करताना मालावरील मालकीहक्क (मग तो मालाच्या स्वरुपात असो वा कोणत्याही अन्य स्वरुपात असो) हस्तांतरित होत असल्यास अशा हस्तांतरणावरील कर;
(ग) भाडे खरेदीने किंवा हप्त्याहप्त्याने प्रदान करण्याच्या इतर कोणत्याही पद्धतीने केलेल्या मालाच्या सुपूर्दगीवरील कर;
(घ) कोणत्याही मालाचा कोणत्याही प्रयोजनाकरता वापर करण्याचय हक्काचे रोखीने, आस्थगित प्रदानावर किंवा इतर मूल्यवान प्रतिफलार्थ हस्तांतरण करण्यावरील कर मग ते हस्तांतरण एखाद्या विनिर्दिष्ट मुदतीकरिता असो वा नसो;
(ङ) कोणत्याही विधिसंस्थापित सनलेल्या संघाने किंवा व्यक्त्तींच्या निकायाने आपल्या एखाद्या सदस्यास रोखीने, आस्थगित प्रदानावर किंवा इतर मूल्यावान प्रतिफलार्थ केलेल्या मालाच्या पुरवठयावरील कर;
(च) एखादा अन्नपदार्थ म्हणून किंवा मानवी सेवनासाठी असलेली कोणतीही वस्तू म्हणून किंवा कोणतेही पेय मग ते मादक असो वा नसो म्हणून असलेल्या मालाच्या. कोणत्याही सेवेच्या रूपाने किंवा अशा सेवेचा भाग म्हणून किंवा अन्य कोणत्याही रीतीने, केलेल्या पुरवठयावरील कर. मात्र, असा पुरवठा किंवा सेवा ही रोखीने, आस्थगित प्रदानावर किंवा अन्य मूल्यवान प्रतिफलार्थ करण्यात किंवा पुरवण्यात आली असावी,-आणि कोणत्याही मालाचे अशा रीतीने केलेले हस्तांतरन किंवा केलेली सुपूर्दगी किंवा पुरवठा हा, असे हस्तांतरण. सुपूर्दगी किंवा पुरवठा करणार्‍या व्यक्त्तीने केलेली विक्री आहे आणि ज्या व्यक्त्तीकडे असे हस्तांतरण. सुपूर्दगी किंवा पुरवठा करण्यात आला असेल त्या व्यक्त्तीने त्या मालाची केलेली खरेदी आहे. असे समजले जाईल.
(३०) “ संघ राज्यक्षेत्र” याचा अर्थ, पहिल्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेले कोणतेही संघ राज्यक्षेत्र असा आहे व त्यामध्ये. भारताच्या राज्यक्षेत्रात समाविष्ट असलेल्या पण त्या अनुसूचीत विनिर्दिष्ट न केलेल्या अन्य कोणत्याही राज्यक्षेत्राचा समावेश आहे.

अर्थ लावणे. ३६७.
(१) संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर. “ सर्वसाधारण वाक‌खंड अधिनियम. १८९७ जनरल क्लॉजेस अ‍ॅक्ट जसा डोमिनिअन ऑफ इंडियाच्या विधानमंडळाच्या अधिनियमाचा अर्थ लावण्याबाबत लागू आहे तसा तो, अनुच्छेद ३७२ खाली त्यात केला जाईल अशा कोणत्याही अनुकूलनांसह व फेरबदलांसह या संविधानाचा अर्थ लावण्याबाबत लागू असेल.
(२) संसदेचे अधिनियम किंवा तिने केलेले कायदे यासंबंधी अथवा राज्याच्या विधानमंडळाचे अधिनियन किंवा त्याने केलेले कायदे यासंबंधी या संविधानात असलेल्या कोणत्याही निर्देशामध्ये. राष्ट्रपतीने काढलेल्या अध्यादेश किंवा. यथास्थिति, राज्यपालाने काढलेला अध्यादेश यासंबंधीचा निर्देश समाविष्ट आहे. असा त्याचा अर्थ लावला जाईल.
(३) या संविधानाच्या प्रयोजनार्थ “परकीय राज्य” याचा अर्थ, भारताव्यतिरिक्त्त अन्य कोणतेही राज्य असा आहे:
परंतु, संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींना अधीन राहून राष्ट्रपतीला आदेशाद्वारे, कोणतेही राज्य त्या आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा प्रयोजनांसाठी परकीय राज्य नसल्याचे घोषित करता येईल.

N/A

References : N/A
Last Updated : January 14, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP