नगरपालिका - २४३ त ते २४३ न

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.


व्याख्या. २४३त.
या भागात संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर---

(क) “समिती” याचा अर्थ. अनुच्छेद २४३ध अन्वये घटित केलेली समिती. असा आहे;

(ख) “ जिल्हा”  याचा अर्थ. एखाद्या राज्यातील जिल्हा. असा आहे;

(ग)“ महानगर क्षेत्र” याचा अर्थ. दहा लाख किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेले. एक किंवा अधिक जिल्हे समाविष्ट असलेले आणि दोन किंवा अधिक नगरपालिका किंवा पंचायती किंवा इतर लगतचे क्षेत्र मिळून बनलेले आणि दोन किंवा अधिक नगरपालिका किंवा पंचायती किंवा इतर लगतचे क्षेत्र मिळून बनलेले व राज्यपाल जाहीर अधिसूचनेद्वारे या भागाच्या प्रयोजनासाठी महानगर क्षेत्र असल्याचे विनिर्दिष्ट करील असे क्षेत्र. असा आहे;

(घ)“ नगरपालिका क्षेत्र” या अर्थ. राज्यपालाने अधिसूचित केले असेल असे नगरपालिकेचे प्रादेशिक क्षेत्र. असा आहे;

(ड)“ नगरपालिका ” या अर्थ. अनुच्छेद२४३ थ अन्वये घटित करण्यात आलेली स्वराज्य संस्था, असा आहे;

(च) “ पंचायत” याचा अर्थ. अनुच्छेद २४३ख अन्वये घटित करण्यात आलेली प्रंचायत. असा आहे;

(छ)“ लोकसंख्या” याचा अर्थ. जिची संबद्ध आकडेवारी प्रकाशित करण्यात आली असेल अशा लगतपूर्वीच्या जनगणनेद्वारे निश्चित करण्यात आलेली लोकसंख्या. असा आहे.

नगरपालिका घटित करणे. २४३थ.
(१) या भागाच्या तरतुदीनुसार प्रत्येक राज्यामध्ये.---

(क) संक्रमणी क्षेत्रासाठी म्हणजेच. ग्रामीण क्षेत्रामधून नागरी क्षेत्रामध्ये ज्याचे संक्रमण होत असेल अशा क्षेत्रासाठी एक नगर पंचायत (मग तिला कोणत्याही नावाने संबोधण्यात येवो);

(ख) थोडया लहान नागरी क्षेत्रासाठी एखादी नगर परिषद; आणि

(ग) अधिक मोठया नागरी क्षेत्रासाठी एखादी महानगरपालिका.

घटित करण्यात येईल:

परंतु, क्षेत्राचा आकार आणि त्या क्षेत्रातील औद्योगिक आस्थापनांकडून पुरविण्यात येणार्‍या किंवा पुरविण्याचे प्रस्तावित केलेल्या नगरपालिका सेवा आणि राज्यपालाला योग्य वाटतील असे इतर घटक विचारात घेऊन. राज्यपाल जाहीर अधिसूचनेद्वारे जे क्षेत्र औद्योगिक वसाहत म्हणून घोषित करील अशा नागरी क्षेत्रात किंवा त्याच्या भागात या खंडान्वये नगरपालिका घटित करता येणार नाही.

(२) या अनुच्छेदामध्ये “संक्रमणी क्षेत्र”,”थोडे लहान नागरी क्षेत्र“ किंवा” अधिक मोठे नागरी क्षेत्र” याचा अर्थ. त्या क्षेत्राची लोकसंख्या. तेथील लोकसंख्येची घनता. स्थानिक प्रशासनासाठी निर्माण होणारा महसूल. कृषीतर कार्यक्रमांमधील रोजगाराची टक्केवारी व आर्थिक महत्त्वाचे किंवा राज्यपालाला योग्य वाटतील असे इतर घटक विचारात घेऊन. राज्यपाल या भागाच्या प्रयोजनांसाठी जाहीर अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट करील असे क्षेत्र. असा होतो.

नगरपालिकांची रचना. २४३द.
(१) खंड (२) मध्ये तरतूद करण्यात आली असेल ती खेरीजकरुन, नगरपालिकेतील सर्व जागा नगरपालिका क्षेत्रातील प्रादेशिक मतदारसंघांमधून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेल्या व्यक्त्तींद्वारे भरण्यात येतील आणि या प्रयौजनासाठी प्रत्येक नगरपालिका क्षेत्राची वॉर्ड म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रादेशिक मतदारसंघांमध्ये विभागणी करण्यात येईल.

(२) राज्य विधान मंडळ. कायद्याद्वारे.---

(क) (एक) नगरपालिका प्रशासनामध्ये विशेष ज्ञान किंवा अनुभव असणार्‍या व्यक्त्तींना;

(दोन) पूर्ण किंवा आंशिक नगरपालिका क्षेत्र मिळून बनलेल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार्‍या लोकसभा सदस्यांना आणि राज्याच्या विधानसभेच्या सदस्यांना;

(तीन) नगरपालिका क्षेत्रामधे मतदार म्हणून नोंदणी झालेल्या राज्यसभा सदस्यांना आणि विधानपरिषद सदस्यांना;

(चार) अनुच्छेद २४३ध च्या खंड (५) अन्वये घटित करण्यात आलेल्या समित्यांच्या सभाध्यक्षांना.

नगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व देण्यासाठी तरतूद करू शकेल:

परंतु. परिच्छेद (एक) मध्ये निर्देश केलेल्या व्यक्त्तींना नगरपालिकेच्या बैठकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार असणार नाही;

(ख) नगरपालिकेच्या सभाध्यक्षाची निवड करण्याच्या रीतीसाठी तरतूद करू शकेल.

वॉर्ड समित्या घटित करणे व त्यांची रचना. इत्यादी. २४३ध.
(१) तीन लाख किंवा अधिक लोकसंख्या असणार्‍या नगरपालिकांच्या प्रादेशिक क्षेत्रामध्ये. एका किंवा अधिक वॉर्डांचा समावेश असलेल्या वॉर्ड-समित्या घटित करण्यात येतील.

(२) राज्य विधानमंडळ. कायद्याद्वारे.---

(क) वॉर्ड समित्यांची रचना व त्यांचे प्रादेशिक क्षेत्र;

(ख) वॉर्ड समितीमधील जागा ज्या रीतीने भरावयाच्या ती रीत.

यासंबंधात तरतूद करू शकेल.

(३) वॉर्ड समितीच्या प्रादेशिक क्षेत्रामधील वॉर्डाचे प्रतिनिधित्व करणारा नगरपालिका सदस्य हा त्या समितीचा सदस्य असेल.

(४) वॉर्ड समितीमध्ये.---

(क) एका वॉर्डाचा अंतर्भाव असेल अशा बाबतीत. त्या वॉर्डाचे प्रतिनिधित्व करणारा सदस्य; किंवा

(ख) दोन किंवा अधिक वॉर्डांचा अंतर्भात असेल अशा बाबतील, अशा वॉर्डांचे नगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करणार्‍या सदस्यांमधून वॉर्ड समितीच्या सदस्यांनी निवडला असेल असा एक सदस्य. हा त्या समितीचा सभाध्यक्ष असेल;

(५) या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे. वॉर्ड समिती व्यतिरिक्त्त आणखी कोणतीही समिती घतित करण्यासाठी कोणतीही तरतूद करण्यास राज्य विधानमंडळास प्रतिबंध होतो. असे मानण्यात येणार नाही.

जागांचे आरक्षण. २४३न.
(१)  प्रत्येक नगरपालिकेमध्ये अनुसूचित जातींसाठी आणि अनूसूचित जनजातींसाठी जागा राखून ठेवण्यात येतील आणि आणि अशाप्रकारे राखून ठेवन्यात आलेल्या जागांच्या संख्येचे त्या नगरपालिकेमध्ये थेट निवडणूकीद्वारे भरावयाच्या जागांच्या एकूण संख्येशी असलेले प्रमाण हे. शक्य होईल तेथवर. त्या नगरपालिका क्षेत्रामधील अनुसूचित जातींच्या किंवा त्या नगरपालिका क्षेत्रातील अनुसूचित जनजातींच्या लोकसंख्येचे त्या क्षेत्रातील एकूण लोकसंख्येशी जे प्रमाण असेल. तेच असेल आणि नगरपालिकेतील लोकसंख्येचे त्या क्षेत्रातील एकूण लोकसंख्येशी जे प्रमाण असेल. तेच असेल आणि नगरपालिकेतील विविध मतदारसंघांमध्ये आळीपाळीने अशा जागांचे वाटप करण्यात येईल.

(२) खंड (१) खाली राखून ठेवलेल्या जागांच्या एकूण संख्येच्या एक-तृतीयांशापेक्षा कमी नसतील एवढया जागा अनुसूचि जातींच्या. किंवा यथस्थिति. अनुसूचित जनजातींच्या महिलांसाठी राखून ठेवण्यात येतील.

(३) प्रत्येक नगरपालिकेमधीत थेट निवडणुकीद्वारे भरावयाच्या जागांच्या एकूण संख्य़ेच्या एक-तृतीयांशापेक्षा कमी नसतील एवढया जागा (अनुसूचित जातींच्या व अनुसूचित जनजातींच्या महिलांसाठी राखून ठेवलेल्या जागा धरून) महिलांसाठी राखून ठेवण्यात येतील आणि नगरपालिकेतील विविध मतदारसंघामध्ये आळीपाळीने अशा जागांचे वाटप करण्यात येईल.

(४) नगरपालिकांमधील सभाध्यक्षांची पदे राज्य विधानमंडळ कायद्याद्वारे तरतूद करील अशा रीतीने अनुसूचित जाती. अनुसूचित जनजाती आणि महिला यांच्यासाठी राखून ठेवण्यात येतील;

(५) खंड (१) आणि (२) खालील जागांचे आरक्षण आणि खंड (४) खालील सभाध्यक्षांच्या पदांचे आरक्षण हे (महिलांसाठी असलेल्या आरक्षणाव्यतिरिक्त्त) अनुच्छेद ३३४ मध्ये विनिर्दिष्ट केलेला कालावधी समाप्त झाल्यावर निष्प्रभावी होईल.

(६) या भागातील कोणत्याही गोष्टीमुळे. कोणत्याही राज्याच्या विधानमंडळास. मागासवर्गीय नागरिकांसाठी कोणत्याही नगरपालिकेमध्ये जागा राखून ठेवण्यासाठी किंवा नगरपालिकांमध्ये सभाध्यक्षांची पदे राखून ठेवण्यासाठी कोणतीही तरतूद करण्यास प्रतिबंध होणार नाही.

N/A

References : N/A
Last Updated : January 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP