भाग दोन - कलम ९, १०, ११

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली .


कलम ९, १०, ११

परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादणार्‍या व्यक्ती नागरिक नसणे .

९ . कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादिले असेल तर , ती व्यक्ती अनुच्छेद ५ च्या आधारे भारताची नागरिक असणार नाही , अथवा अनुच्छेद ६ किंवा अनुच्छेद ८ च्या आधारे भारताची नागरिक आहे असे मानले जाणार नाही .

नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे .

१० . या भागातील पूर्वगामी तरतुदींपैकी कोणत्याही तरतुदीखाली जी भारताची नागरिक आहे किंवा असल्याचे मानले जाते अशा प्रत्येक व्यक्तीचे नागरिकत्व , संसद जो कोणताही कायदा करील त्याच्या तरतुदींच्या अधीनतेने चालू राहील .

संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनियमन करणे .

११ . या भागाच्या पूर्वगामी तरतुदींतील कोणत्याही गोष्टींमुळे नागरिकत्वाचे संपादन व समाप्ती आणि नागरिकत्वविषयक अन्य सर्व बाबी यांच्यासंबंधी कोणतीही तरतूद करण्याच्या संसदेच्या अधिकाराचे न्यूनीकरण होणार नाही .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-12-19T21:42:16.5530000