मराठी मुख्य सूची|शासकीय साहित्य|भारताची राज्यघटना|नागरिकत्व| कलम ८ नागरिकत्व कलम ५ कलम ६ कलम ७ कलम ८ कलम ९, १०, ११ भाग दोन - कलम ८ भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत . २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली . Tags : bharatconstitutionindiaभारतराज्यघटनासंविधान कलम ८ Translation - भाषांतर मूळच्या भारतीय असलेल्या , पण भारताबाहेर राहणार्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क . ८ . अनुच्छेद ५ मध्ये काहीही असले तरी , जी व्यक्ती किंवा जिच्या मातापित्यांपैकी किंवा आजा - आजींपैकी कोणीही एक " गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अक्ट , १९३५ " ( मूळात अधिनियमित केल्याप्रमाणे ) यात व्याख्या केलेल्या भारतात जन्मले होते आणि जी त्याप्रमाणे व्याख्या केलेल्या भारताच्या बाहेरील कोणत्याही देशात सामान्यतः निवास करत आहे अशी कोणतीही व्यक्ती , जर तिने त्या त्या काळी ज्या देशात ती राहात असेल त्या देशातील भारताच्या राजदौतिक किंवा वाणिज्यदौतिक प्रतिनिधीकडे , डोमिनिअन ऑफ इंडियाच्या सरकारने किंवा भारत सरकारने विहित केलेल्या नमुन्यात व रीतीने या संविधानाच्या प्रारंभापूर्वी वा नंतर नागरिकत्वासाठी केलेल्या अर्जावरुन अशा राजदौतिक किंवा वाणिज्यदौतिक प्रतिनिधीने तिची भारताची नागरिक म्हणून नोंदणी केलेली असेल तर , भारताची नागरिक असल्याचे मानले जाईल . N/A References : N/A Last Updated : December 19, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP