अंक तिसरा - प्रवेश दुसरा

गडकर्‍यांची नाटके मराठी भाषेचे कायमचे अलंकार बनलेले आहेत, आपली नाटके वाङ्मयदृष्ट्या वरच्या दर्जाची व्हावी याची त्यांनी फार खबरदारी घेतली होती.


[ पिलंभट व बैराग्याच्या रुपाने वसंत प्रवेश करितात.]

पिलंभट: मग काय, इतक्यांतच हा वेडयांचा बाजारआटोपताघ्यावयाचा म्हणतां ?
वसंत: अजून सुद्धां इतक्यांतच का ?
पिलंभट: म्हणजे मला जारीची जुळव्वाजुळव करावी लागणार?
वसंत: त्याला कसें करायचें ? गरज आपल्याला आहे ना ?
पिलंभट: बरें मग सांगा पाहूं काय काय करायचें तें ? या गडबडींत मी पूर्वीनुसंधान बरेंचसें विसरून गेलों आहें. आधीं सांपडेल तसतसें एक एक कामहातावेगळें करायचें. तो नाटकी बाळाभाऊ आहेना, त्याच्याकडून आतां एक दोन दिवसांत पत्रयेईल कीं मला कांहीं वेणूशीं लग्न करावयाचें नाहीं म्हणून !
पिलंभट: तें कशावरून आणि कां ?
वसंत: त्याचा खुलासा मी सावकाशीनें करीन. सध्यां तुम्हीं असें पत्रखात्रीनें येणारएवढें धरून चाला आणि हें यशोदाबाईंजवळ देव खेळवितांना सांगा; तात्यासाहेबांजवळ भविष्यकथनाच्य अनात्यानें सांगा; वाटलें तरमाधवरावांजवळ त्रिकालज्ञानाच्या धोरणानें सांगा.
पिलंभट: आणि एखादे वेळीं बाळाभाऊचें असें पत्रन आलें म्हणजे ताडदिशीं माझ्या पदरीं खोटेपणा यायचा !
वसंत: पिलंभट, तुम्हांला खोटें पाडण्यासाठीं का आम्हीं या खटपटी करीत आहोंत ? अहो, उलट हें तुमचें भविष्य दोन दिवसांनीं अचूक खरें ठरलें म्हणजे तुमचा या लोकांत बोज मात्रवाढेल !
पिलंभट: मग कांहीं हरकत नाहीं; अशीं खात्रीनें घडून येणारीं भविष्यें मला जरूरसांगत चला. म्हणजे पहा मीं कशीं किफायतवारविकतों तीं ! अशीं भविष्यें माजा हातखंडा आहे अगदीं !
वसंत: पण ऐन वेळीं निभेला खंड पडूं देऊं नका म्हणजे झालें. नाहीं तरआयत्या वेळीं कचराल. ररऽ कराल आणि सारेंच रस्त्यावरआणाल !
पिलंभट: ती धास्तीच सोडून द्या ! असा आडरस्त्यानें वावरण्यांत मीं अगदीं पटाईत झालों आहें; अहो, आतां तुमच्याजवळ म्हणून आपलें बोलायचें-हा जो द्रव्याचा ओघ माझ्या घराकडे चालला आहे हा हा सरघोपट मार्गानें वाहतो आहे वाटतें; मुळींच नाहीं; निवळ आडवळणांनीं.
वसंत: बरें, तें असो. पुढें दुसरी गोष्त. तात्यांच्या जवळ वेणूची पत्रिका आहे; ती कांहीं ते कोणाच्या नजरेस पडूं देत नाहींत. तेव्हां कशा तरी गफलतीनें ती पत्रिका तेवढी हस्तगत करून घ्यावयाची-निदान तिची नक्कल तरी करून घ्यावयाची आणि आपल्या ओळखीच्या एखाद्या ज्योतिष्याजवळून तिच्याशीं बरोबरजमेल अशी एक पत्रिका माझ्यासाठीं-या माझ्या संन्याशी नांवासाठीं करून आणावयाची. आलें लक्षांत ?
पिलंभट: लक्षांत आलें, पण पटलें नाहीं इतकें. आतां तुमच्या या कारवाया आणि युक्तया पाहून मी अगदीं सर्द झालों आहें खरा; पण ही युक्ति नाहीं इतकी आवडली मला: हें सारें तात्यासाहेबांना तुमची पत्रिका वेणूताईच्या पत्रिकेशीं जमते एवढें भासविष्यासाठींच ना ? मग असें केलें तरनाहीं का चालणार? त्या बाळाभाऊची कुंडली तात्यासाहेबांना पसंत आहेच; तिचीच जवळजवळ नक्कल करून घेतली म्हणजे झालें कीं नाहीं ?
वसंत: ठीक आहे. कसें तरी करून पत्रिका जमवा म्हणजे झालें. नाहीं तरबैराग्याला मुलगी देते वेळीं पुन: वसंताचेंच नशीब आड यावयाचें. बरें. हें एक ठरलें. तसेंच मीं अण्णासाहेबांना औषध द्यायला उद्यांपासून सुरू करणार; तेव्हां आधीं त्यांच्याजवळ माझी वैद्यकीच्या ज्ञानाबद्दल स्तुति करा; तात्यासाहेबांभोवतीं ज्योतिषाचें जाळें पसरा आणि माधवरावांजवळ माझ्या योगसाधनाची तारीफ करा. मी तुमचा गुरु आहें असें सांगा. म्हणजे झालें.
पिलंभट: गुरु मानायला कशाला पाहिजे ? तुम्ही खरोखरीच माझे गुरु झालां आहां. मल हा लप्पन् करण्याचा थोडासा नाद पहिल्यापासूनच होताआणि त्याबद्दल मी माझ्या मनांत अगदीं मग्न असें; पण तुमचीं व मधुकरांची हीं शिकलेलीं कुलंगडीं पाहून मी अगदीं चीत झालों आहें. आम्ही दशग्रंथी पाहिलेलीं माणसें या तुमच्या करामतीपुढें कुचकामाचीं ठरतो. आमच्या दशग्रंथीचीं सूत्रें ताणून धरलीं तरी त्यांचें असें सर्वस्वीं गुरफटणारें जाळें होणें शक्य नाहीं. या  बाबतींत तुमचा शिकलासवरलेला हात धरण्याची आम्हां दशग्रंथ्यांची शहामत नाहीं; तुमचे पायच धराववयाला पाहिजेत. माझ्या गर्वाचें पाणी पाणी होऊन मी कधींपासूनच आपल्याला गुरुस्थानीं मानायला लागलों आहें.
वसंत: झालें तरमग; या भावनेनेंच माझी सर्वांजवळ स्तुति करीत सुटा. बाळाभाऊचें पत्रआलें म्हणजे आम्हां गुरुशिष्यांच्या जोडीवरवर्‍याच जणांचा विश्वास बसेल; नंतरअण्णासाहेबांचा हा आम्हींच उभारलेला आजरकमी होत चालला कीं यशोदाबाईंच्या मनांत मुलगी देण्याचें भरवून द्या म्हणजे आटोपलें. बाळाभाऊनें लग्न करण्याचें नाकारलें म्हणजे वचनमुक्त झालेले अण्णासाहेब माझें वैद्यकज्ञान पाहून माझ्या उपकारांतून उतराई होण्यासाठीं आपण होऊनच मला मुलगी देऊमकरतील. तात्यासाहेबांचा बंदोबस्त ठरविलाच आपण आतां. म्हणजे जमेल कीं नाहीं सारें ?
पिलंभट: अगदीं चोख ! पण, काय हो, माधवरावांची तुम्ही प्रथमयोगसाधवाबद्दल खात्री कशी करून देणार?
वसंत: त्याचा विचारमीं पूर्वींच करून ठेवला आहे. त्याला घटकाभरब्रह्मस्थितीचाच अनुभव दिला म्हणजे सहज त्याचा माझा शक्तीवरविश्वास बसेल.
पिलंभट: पण ती ब्रह्मस्थिति कशी दाखविणार?
वसंत: हें पाहिलेंत गुंगीं येण्याचें औषध ? त्यांना जरा छां छूं करून याच्या वासानें घटकाभरगुंगी आणिली म्हणजे ताबडतोब त्यांची अक्कल गुंग होईल कीं नाहीं ?
पिलंभट: जरूर; या नुसत्या कल्यनेनेंच माझी अक्कल गुंग झाली आहे.
वसंत: हं, तुम्ही मात्रअक्कल गुंग होऊं देऊं नक; उलट अगदीं सावध रहा आणि मीं पहिली टाळी वाजविली कीं रमाबाईंना त्या दारानें माधवरावांच्या खोलींत सोडा. राहील सारें नीअ लक्षांत ?
पिलंभट: अगदीं. आतां एकदां माझ्या डोक्यावरआपला हात ठेवा म्हणजे मला चांगली तरतरी येईल.
वसंत: नको; डोक्यावरमाझा हात ठेवण्यापेक्षां तुमच्या हातावरमी ग्रुरू असूनहि गुरुदक्षिणा ठेवितों म्हणजे तरखरी तरतरी येईल. हा विवाह जमवून आणून त्याला आतां मान्यतामिळवून देणें देवा, आतां तुझ्या हातीं आहे.

(राग-काफी; ताल त्रिवट)
मान्यतामिळो या जगीं मद्विवाहा ॥धृ०॥
सात्त्विक शुद्ध प्रेमममहोवो स्वजनांप्रति मुखावावया ॥
विनवी तुजला मी जगदीशा ॥
योग्य पथा लाभावया ॥१॥
[त्याला कांहीं रुपये देतो. दोघे जातात.]
(पडदा पडतो.)

N/A

References : N/A
Last Updated : December 08, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP