उद्योगपर्व - कर्णभेदप्रयत्न पूर्वार्ध

मयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.


श्रीकृष्ण ह्नणे, ' कर्णा तूं कुंतीचा कुमार कानीन, ।
त्वदवदनोत्थ न पडला अथिजनाच्या कधीहि कानी ' न ' ॥१॥
ऐसा वदान्य विद्वान् विश्रुत तूं शुद्धिविप्रजनदास ।
चाल, भजोत भ्राते तुज, चातक भजति जेंवि वनदास ॥२॥
देईल अजातारी मद्वचनें आजि राज्य अभ्रात्या; ।
भ्रात्या न वळेल कसा ? वळवीलचि धर्मवायु अभ्रा त्या ॥३॥
सानुजसुत धर्म तुला नमिल, सयादव करीन मी नमन, ।
सच्चित्त गुर्वनादर तोयानादर करी न मीनमन ॥४॥
बाल कसा, हो राजा, मातेच्या मानसासि दे सुख, गा !  ।
यांचा तुज काकांचा सहवास जसा सितच्छदा सुखगा ' ॥५॥
कर्ण ह्नणे, ' बा ! देवा ! वदसि स्नेहेंचि बा ! दयालो ! हें; ।
भटकरगें जोडावी स्पर्शमणीची कसी दया लोहे ? ॥६॥
मातृत्त्यका मजला राधाहस्ती दिलें अधिरथानें, ।
मज पाजाया प्रेमें पय पळ धरिती तिची न धिर थानें ॥७॥
निष्फळ कसें करुं गा ! बा ! परित्दृतसर्वनतनराधे ! तें ? ।
मेल्यावांचुनि द्यावे जोडुनि सुतशोकवतन राधेतें ? ॥८॥
दुर्योधन नांवाचा राजा मी, सर्व राज्यभोग मला, ।
मूर्त नरक नरकविच्या हदयाला, जो कृतघ्न तो गमला ॥९॥
संस्कार विवाहाबंधि केले माझे यथोक्त सूतानें ।
निर्मळपणें निघावे रक्तपटांतूनि केंवि सूतानें ? ॥१०॥
समरमखचि होऊं द्या, क्षत्रिय सेवूत तल्प न गदानी ।
पुण्य रणमरणदानी वीरां जें तें न कल्पनगदानीं ॥११॥
पतितासि सांवरी मदु शुचि हा उपदेश केशवा तूळ, ।
जैसा अंबार्पित अतिरुग्णासि पदार्थलेश वातूळ ॥१२॥
श्रीकृष्णजी ! करावा कैसा विश्वासघात अवसानी ? ।
युद्ध कसें न करावें ? आह्मां हा युद्धलाभ नवसांनी ॥१३॥
तरि मग उरलें काय ? प्रभुजी ! त्यजिल्या जरि प्रतिज्ञा त्या ?  ।
नच सोडवेल देउनि धीर भरंवसा अरिप्रति ज्ञात्या ॥१४॥
धारातीर्थीच मिळे सद्गति सत्कीर्ति शुद्धि अधमातें, ।
राज्यपदभोग न लगे, द्यावा देवा ! रणांत बध मातें ॥१५॥
मज समजलें प्रभो ! हें त्वददृष्टिपुढें उरेल न क्षत्र; ।
रवि काळरुद्रदृष्टिसि न पुरे, तेथें पुरेल नक्षत्र ? ॥१६॥
तूं स्वाश्रितप्रतिज्ञा करिशिल, न धरुनि शस्त्र सृत्या गा ! ।
उरतिल कैसे करिते झाले जे, हरुनि वस्त्र, सत्यागा ? ॥१७॥
देव ह्नणे, ' राज्य नको ? उपदेश अयोग्य काय हे महिम्या ? ।
क्लीवाला कन्यासी तुज कां द्यावी बळेंचि, हे महि, म्यां ? ॥१८॥
जेथें भीम धनंजय बहुदुःसह वासवा रणाजिर तें ।
हरिलंघन असतांही बलिगजसहवास वारणा जिरतें ॥१९॥
धनदानें अधनाचा तुमचा तैसाचि काम रणदानें ।
म्यां पुरविजेल; द्यावी स्वरगें इतरें न कां मरणदानें ? ॥२०॥
जा सर्व सिद्ध व्हा; जरि आहे उद्युक्त मानस मराया, ।
सम रायास तुह्मांसहि भीमार्जुन वरद, शीघ्र समरा या ॥२१॥
देईल कुरुक्षेत्री धर्म प्रभुवर तुह्मां निधनदानें ।
धनदानें जसि येणें न दिली उदकें तथाविध नदानें ' ॥२२॥
कर्ण म्हणे, ' बा ! वचना मान्य न झालों ह्नणों नको, पावें, ।
वध्यें ' वधाचि ' ह्नणतां, प्रभुनें आग्रह ह्नणोन कोपावें ? ॥२३॥
सत्य उपदेश आह्मी वरिचेवरि भव्यहेतु झेलावे, ।
जाणोनि सर्व देवा ! लाविसि कां बोल ? हे तुझे लावे ' ॥२४॥
श्रीकृष्ण म्हणे, ' बहुधा मरणारचि हे समस्त सुपदेश, ।
की तव हदयें माझा हितहि स्वीकारला न उपदेश ' ॥२५॥
कर्ण ह्नणे, ' भेटि असो परलोकी मात्र बा ! दयालो ! कीं ।
कलही स्नेह न राहे, हे दुर्लभ ह्नणुनि पाद या लोकी ॥२६॥
ऐसें ह्नणोनि कर्ण प्रभुला कडकडुनि भेटला सुचिरे, ।
सुग्धासहि जडित कनकमरकत नग न गमला तसा रुचिर ॥२७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP