मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अभंग ज्ञानेश्वरी| गीता-ध्यान अभंग ज्ञानेश्वरी अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा श्रीज्ञानेश्वरी नित्यपाठ गुरु-परंपरा गीता-ध्यान अभंग ज्ञानेश्वरी - गीता-ध्यान स्वामी स्वरूपानंद ह्या थोर सत्पुरूषाने ‘ अभंग ज्ञानेश्वरी ‘ नामक अत्यंत सुबोध, नितांत सुंदर आणि परम रसाळ असा अभंगात्मक ग्रंथ लिहीला. Tags : abhangdnyaneshwarisvaroopanandअभंगज्ञानेश्वरीस्वरूपानंद गीता-ध्यान Translation - भाषांतर पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयम् ।व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् ॥अद्वैतामृतवार्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनीम् ।अम्ब, त्वामनुसंदधामि भगवद्भीते भवद्वेषिणीम् ॥१॥नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे ।फुल्लारविन्दायतपत्रनेत्र ।येन त्वया भारततैलपूर्णः ।प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः ॥२॥प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ।ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः ॥३॥सर्वोपनिषदो गावों दोग्धा गोपालनन्दनः ।पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ॥४॥वसुदेवसुतं देव्म कंसचाणोरमर्दनम ।देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ॥५॥अवघें हरिमय योग-बळेंहरि ॐकृपावंत थोर सद्गुरु उदार ।तेणें योग-सार दिलें मज ॥१॥मन-पवनाची दाखवोनि वाट ।गगनासी गांठ बांधियेली ॥२॥शून्य-निःशून्याचें बीज महाशून्य ।भेटविलें धन्य हरिरुप ॥३॥स्वामी म्हणे माझा नाथ-संप्रदाय ।अवघें हरिमय योग-बळें ॥४॥गीतामाहात्म्यगीतेचें महिमान । ऐकावें श्रवणीं । अवधान सज्जनीं । द्यावें आतां ॥१॥जयाचें अंतरीं । वसे नित्य गीता । पावन तत्त्वतां । ब्रह्मरुप ॥२॥गीता म्हणतां ऐसें । दोन्ही चि अक्षरें । पाप तें निर्धारें । दिशा लंघी ॥३॥भगवद्भीता-पठण । सर्वकाळ ज्यासी । मोक्षाची तो राशि । मूर्तिमंत ॥४॥गीता म्हणतां त्यासी । काय पुण्य आहे । इतिहास पाहें । पुराणींचा ॥५॥पार्वतीये प्रति । शिवें सांगितलें । अध्यात्म बोलिले । ब्रह्मविद्या ॥६॥ब्रह्मरुप त्याचें । स्वयें चित्त झालें । बोलणें खुंटलें । आहे नाहीं ॥७॥नित्य म्हणतां गीता । वाचेसी स्मरण । केलिया पठण । पुण्य काय ॥८॥दोषांचे पर्वत । भस्म होती तेणें । गीतेचें पठण । केलियानें ॥९॥श्रवण पठण । गीतेचें पूजन । सर्वहि साधन । कलियुगीं ॥१०॥पद्मपुराणींचें । सांगितलें सार । गीता आहे थोर । ब्रह्मविद्या ॥११॥सर्व हि पातकें । जळोनियां जाती । अर्जुना श्रीपति । बोलियेला ॥१२॥गीता अभ्यासितां । कळें सारासार । महिमा आहे थोर । पठणाचा ॥१३॥गीता म्हणतां आहे । पापा प्रायश्चित्त । मुक्ति सायुज्यता । वरी त्यासी ॥१४॥गीता म्हणतां जाण । भागीरथी-स्त्रान । पृथिवी चि दान । दिधली तेणें ॥१५॥गीता ध्याई नर । सर्वदा तो शुचि । सर्व हि तीर्थाची । महिमा तेथें ॥१६॥तीर्थक्षेत्रयात्रा । देवाचें पूजन । यज्ञयाग दान । उद्यापन ॥१७॥धरणीं पारणीं । नित्य उपोषण । पृथ्वीचें भ्रमण । निराहारी ॥१८॥जप तप व्रत । नित्य अनुष्ठान । कर्म-आचरण । उपासना ॥१९॥पुराण-श्रवण । वेदशास्त्रीं जाण । सर्व हि साधन । घडे त्यासी ॥२०॥ब्रह्मविद्या गीता । सर्वाचें साधन । करी जो पठण । नित्यकाळीं ॥२१॥एकाजनार्दनीं । नित्य हें चि ध्यान । पूर्ण समाधान । घडे तेणें ॥२२॥ज्ञानेश्वरीमाहात्म्यज्ञानराज माझी । योग्यांची माउली । तेणें निगमवल्ली । प्रकट केली ॥१॥गीता-अलंकार । नाम ज्ञानेश्वरी । ब्रह्मानंदलहरी । प्रकट केली ॥२॥अध्यात्म-विद्येचें । दाविलेंसे रुप । चैतन्याचा दीप । उजळिला ॥३॥छप्पन्न भाषेचा । केलासे गौरव । भवार्णवीं नाव । उभारिली ॥४॥श्रवणाचे मिषें । बैसावें येऊनि । साम्राज्य भुवनीं । सुखीं नांदे ॥५॥नामा म्हणे ग्रंथ । श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओंवी । अनुभवावी ॥६॥वर-प्रार्थनाउदारा जगदाधारा देई मज असा वर ।स्व-स्वरुपानुसंधानीं रमो चित्त निरंतर ॥१॥काम-क्रोधादिकां थारा मिळो नच मदंतरीं ।अखंडित वसो मूर्ति तुझी श्रीहरि साजिरी ॥२॥शरीरीं हि घरीं दारीं स्त्रीपुत्रादि परिग्रहीं ।अनासक्त असो चित्त आसक्त त्वदनुग्रहीं ॥३॥नको धन नको मान नको लौकिक आगळा ।सोडवीं हा परी माझा मोहपाशांतुनी गळा ॥४॥नको भोग नको त्याग नको विद्या नको कला ।अवीट पदपद्माची अमला भक्ति दे मला ॥५॥नर नारी हरीरुप दिसो बाहेर-अंतरीं ।राम कृष्ण हरी मंत्र उच्चारो मम वैखरी ॥६॥मी-माझें मावळो सर्व तूं-तुझें उगवो अतां ।मी तूंपण जगन्नाथा, होवो एक चि तत्त्वतां ॥७॥देव-भक्त असें द्वैत अद्भयत्व न खंडितां ।दाखवीं देव-देवेशा, प्रार्थना ही तुला अतां ॥८॥नवरत्नहारजय जय जी जगदात्मया । सच्चिदानंदसूर्या ।स्वामी समर्था सद्गुरुराया । गणेशरुपा ॥१॥करोनि आत्मत्वें वंदन । घातलें चरणीं लोटांगण ।सहजें आलें लीनपण । कृपाबळें ॥२॥जी प्रभु आपुला म्हणितला । तेणें संसार मोक्षमय जाला ।देखें उन्मेष उदैजला । नित्य नवा ॥३॥तुटला विषयांचा लाग । निमाला जन्ममरणाचा भाग ।फिटला जीवदशा-पांग । सामरस्यें ॥४॥देहीं अहंता नुरली । वृत्ति स्व-रुपीं विराली ।द्वैताद्वैत गिळोनि ठेली । अखंडत्वें ॥५॥सरली कर्माकर्म-विवंचना । कीं आपैसी साध्य-साधना ।उरे करोनि अकर्तेपणा । ठायींचा चि ॥६॥बोलीं अबोलता जाहलों । सहजसुखें सुखावलों ।धन्य धन्य देवा पावलों । परमसिद्धि ॥७॥स्व-रुपीं विश्व-रुप देखिलें । विश्वरुपीं स्वरुप सामावलें ।स्वरुपा-विश्वरुपाआगळें । नित्यतत्त्व ॥८॥स्वामीचा सेवकु जाहलों । तैं येतुलें भाग्य लाधलों ।अक्षय-पदीं लाचावलों । ह्या चि लागीं ॥९॥नव ओंविया नवरत्नहार । स्वामीस समर्पिला सादर ।तेणें संतोषौनि अभय-कर । ठेविला माथा ॥१॥----स्वरुपानंद N/A References : N/A Last Updated : February 13, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP