पंचदशी विद्या - पंचदशीयंत्राचा विधि

गुरूपदिष्ट मार्गाशिवाय मंत्रांचे अनुष्टान करू नये , कारण मंत्रशास्त्र हे अनुभवदर्शी शास्त्र आहे .


शुभ कार्याला शुभ दिवस , क्रूर कार्याला क्रूर दिवस पाहून आरंभ करावा . व यंत्र लिहून नदींत सोडून द्यावें . जें वहून जाणार नाहीं तें स्वतःजवळ ठेवावें त्यायोगें सर्व कार्यसिद्धि होईल . खालीं दिल्याप्रमाणें यंत्रांची संख्या लिहिली असतां त्या त्या समोरील कार्यसिद्धि होते .

 

संख्या

फळ

२०००

लक्ष्मी प्रसन्न होते

६०००

निरोगी होतो

१०००

सरस्वती प्रसन्न होते

१०००

औषधी सिद्ध होतात .

२०००

मंत्र यंत्र सिद्ध होते .

४०००

ईश्वर प्रसन्न होतो .

२०००

शत्रु वश होतो .

३०००

सर्व वश होते .

२०००

सभा मोहन होते .

६०००

गर्व मोचन होतो .

२०००

विदेशी घर होते .

२०००

खुआति प्रसिद्धि होते .

३०००

वैरी प्रसन्न होतो .

६०००

गेलेली वस्तु प्राप्त होते .

५०००

देव प्रसन्न होतो .

२०००

दुःखनाश व सुख होते .

४०००

उद्योग प्राप्त होतो .

१०

विषनाश होतो .

५०००

वन्ध्या स्त्री गर्भवती होते

३०००

मित्रलाभ होतो .

४०००

राजा प्रसन्न होतो .

१५०००

मनातील इच्चा पूर्ण कोते

यंत्र लिहून पाण्यात सोडावे . जर काहीं इच्छा असेल तर कणकेंत गोळी बनवून मासोळीला खाउ घातली तर सर्व कार्यसिद्धी होईल . यंत्र लेखन विधि शुभ कार्याला उत्तर दिशेकडे तोंड करून व अशुभ कार्याला दक्षिण दिशेकडे करून करावा .

 

अथ मंत्रविधी -

१ ) स्त्रीसंग करू नये .

२ ) ब्रह्मचर्याने रहावे .

३ ) यंत्र लिहिण्यापूर्वी ‘ ॐ ह्रीं क्लीं स्वाहा ’ हा जप एक लक्ष करावा .

लोकांस मोहिनी पाडण्यासाठी १० यंत्रे रोज लिहावी . २० आकर्षणासाठी , ३० जपासाठी , १००० कार्यसिद्धीकरितां लिहावी . लेखणी आठ अंगुले असावी .

 

लेखणी

लिहावे

मोहनासाठी

सुवर्ण

मधाने

स्तंभन

चांदी

हळद

देवदर्शन

सुवर्ण

केशर

द्रुतगमन

लोखंड

शवभस्म

द्वेष

लोखंड

व्रणवृक्षरस

उत्पातशांती

दूर्वा

चंदन

 

कार्य

किती वेळा लिहावी

बदीमोचन

१० हजार

राज्यप्राप्ती

२ लक्ष

सर्व सिद्धी

४० हजार

मोहनविद्या

५० हजार

राजा वश होतो

४० हजार

पाण्यात न बुडणे

४ लक्ष

वाक् ‍ सिद्धी

५ लक्ष

गत राज्यप्राप्ती

२ लक्ष

नव निधीप्राप्ती

९ लक्ष

लक्ष्मी प्राप्ती

७० हजार

अष्ट सिद्धी

८ लक्ष

महादेवासारखे होणे

१ लक्ष

दररोज १० ,२० ,३२ ,५० किंवा १०० वेळा लिहावे . ब्राह्मणाने भूर्जपत्रावर लिहावे . क्षत्रियाने ताडपत्रावर , वैश्याने कागदावर लिहावे . शूद्रानें पृथ्वीवर लिहावे . लाल आसन व लाल कपडा अनुष्टान सुरू असेपर्यन्त घालावा . जमिनीवर झोपावे . मूग व तांदूळ भोजनाला घ्यावे . वरीलप्रमाणे जोपर्यंत यंत्रलिखाण चाललेले आहे तोपर्यंत तसे रहावे व वागावे . श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु .

N/A

References : N/A
Last Updated : March 08, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP