पंचदशी विद्या - पंचदशी विद्या विचार

गुरूपदिष्ट मार्गाशिवाय मंत्रांचे अनुष्टान करू नये , कारण मंत्रशास्त्र हे अनुभवदर्शी शास्त्र आहे .


ॐ नमो विष्णुरूपाय नमस्ते ब्रह्यरूपिणे ।

नमस्ते रुद्ररूपाय नमः त्रिमूर्तिधारिणे ॥१॥

पार्वती बोलते , हे महारुद्र , तुम्ही सर्व जगताची उत्पत्ति , स्थिति व लय करणारे आहां , तुम्हीच ब्रह्यदेव होऊन जगाची उत्पत्ति , विष्णु होऊन जगाचें पालन आणि रुद्र होऊन जगाचा संहार करीन असतां . तुम्ही त्रिगुणात्मक आणि पंचभूतात्मक आहां . तीं पंचमहाभूतें - पृथ्वी , आप , तेज , वायु आणि आकाश हीं आहेत , पंच तन्मात्रा - शब्द , स्पर्श , रूप , रस , गंध ह्या आहेत , पंच इंद्रियें - त्वक् ‌ , चक्षु , रसना घ्राण व शब्द हीं आहेत . हीं सर्व पंधरा तत्त्वें तुमचे इच्छेनें आदिमाया शक्तीला घेरतात , तेव्हां सर्व तत्त्वांचे परिणाम राजस , तामस , व सत्त्वगुण हे उदय पावतात , मी ( पार्वती ) तुमच्या मायेला जाणत नाहीं , आणि संसार करण्याची इच्छा करीत आहें . म्हणून संसाराचा निर्वाह होईल , अशी उत्तम विद्या मला तुम्ही सांगा . ईश्व सांगतातः - ऐक पार्वती , एक विद्या तुला सांगतों . ही विद्या मी कोणत्याहि देवाला किंवा ऋषीला सांगितली नाहीं , ती तुला सांगतों . ही विद्या देवनिंदक , तीर्थद्वेषी , गुरुद्रोही , असत्यवादी , अविश्वासी , मातापिता सेवाहीन , अहंकारी , दांभिक , पाखंडी अशा लोकांनां सांगूं नको . सांगशील तर गुरु व शिष्याचें अकल्याण होईल . या विद्येनें गुरूचा छळ करील त्याला कोटी कालपर्यंत ही विद्या फलद्रूप होणार नाहीं . या विद्येनें जो शिष्य गुरूला संताप आणील , त्याला श्वेत कुष्ठ फुटेल . तसेंच जो गुरु निष्कपटी शिष्याला ही विद्या सांगणार नाहीं तो गुरु ही दोषी होईल . एक वर्षपर्यंत शिष्याची परीक्षा करून मग त्याला गुरूनें ही विद्या शिकवावी . नाहीं तर गुरूला मोठा दोष येतो .

२ . पंचदशीयंत्र पद्धति , कृति व विधि .

श्री महादेव पार्वतीला म्हणाले , हे देवी , मी सर्व मंत्र व यंत्रे साध्य केलेलीं आहेत . परंतु फक्त हें पंचदशी यंत्र साध्य केल्याशिवाय ठेवलें आहे . हें अतिशय गुप्त आहे . ती विद्या मी तुला आतां सांगतोंव तूंही ती अतिशय गुप्त ठेव . स्त्रीलंपट , नास्तिक व दुष्ट यांस देऊं नकोस . हें मन देऊन ऐक . नदीच्या कांठावर सुंदर वृक्ष असलेल्या ठिकाणीं जाऊन माती व उत्तम शेणानें एक जागा सारवून तयार करावी , तीवर अष्टगंधानें एक गोठा ( कोठा ) बीजमंत्र जमिनीवर लिहावा . त्याचें पूर्वेकडे तोंड करावें आणि डोक्यावर अर्धचंद्र अनुस्वार द्यावा . त्याचप्रमाणें अष्टगंधानें पृथ्वीवर पंचदशी यंत्र काढिलें पाहिजे . त्याच्यावर एक दिवा ठेवावा . दिवा सोनें , चांदी , तांबें , लोखंड अथवा माती यांचा असावा . ( चांदी , ताम्र , लोल यांच्या पत्र्यावर पंचदशी मंत्र लिहावा ) तो दिवा गाईच्या शुद्ध तुपानें भरावा . त्यांत लाल सुताची वात ( १००० किंवा १०८ किंवा १८ किंवा १२ हात लांब असलेली ) लावावी . ( पूर्वी विधीप्रमाणें ) नंतर मध्यें लाला कापडाचें आसून घालून यंत्र लिहणार्‍यानें बसावें , जर क्रूरकार्य करावयाचें असेल , त सूर्यश्वासानें श्वास चालवावा , लाल वस्त्र , लाल घोतर , लाल आसन , यांमध्यें कोणत्याहि इतर रंगाचा धागा असूं नये . आसनावर बसून ’ हीं ‌ ’ या मायाबीजाचा जप करावा . अष्टगंधानें यंत्र लिहावें , आणि जें आपलें काम असेल तें त्याच्यावर लिहावें . दररोज ५० - १०० - ३०० - ५०० अथवा १००० वेळां ( जितकें पहिल्या दिवशीं लिहिलें असेल तितकें रोज ) लिहावें . यंत्रांत ’ हीं ‌ ’ हें मायाबीज लिहावें आणि येर्णेप्रमाणें केशराच्या गंधानें एक लाख वेळां लिहिलें म्हणजे हनुमान प्रगट होऊन दर्शन देतील . याचप्रकारें नेहमीं लिहावें आणि प्रत्येक यंत्राला निरनिराळें कापून कणकेंत त्याची गोळी करून मासोळ्यांना खावयाला द्यावें . तलाव , बावडी , विहिरी जेथें असतील तेथें तेथें माशांना असें दिलें नाहीं तर कार्यसिद्धि होणार नाहीं , यंत्र लिहणें बंद केलें तर मासोळ्यांनां खाणें देणें बंद केलें तरीसुद्धां हा बीज मंत्र जपत राहावा , जेव्हां एक लाख मंत्र पुरा होईल तेव्हां एक लाखाचा दशांश इतकें हवन पाण्यांत करावें अग्नीमध्यें नाहीं . ज्याप्रमाणें बली वैश्वदेव होतो , त्याप्रमाणें बीजमंर ’ स्वाहा ’ म्हणून पाण्यांत सोडावा . नंतर दशांश ( हवनाच्या ) तर्पण , मार्जन , गोदान वगैरे करावें . प्रथम एकापासून नऊपर्यंत प्रारंभ करून ९ पर्यंत लिहून शेवटीं १ लिहिला तर राजा वश होतो . दुसरा प्रकार तीन पासून आरंभ करून ९ पर्यंत लिहावे नंतर १ , २ लिहावे म्हणजे व्यापारवृद्धि होईल . चारापासून आरंभ करून ९ पर्यंत लिहून नंतर १ , २ , ३ लिहावे म्हणजे साधकाच्या क्रोधविकाराचें उच्चाटण होतें . ५ पासून आरंभ करून ९ पर्यन्त लिहिले व नंतर १ , २ , ३ , ४ लिहिले व नंतर १ , २ , ३ , ४ , ५ लिहिले तर मारण होणार नाहीं . ७ पासून आरंभ करून लिहिले तर ( ९ पर्यंत ) व नंतर १ , २ , ३ , ४ , ५ , ६ , असे लिहिले तर अशूभ चितकांना विपत्ति येते , ९ पासून आरंभ करून १ , २ , ३ ४ , ५ , ६ , ७ , ८ असे लिहिले तर अवश्य घनवृद्धि होते . ह्या प्रकारें ८ बोटें ( अंगुलें ) अशा चमेलीच्या काडीच्या लेखणीनें अष्टगंधानें १ लाख प्रमाणें नऊ कोठयांत लिहावे . द्वी , नंद , वेद , ऋषी , बाण , त्रि , षट् ‌, शशि , आणि वसु हे नऊ कोठे . पण आदिमाया बीजाचें साधन जमणार नाहीं तर मायाबीजाशिवायच अष्टगंधानें सवा लाख लिहावें . एक पासून ९ पर्यंत जर दीपक वगैरे सामान मिळूं शकलें नाहीं तर माया बीज हें अवश्य जपावें . व गोळ्या पूर्वोक्त विधिप्रमाणें बनवून त्या मासोळ्यांनां देत राहिलें तरी सुद्धां कार्य सिद्धीस जाईल . जर मंत्र लिहून पर्वताच्या शिखरावर चढवून उडवले तर उच्चाटन सिद्ध होतें . पृथ्वीवर ( जमिनीवर ) खडीनें ( दगडानें ) लिहिलें तर बंदी सुटतो . ब्रह्यचर्यानें रहावें . हविष्यान्न खावें . स्वतःची इच्छा मंत्रावर लिहावी . जर मासोळीनें लवकर गोळी खाल्ली तर यंत्र लिहावें . खाल्ली नाहीं तर लिहूं नये . अष्टगंध , चंदन , अगर , जटामांसी , देवदार , कस्तुरी , केशर , कापूर , आणि वाळा यांच्याशिवाय कापूर व केशर यांनीं हें यंत्र लिहावें , असें त्रिपुर सुप्रयोगांत लिहिलें आहे .

पंचदशी विद्या व श्रीविद्या ह्यासंबंधें जास्त माहिती उत्तरार्धांत ’ देव देवता मंत्र ’ ह्या प्रकारणांत दिलेली आहे . तसेंच पंचद्शी यंत्रु , त्यांचे प्रकार व उपयोग उत्तरार्धांत अनेक ठिकाणीं सांगितले आहेत .

N/A

References : N/A
Last Updated : March 08, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP