काव्यरचना - भटाची वाणी

महात्मा फुल्यांनी हे काव्य व्यक्तिमात्रास अनुलक्षुन लिहिले नसून फक्त उपमापर लिहून दिलगिरी व्यक्त केली.



मेरी तुंबडी भर दे ॥ मेरी  तुंबडी भर दे ॥धृ.॥
आले उपाधे भट वहापांचांचा गट ॥ जमून करी वटवट ॥

हात पसरीती चट ॥ घेती दक्षिणा घट ॥ कशी वरुन-लगट ॥
मेरी तुंबडी भर दे ॥ मेरी तुंबडी  भर दे ॥१॥

जात बाजींदी नट ॥ अडवून धरी मनगट ॥ घेती दक्षणा झट ॥
पाहाती रांडांचा मठ ॥ मेरी तुंबडी भर दे ॥२॥

भटती मैना पोपट ॥ जेव्हां जमती गटपट ॥ बिस्क बी बे झडपट ॥
चुमण घेती मटमट ॥ मेरी तुंबडी भर दे ॥३॥

लाळ घोटीची घटघट ॥ असा पापी महानट ॥ धुवून आपले अंगुष्ट ॥
शुद्रा पाजीती हे दुष्ट ॥ दान करीनात थै ॥४॥

बानी दुलन कर्देन ॥ आनंद घोटे जर्दन ॥ लक्षर प्यादे जळद ॥
मेरी तुंबडी भर दे ॥ मेरी तुंबडी भर दे ॥५॥

अरे, त्याला नेऊन जाळा ॥ अरे त्याला नेऊन जाळा ॥ अहो शुद्रांचा काळ ॥
आले ब्राह्मण चांडाळ ॥ हा दुष्ट तात्काळ ॥ हे उठले कपाळ ॥
मेरी तुंबडी भर दे ॥ मेरी तुंबडी भर दे ॥६॥

घ्या हिरावून जपमाळ ॥ दान करीन देवे ॥ मेरी तुंबडी भर दे ॥
बरी बरी बरी बरी ॥ अहो कशाची बरी ॥ पोथी बगलेंत मारी ॥
जाती शुद्रांच्या घरीं ॥ मेरी तुंबडी भर दे ॥७॥

करीती बडबड भारी ॥ सोंग बोकडाचे परी ॥ दाढीवाली सारी ॥ मेरी तुंबडी ॥धृ०॥
मिष तिर्थाचें करी ॥ खाल्ली पंचपात्नी ॥ देती तीर्थ कुपात्नीं ॥ जात मैदाची खरी ।
मेरी तुंबडी भर दे ॥ मेरी तुंबडी भर दे ॥८॥

हात गोमुखीं सारी ॥ चित्त पैशावरी ॥ किंवा तरण्याताठया पोरीवरी ॥
भडवे रांत्नंदिन शयनीं ॥ मेरी तुंबडी भर दे ॥९॥

अहो कशाची भार ॥ कित्येक ब्राह्मण अम्मलदार ॥
कोणी पंच फौजदार ॥ कोणी शिरस्तेदार ॥ कोणी कुलकर्णी सावकार ॥
मेरी तुंबडी भर दे ॥१०॥

मोठे मोठे दुकानदार ॥ सारे भटच अम्मलदार ॥ गरीब शुद्रावर  कहर ॥
हे पहा करीती जोजार ॥ असें आंधळें सरकार ॥
कांही करीना विचार ॥ जोतीरामाचा मार ॥ फुलापेक्षां सुकुमार ॥
मेरी तुंबडी भर दे ॥११॥



जाळ तुझी फुकी एकी ॥ धूर्त नटी अर्ध मुकी ॥१॥
तुम्ही आर्य कार्यसाधु ॥ नव्हत शुद्रांचे हो बंधू ॥२॥
नाथ प्रमाथा बोसाची ॥ साक्ष देतों निबंधाची ॥३॥
जेव्हां इंग्रजी वाचाल ॥ तेव्हां शांतीस ती धराल ॥४॥
ज्याला नाहीं सत्यभीती ॥ त्याला कैची बंधूप्रिती ॥५॥
द्विज चाकराची निती ॥ फी मजूरापाशीं घेती ॥६॥
घरीं  धार्मीक बनती ॥ कचेरींत लांच खाती ॥७॥
यवनी रंभा हे पाळीती ॥ भ्रष्ट मांगास म्हणती ॥८॥
वेश्याचें चुंबन घेती ॥ शुद्रा पादोदका देती ॥९॥
जितशुद्रा तुच्छ मानी ॥ मेल्यामागे टपे दानी ॥१०॥
मद्यमांस शाक्त खाती ॥ म्हारामांगा दोष देती ॥११॥
परशूराम देव साचा ॥ वध करी अर्भकांचा ॥१२॥
भट पेशवा जो नाना ॥ छेदी स्त्नीयालेकरांना ॥१३॥
बहु स्त्नीयांचा हा पती ॥ स्त्नीस का उलटी रीती ॥१४॥
एक मरतां दुजी जाया ॥ हा मारतो सती न्याया ॥१५॥
पक्षपाती सर्व मनु ॥ नेत्नी सलतात कानू ॥१६॥
सत्य यवनाची वाणी ॥ वेद वाही त्यांचे पाणी ॥१७॥
हीच कां हो शास्त्ननीती ॥ जोती पुसे भट्टाप्रती ॥१८॥



विशारो द्वीजिव्हा सर्पास कल्पना ॥ पवित्नशयन ॥ द्विजें केलें ॥१॥
उघडा पाडून वर निजविलें ॥ शेषशाई दिलें ॥ नांव त्याचें ॥२॥
काम सारीतांना श्रमला भागला ॥ पाय दाबायाला ॥ रमा बावी ॥३॥
सर्प खाणाराळा पुढें  उभा केला ॥ गरुडपक्षाला दासापरी ॥४॥
कमळ उगवी नाभींतून त्याचे ॥ पुच्छ वानराचें पोटावर ॥५॥
फुल फोडोनियां ब्रह्माजी काढीला ॥ पंचमुखी केला ॥ चार हात ॥६॥
ब्रह्माजी तो साच्रा अवयवी झाला ॥ भटासी ओकला ॥ तोंडातून ॥७॥
विष्णूची रमा ब्रह्माची सावित्नी ॥ कवण्या कार्यप्रती ॥ सांग भटा ॥८॥
अयोनिसंभव मानव-उत्पत्ती ॥ लिहील्यात ग्रंथीं ॥ गप्पा सर्व ॥९॥
मांगापरी आज भटजीचा जन्म ॥ कळू आलें वर्म ॥ जोती म्हणे ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 18, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP