शुद्धिसंस्कारः - वैदिक, पौराणिक

उत्तम संस्कार मानवाला उच्च कोटीचे जीवनमान प्रदान करते .


सभ्यानाहूय तेषामग्रतः ,

सर्वे धर्मविवेक्तारो गोप्तारः सकल द्विजाः।

मम देहस्य संशुद्धिं कुर्वतु द्विजसत्तमाः ॥

मया कृतं महाघोरं ज्ञानमज्ञातकिल्बिषम।

प्रसादः क्रियतां मह्यं शुभानुज्ञां प्रयच्छथ।

पूज्यैः कृतः पवित्रोऽहं भवेयं द्विजसत्तमैः ॥
इति प्रार्थनानन्तरं असच्छास्त्रग्रहणरुपपातकिनं मामनुगृह्णन्तु भवन्त इत्युक्त्वा प्रणमेत ।

प्रायश्चित्तकथनम - अद्य यावत्संभूतानां पातकानां निरासार्थ असन्मतपरिग्रहपातित्यदोषनिरासार्थ च पर्षदुपदिष्टं सक्षौरं कृच्छ्रत्रयं प्रायश्चित्तमाचरितव्यं तेन तव शुद्धिर्भविष्यति । त्वं कृतार्थो भविष्यसि । त्वं कृतार्थो भविष्यसि । त्वं कृतार्थो भविष्यसि । ( कर्ता ) ॐ भवदनुग्रहः इत्यंगिकृत्य संमानपूर्वकं प्रणम्य पर्षदं विसृजेत ।

आचनम - केशवाय नमः श्रीकृष्णाय नमः ॥

संकल्पः - अद्य शुभपुण्यतिथौ मम आत्मनः श्रुतिस्म्रुतिपुराणोक्तफलप्राप्त्यर्थ अद्य यावत संभूतानां पातकानां निरासार्थं असनमतपरिग्रहरुपदोषपरिहारार्थ पातित्यदोषपरिहारार्थ च पर्षदुपदिष्टं सक्षौरं कृछ्रत्रयं प्रायश्चितं करिष्ये ।

क्षौरम - अद्य प्रायश्चितांगत्वेन कक्षादिसहितं क्षौरं करिष्ये इति संकल्प शिरसि हस्तं निधाय ततः क्षौरं कारयेत ।

मंत्रः - यानि कानि च पापानि ब्रह्महत्यासमानि च।

केशानाश्रित्य तिष्ठन्ति तस्मात्केशान्वपाम्यहम ॥

क्षौरानन्तर मृत्तिकादिना स्वशरीरमुपलिप्य स्नायात।

पंचगव्यप्राशनम - तत्रादौ प्रायश्चित्तग्रहणयोग्यतासिद्ध्यर्थं शरीरशुध्यर्थं च पंचगव्यग्रहणं करिष्ये।

पयो दधि गोमुत्रं गोमयं घृतं यथाप्रमाणं मेलयित्वा अधोलिखितमंत्रेण पंचगव्य त्रिवारं पिबेत ॥

यत्त्वगस्थिगतं पापं देहे तिष्ठति मामके।

प्राशनात्पंचगव्यस्य दहत्यग्निरिवेन्धनम ॥

दण्डप्रदानम - कृच्छ्रत्रयप्रत्याम्नायीभूतं गोनिष्क्रयं द्रव्यं ब्राह्मणाय संप्रददे इति ब्राह्मणाय यथाशक्ति द्रव्यं दद्यात।

जलाभिमंत्रणम - गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति।

नर्मदे सिंधु कावेरि जलेऽस्मिन सन्निधिं कुरुः।

( इति जलमभिमंत्रयेत )

महाभिषेकः -

सुरास्त्वामभिषिंचंतु ब्रह्मविष्णुमहेश्वरः।

वासुदेवो जगन्नाथस्तथा संकर्षणो विभुः ॥१॥

प्रद्युम्नश्चानिरुद्धश्च भवंतु विजयाय ते।

आखंडलोऽन्गिर्भगवान यमो वै निर् ‍ ऋतिस्तथा ॥२॥

वरुणः पवनश्चैव धनाध्यक्षस्तथा शिवः।

ब्रह्मणा सहिता सर्वे दिक्पालाः पांतु ते सदा ॥३॥

कीर्तिर्लक्ष्मीर्घृतिर्मेधा पुष्टिः श्रद्धा क्रिया मतिः।

बुद्धिर्लज्जा वपुः शांतिः कांतिस्तुष्टिश्च मातरः ॥४॥

एतास्त्वामभिषिंचंतु देवपत्न्यः समागतः।

आदित्यश्चद्रमा भौमो बुधजीवसितार्कजाः ॥५॥

ग्रहास्त्वामभिषिंचंतु राहुः केतुश्च तर्पिताः।

देवदानवगंधर्वा यक्षराक्षसपन्नगाः ॥६॥

ऋषयो मुनयो गावो देवमातर एव च।

देवपत्न्यो द्रुमा नागा दैत्याश्चाप्सरसां गणाः ॥७॥

अस्त्राणि सर्वशस्त्राणि राजानो वाहनानि च।

औषधानि च रत्नानि कालस्यावयवाश्च ये ॥८॥

सरितः सागराः शैला तीर्थानि जलदानवाः।

एते त्वामभिषिंचन्तु सर्वकामार्थसिद्धये ॥९॥

शांतिः पुष्टिस्तुष्टिश्चान्तु।

तिलकधारण्म - सौभग्यालंकारप्रदानं , वस्त्रप्रदानं च कारयेत।

अभिवादनं - नमोस्त्वनन्ताय सहस्त्रमूर्तये

सहस्त्रनाम्ने पुरुषाय शाश्वते

सहस्त्रकोटियुग्धारिणे नमः ॥

अनेन देवान ब्राह्मणांश्च नमस्कुर्यात।

तीर्थग्रहणम - अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशकम।

विष्णुपादोदकं तीर्थ जठरे धारयाम्यहम ॥

मंत्रोपदेशः

श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात।

स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ॥१॥

अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक।

साधुरेव स मंतव्यः सम्यग्व्यवासितो हि सः ॥२॥

क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छांति निगच्छति।

कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति ॥३॥

ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति।
भ्रामयन्सर्वभूतानि यंत्रारुढानि मायया ॥४॥

यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिंद ततम।

स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विदंति मानवाः ॥५॥

यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः।

तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥६॥

( पूर्वी उपनयन झाल्यावर धर्मान्तर केले असल्यास खालील विधीप्रमाणे पुनरुपनयन करावे ; नंतर वेदोक्त किंवा पुराणोक्त होमहवन करावे . )

पुनरुपनयन

आचम्य प्राणानायम्य ,

संकल्पः - असच्छास्त्रग्रहणदोषपरिहारार्थ पुनःसंस्कारसिद्धिद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थ पुनरुपनयनं करिष्ये।

घृताभिमंत्रणम - ॐ भूर्भुवःस्वः।

तत्सवितुर्वरेण्यं भर्गोदेवस्य धीमहि।

धियो यो नः प्रचोदयात।

( शतावरमिमं मंत्रं पठित्वा दर्विमात्रं घृतमभिमंत्र्य )

घृतप्राशनम - गायत्रीमंत्रेण घृतं प्राशयेत।
मंत्रोपदेशः - पच्छः , अर्थर्चशः ऋक्शः गायत्रीमंत्रमुपदिशेत।

( नूतनं धूतं वा वस्त्रं परिधापयेत )

यज्ञोपवीतप्रदानम -

यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतेर्यत्सहजं पुरस्तात।

आयुष्यमग्रयं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः ॥

( इति द्वे त्रीणि वा यज्ञोपवीतानि प्रदातव्यानि )

इति पुनरुपनयनप्रयोगः

प्रायश्चित्तप्रधानहोमः।

संकल्पः - आचम्य प्राणानायम्य , मम असच्छास्त्रग्रहणरुपदोषनिबर्हणार्थ

क्रियमाणस्य प्रायश्चित्तस्य प्रधानांगभूतं होमं करिष्ये।

स्थंडिलादिकरणम - तदंग स्थण्डिलादि करिष्ये।

अग्निस्थापना - समस्तव्याहृतीनां परमेष्ठी प्रजापतिः प्रजापतिर्बृहती। अग्निप्रतिष्ठापने विनियोगः।

ॐ भूर्भुवः स्वः। विटनामानमग्निं प्रतिष्ठापयामि।

( प्रोक्षितेंघनानि निक्षिप्य वेणुधमन्या प्रबोध्य ध्यायेत )

ध्यानम - चत्वारि शृंगा गोतमे वामदेवोऽग्निस्त्रिष्टुप अग्निमूर्तिध्याने विनियोगः। ॐ चत्वारि शृंगा त्रयो अस्य पादाद्वे शीर्षे सप्त हस्तांसो अस्य। त्रिधा बद्धो वृषभो रोरवीति महो देवो मर्त्या आर्विवेशः ॥

परिसमूहनम। परिसमूहनम। परिसमूहनम।

पर्युक्षणम। पर्युक्षणम। पर्युक्षणम।

९ पूजनम - विश्वानिन इति तिसृणामात्रेयो वसुश्रुतोऽग्निस्त्रिष्टुप। द्वयोरर्चनेऽत्याया उपस्थाने विनियोगः।

ॐ विश्वानि नो दुर्गहा जातवेदः।

ॐ सिंधुं न नावा दुरिताति पर्षि।

ॐ अग्ने अत्रिवन्नमसा गृणानः।

ॐ अस्माकं बोध्यविता तनूनाम।

ॐ यस्त्वा हृदा कीरिणा मन्यमानः।

ॐ अमर्त्य मर्त्यो जोहवीमि।

ॐ जातवेदो यशो अस्मासु धेहि।

ॐ प्रजाभिरग्ने अमृतत्वमश्याम।

उपस्थानम -

ॐ यस्मै त्वं सुकृते जातवेद उ लोकमग्ने कृणव स्योनम। अश्विनं सपुत्रिणं वीरवन्तं गोमन्तं रयिं न शते स्वस्ति ॥

होमः - अग्नेः पश्चात आस्तीर्णेषु दर्भेषु आज्यपत्रं निघाय अग्न आयूषि इति तिसृणां शतं वैखानस ऋषयोग्निः पवमानो देवता प्रायश्चित्तप्रधानाज्यहोमे विनियोगः।

१ . अग्न आयूषि पवस आसुवोर्जमिषं च नः।

आरे बाधस्व दुच्छुनां स्वाहा ॥१॥

२ . अग्निऋषिः पवमानः पाञ्चजन्यः पुरोहितः।

तमीमहे महागयं स्वाहा ॥२॥

३ . अग्ने पवस्व स्वपा अस्मे वर्चः सुवीयेम।

दधद्रयिं मयि पोषं स्वाहा ॥३॥

४ . प्रजापते हिरण्यगर्भः प्रजापतिस्त्रिष्टुप। प्रायश्चितप्रधानहोमे विनियोगः।

ॐ प्रजापते नत्त्वदेतान्यन्यो विश्वा जातानि परिता बभूव।

यत्कामास्ते जुहुमस्तन्नो अस्तु वयं स्याम पतयो रयीणां स्वाहा ॥

५ . प्राणापानव्यानोदानसमाना मे शुध्यन्तां ज्योतिरहं विरजा विपाप्मा भूयासं स्वाहा।

६ . वांड्मन्श्चक्षुःश्रोत्राजिह्वाघ्राणरेतोबुद्ध्याकूतिः संकल्पा मे शुध्यन्तां ज्योतिरहं विरजा विपाप्मा भूयासं स्वाहा ॥

७ . त्वक्चर्ममांसरुधिरमेदोमज्जास्नायवोऽस्थीनि में शुध्यन्तांज्योतिरहं विरजा विपाप्मा भूयासं स्वाहा।

८ . शिरःपाणिपादपार्श्वपृष्ठोरुदरजंघशिश्नोपस्थपायवो मे शुद्धन्तां ज्योतिरहं विरजा विमाप्मा भूयासं स्वाहा ॥

९ . पृथिव्यापस्तेजोवायुराकाशा मे शुध्यन्तां ज्योतिरहं विरजा विपाप्मा भूयासं स्वाहा।

१० . शब्दस्पर्शरुपरसगन्धा मे शुध्यतां ज्योतिरहं विरजा विपाप्मा भूयासं स्वाहा।

११ . मनोवाक्कायकर्माणि मे शुध्यतां ज्योतिरहं विरजा विपाप्मा भूयासं स्वाहा।

१२ . अव्यक्तभावैरहंकारैर्ज्योतिरहं विरजा विपाप्मा भूयासं स्वाहा ॥

१३ . आत्मां मे शुध्यन्तां ज्योतिरहं विरजा विपाप्मा भूयासं स्वाहा।

१४ . अन्तरात्मा मे शुध्यन्तां ज्योतिरहं विरजा विपाप्मा भूयासं स्वाहा॥

१५ . परमात्मा मे शुध्यन्तां ज्योतिरहं विरजा विपाप्मा भूयासं स्वाहा।

व्यस्तसमस्तव्याहृतीनां विश्वामित्रजमदग्निभरद्वाजप्रजापतय ऋषयः अग्निवायुसूर्यप्रजापतयो देवताः । गायत्र्युष्णिगनुष्टुब्बृत्यश्छदांसि । प्रायश्चित्तप्रधानाज्यहोमे विनियोगः ।

१६ . ॐ भूः स्वाहा। अग्नय इदं न मम।

१७ . ॐ भुवः स्वाहा। वायव इदं न मम।

१८ . ॐ स्वः स्वाहा। सूर्याय इदं न मम।

१९ . ॐ भूर्भुव स्वः स्वाहा। प्रजापतय इदं न मम।

परिसमूहनम। परिसमूहनम। परिसमूहनम।

पर्युक्षणम। पर्युक्षणम। पर्युक्षणम।

पूजनम -

ॐ विश्वानि नो दुर्गहा जातवेदः।

ॐ सिंधु न नावा दुरितार्तिपर्षि।

ॐ अग्ने अत्रिवन्नमसा गृणानः।

ॐ अस्माकं बोध्यविता तनूनाम।

ॐ यस्त्वा हृदा कीरिणा मन्यमानः।

ॐ अमर्त्य मर्त्यो जोहवीमि।

ॐ जातवेदो यशो अस्मासु धेहि।

ॐ प्रजार्भिरग्ने अमृतत्वमश्याम ॥

ॐ यस्मै त्वं सुकृते जातवेद उ लोकमग्ने कृणवः स्योनम।

अश्विनं सपुत्रिणं वीरवर्त गोमंत रयिं नशते स्वस्ति ॥

विभूतिग्रहणम - मानस्तोक इत्यस्य कुत्सो रुद्रो जगती। विभूतिग्रहणे विनियोगः।

ॐ मा नस्तोके तर्नये मा नं आयौ मा नो गोषु मा नो अश्वेषु रीरिषः। वीरान्मा नो रुद्रभामितो वधीर्हविष्मंत सदमित्वा हवामहे।

त्र्यायुषं जमदग्नेरिति ललाटे।

कश्यपस्य त्र्यायुषं कण्ठे।

अगस्त्यस्य त्र्यायुषं नाभौ।

यद्देबानां त्र्यायुषं दक्षिणस्कंधे।

तन्मे अस्तु त्र्यायुषं वामस्कंधे।

सर्वमस्तु शतायुषं शिरासे।

प्रार्थना - श्रद्धां मेधां यशः प्रज्ञां विद्यां बुद्धिं श्रियं बलम।

आयुष्यं तेज आरोग्यं देहि मे हव्यवाहन ॥

प्रमादात्कुर्वतां कर्म प्रच्यवेताध्वरेषु यत।

स्मरणादेव तद्विष्णोः संपूर्ण स्यादिति स्मृतिः ॥

आचमनं।

पुरानोक्तप्रयोग

१ आचमनम - ॐ केशवाय नमः। नारायणाय नमः। माधवाय नमः। गोविंदाय नमः विष्णवे नमः। मधुसुदनाय नमः। त्रिविक्रमाय नमः। वामनाय नमः। श्रीधराय नमः। हृषीकेशाय नमः। पद्मनाभाय नमः। दामोदराय नमः। संकर्षणाय नमः। वासुदेवाय नमः। प्रद्युम्नाय नमः। अनिरुद्धाय नमः। पुरुषोत्तमाय नमः। अधोक्षजाय नमः। नारसिंहाय नमः। अच्युताय नमः। जनार्दनाय नमः। उपेंद्राय नमः। हरये नमः। श्रीकृष्णाय नमः ॥

अग्न्यावाहनम -

एह्येहि सर्वामरहव्यवाह मुनिप्रवर्यैरभितोऽभिजुष्ट।

तेजोवता लोकगणेन सार्धं ममाध्वरं पाहि कवे नमस्ते ॥

अग्निस्थापना -

श्री अग्नये विटाय नमः। विटनामानमग्नि प्रतिष्ठापयामि। ( प्रोक्षितेधनानि निक्षिप्य वेणुधमन्या प्रबोध्य ध्यायेत )

अग्निध्यानम -

सप्तहस्तः चतुःशृंगः सप्तजिव्हो द्विशीर्षकः।

त्रिपात्प्रसन्नवदनः सुखासीनः शुचिस्मितः ॥१॥

स्वाहां तु दक्षिणे पार्श्वे देवी वामे स्वधां तथा।

बिभ्रद्दक्षिणहस्तैस्तु शक्तिमन्नं स्रुचं स्रुवम ॥२॥

तोमरं व्यजनं वामैर्घृतपात्रं च धारयन।

मेषारुढो जटाबद्धो गौरवर्णो महौजसः ॥३॥

धूम्रध्वजो लोहिताक्षः सप्तार्चि सर्वकामदः।

आत्मभिमुखमासीन एवंरुपो हुताशनः ॥४॥

अग्नै वैश्वानर शांडिल्यगोत्र मेषध्वज प्रांगमुखो देव मम संमुखो वरदो भव।

अग्न्यर्चनमः - १ अग्नये नमः। २ वैश्वानराय नमः। ३ वन्हये नमः। ४ वीतिहोत्राय नमः। ५ धनंजयाय नमः। ६ कृपीट्योनये नमः। ७ ज्वलनाय नमः। ८ जातवदसे नमः ॥

होमः -

आग्नेय पुरुषो रक्तः सर्वदेवमयोऽव्ययः।

धुम्रकेतू रजोध्यक्षः तस्मै नित्यं नमो नमः ॥१॥

वदनदानध्वजधरो धावद्धरिणपृष्ठगः।

धूम्रवर्णश्च यो वायुः तस्मै नित्यं नमो नमः ॥२॥

जपाकुसुमसंकाशं काश्यपेयं महाद्युतिम।

तमोऽरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम ॥३॥

सुवाक्षमालाकरकपुस्तकाढ्यं चतुर्भुजम।

प्रजापतिं हंसयानमेकवक्त्रं नमामि तम ॥४॥

स्विष्टकृद्धोमः -

समधिकमपि हीनं जातमस्मिन क्रतौ यत।

भवतु सुकृतमग्ने तद्धि सर्व सुपूर्णम ॥

प्रचुरदयितदात्रे स्विष्टकृत्ते जुहोमीदमथ सकलकामान वर्धय त्वं सदा मे ॥

प्रार्थना -

श्रद्धां मेधां यशः प्रज्ञां विद्यां बुद्धिं श्रियं बलम।

आयुष्यं तेज आरोग्यं देहि मे हव्यवाहन ॥

प्रमादात्कुर्वतां कर्म प्रच्यवेताध्वरेषु यत।

स्मरणादेव तद्विष्णोः संपूर्ण स्यादिति स्मृतिः ॥

तत्सब्रह्मार्पणमस्तु।

टीप : पुराणोक्त संस्कारात जान्हवे ऐच्छिक असते.

गावांतील किंवा जातीतील कमीतकमी तीन विद्वान व सभ्य गृहस्थांना एकत्र आणून त्यांची पुढीलप्रमाणे प्रार्थना करावी .

हे द्विजश्रेष्ठ हो , तुम्ही सर्व धर्मवेत्ते आणि धर्माचे रक्षण करणारे आहांत . माझे शरीर आपण शुद्ध करावे . मी अत्यंत भयंकर व मोठे पाप केले आहे . माझ्यावर कृपा करा आणि मला मंगल आज्ञा करा . आपल्यासारख्या थोर लोकांनी मला शुद्ध केले असतां मी पवित्र होईन . अशी प्रार्थना करुन असन्मतपरिग्रहाबद्दल मला प्रायश्चित्त सांगून कृतार्थ करावे असे म्हणून सर्व सभ्यांना एक साष्टांग नमस्कार घालावा .

( प्रायश्चित्तकथन व संकल्प यांमध्ये ज्ञात्या लोकांच्या सल्ल्याने जरुर वाटल्यास फरक करावा . )

प्रायश्चित्तकथनमः -

आजपर्यंत झालेल्या पातकांच्या नाशाकरितां , खोट्या मताचा अनुयायी होऊन पतित झालां त्या पतितपणाच्या नाशाकरितां परिषदेने सांगितलेले सक्षौर कृच्छत्रय प्रायश्चित्त करण्याचे कबूल करावे व सन्मानपूर्वक नमस्कार करुन परिषदेचे विसर्जन करावे .

आचमनः -

नंतर आचामन करावे .

संकल्पः -

मला स्वतःला वेद , स्मृति आणि पुराणे यांमध्ये लिहिल्याप्रमाणे फले प्राप्त व्हावीत याकरितां आजपर्यंत झालेल्या पातकांच्या नाशाकरितां परिषदेने सांगितलेले क्षौरासहित कृच्छ्रत्रयप्रायश्चित्त मी करितो .

क्षौरः -

आज प्रायश्चित्तांगाने काख वगैरेंनी सहित क्षौर करवितो असा संकल्प सोडून डोक्यावर हात ठेवून पुढील मंत्राने क्षौर करवावे .

ब्रह्महत्येसारखी जी कांही पातके आहेत , ती केशांचा आश्रय करुन राहतात म्हणून मी केश काढून टाकतो . क्षौरानंतर मृत्तिका गोमय अवळकटि अंगाला लावून स्नान करावे . ( क्षौर केले नाही किंवा करण्यास सवड किंवा शक्यता नसल्यास एक पावली द्यावी किंवा इष्ट देवतेचा १०८ वेळा जप करावा .)

पंचगव्यप्राशनः -

प्रथम प्रायश्चित्त घेण्याला पात्रता यावी आणि शरीर शुद्ध व्हावे याकरिता पंचगव्य घेतो असा संकल्प सोडावा . व ’ यत्वगस्थि ’ या मंत्राने तीन वेळा पंचगव्य प्यावे .

जे माझे कातडे , हाडे यांत मुरलेले पाप माझ्या शरीरात असेल , ते पंचगव्य प्याल्याने अग्नि लाकडाला जाळतो त्याप्रमाणे जळून जाईल .

गाईचे दूध , दही , तूप , शेण व मूत्र एकत्र कालवावे म्हणजे पंचगव्य होते .

दण्डप्रदानः -

कृच्छ्रत्रय प्रायश्चित्तादाखल गोनिष्क्रय द्रव्य देतो असे म्हणून ब्राह्मणाला यथाशक्ति द्रव्यदान करावे .

पंचगव्याच्या अभावी तुळसीपत्राने कार्य करावे .

महाभिषेकः -

वरील मंत्र म्हणून महाभिषेक करावा . त्याचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे . अभिषेकाकरितां अत्यंत स्वच्छ पाणी प्यावे . आणि ते पाणी आंबा , अशोक , वगैरे पवित्र वृक्षांच्या पानांनी किंवा दर्भांनी त्या गृहस्थाच्या अंगावर शिंपडावे .

मंत्राचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे -

ब्रह्मा , विष्णु आणि महेश्वर हे देव तुला अभिषेक करोत . वासुदेव , जगन्नाथ , संकर्षणप्रभु तसेंच प्रद्युम्न व अनिरुद्ध तुला जय देवोत .

भगवान इंद्र , अग्नि , यम , निऋति , वायु , कुबेर , शिव व ब्रह्मासहित सर्व दिक्पाळ तुझे संरक्षण करोत .

कीर्ति , लक्ष्मी , धृति , मेधा , पुष्टि , श्रद्धा , क्रिया , मति , बुद्धि , लज्जा , वपू , शांति , पुष्टि , तुष्टि , या मातृभूत असणार्‍या सर्व देवपत्न्या तुला अभिषेक करोत . आदित्य , चंद्र , मंगळ , बुध , गुरु , शुक्र , शनि , राहू व केतु हे सर्व ग्रह तुला अभिषेक करोत .

ऋषि , मुनि , गाई , देवमाता , देवपत्नी , वृक्ष , नाग , दैत्य आणि अप्सरांचे समुदाय , अस्त्रे , सर्व शस्त्रे , राजे , वाहने औषधे , रत्ने , कालाचा अवयव , नद्या , समुद्र , पर्वत , तीर्थे , जलराक्षस हे सर्व तुझ्या इच्छा पूर्ण होण्याकरिता तुला अभिषेक करोत . हे सर्व तुला मदत करणारे होवोत .

तिलकधारणः -

कपाळी कुंकू , चंदन आणि केशर यांचे चांगले गंध लावावे . स्त्रियांनी कपाळी कुंकू , हातांत बांगड्या व हिंदु पद्धतीची वस्त्रे , केशरचना वगैरे करावी .

येथे साधकाच्या इष्ट देवतेची त्याच्याकडून गंध , पुष्प वाहून , पूजा करवावी ; गीता व ॐ कार यांनी गंधफूल वाहावे .

नामकरणः -

नांवे बदलण्याची जरुरी असल्यास पुरुषांची देवतास्थलादिकांची आणि स्त्रियांची नक्षत्र , नद्या वगैरेंची नांवे ठेवावीत .

अभिवादनः -

हजारो रुपाने असणार्‍या अन्तहीन अशा परमेश्वरास नमस्कार .

तीर्थप्राशनः -

अकाली मृत्यु न येऊं देणारे व सर्व रोग नाहींसे करणारें असे विष्णूच्या पायाचे तीर्थ मी प्राशन करितो .

असे म्हणून देवाचे किंवा पवित्र स्थलाचे पाणी प्राशन करावे .

मंत्रोपदेशः -

याप्रमाणे विधि झाल्यानंतर हिंदु होणारास कांही उपासना करावयाची असल्यास त्याच्या इच्छेस अनुसरुन राम , कृष्ण , शिव वगैरे कोणत्याहि देवतेची उपासना त्यास करण्यास सांगावी व त्याच्या इच्छेस अनुसरुन तो ज्या देवतेचा उपासक होऊ इच्छित असेल त्या देवतेचा ’ नमो भगवते वासुदेवाय ’ नमः शिवाय ’ ’ नमो रामचंद्राय ’ या प्रमाणे एखादा मंत्र द्यावा व त्यास त्याचा रोज सोळा , चोवीस , अठ्ठेचाळीस , एकशेआठ असा जप करण्यास सांगावे . भगवद्गीता हा आपला धर्मग्रंथ असे सांगून नित्यशः त्याचे पठण करण्यास त्यास सांगावे .

हे सर्व श्लोक किंवा एकादा श्लोक साधकाला उपदेशावेत . आणि दररोज सकाळ संध्याकाळ त्याला ते म्हणावयास सांगावेत .

हा विधि झाल्यानंतर इच्छेनुसार यज्ञोपवीत देऊन होम करावा . पूर्वी उपनयन होऊन धर्मांतर झाले असल्यास पुनरुपनयन करावे व नंतर होम करावा .

१ . परक्यांचा धर्म सुखाने आचरतां आला तरी त्यापेक्षा आपल्या धर्मातच , त्याप्रमाणे वागत असतां मरण आले तरी कल्याण आहे ; परंतु परक्याचा धर्म भयंकर आहे .

२ . मोठा दुराचारी का असेना , मला जर तो अनन्यभावाने भजत आहे , तर तो साधूच समजला पाहिजे . कारण त्याच्या बुद्धीचा निश्चय चांगला झालेला असतो . ( ९ . १० )

३ . तो लवकर धर्मात्मा होतो व नित्य शान्ति पावतो . हे कौन्तेया , तूं असे पक्के समज की , माझा भक्त कधींहि नाश पावत नाही . ( ९ . ३१ )

४ . हे अर्जुना , ईश्वर सर्व भूतांच्या हृदयांत राहून यंत्रावर चढविल्याप्रमाणे सर्व भूतांना आपल्या मायेने चाळवीत असतो . ( १८ . ६१ )

५ . ज्याच्यापासून सर्व भूतांची प्रवृत्ति झाली व ज्याने हे सर्व जग विस्तारिले किंवा व्यापिले आहे त्याची पूजा आपल्या सत्कृत्याने केली असतां आपणास मोक्ष प्राप्त होत असतो .

२ . जिकडे योगेश्वर श्रीकृष्ण व जिकडे धनुर्धर अर्जुन तिकडेच श्री , विजय , शाश्वत ऐश्वर्य व नीति असते असे माझे मत आहे . ( १८ . ७८ )

हे पवित्रता देणार्‍या अग्ने , तूं आमचे पवित्र जीवित सुरक्षितोस . तूं आम्हाला अन्न आणि बल दे आणि जीविताला अपाय करणार्‍या दुष्ट लोकांना आमच्यापासून दूर आहेत तोंच नष्ट करुन टाक .

ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य , शुद्र व भिल्लादिकांना आपलासा वाटणारा , सर्वज्ञ , सर्वांना शुद्ध करणारा , पुढे ठेवलेला अशा ह्या स्तुत्य अग्नीची आम्ही प्रार्थना करीत आहोत .

हे अग्निनारायणा , सत्कृत्ये घडविणारा तूं अद्भुत कृत्ये घडविणारे तेज आमच्यांत येऊं दे . तसेच संपत्ति आणि सामर्थ्य मला दे .

हे प्रजापते , तुझ्याशिवाय दुसरा कोणीहि सध्यां उत्पन्न झालेले हे जग व्यापून नाही . ( तूंच एक फक्त या जगावर सत्ता चालवूं शकतोस . ) ज्या इच्छेने आम्ही तुझे पूजन करतो त्या आमच्या इच्छा पूर्ण होवोत . आम्ही , धनाधिपति व्हावे .

अर्थ -

या आज्यहोमाच्या योगाने प्राणादि पांच वायू शुद्ध होवोत . त्यामुळे ज्ञान - प्रतिबन्धक पापरहित व पापकारणीभूत रजोगुणानेहिं रहित होऊन जे जगत्कारणभूत परब्रह्म तेंच मी व्हावे , त्यासाठी हे आज्य सुहुत असो . माझी वागादि - घ्राणान्त इन्द्रिये , गुह्येंद्रिये , निचयात्मिका बुद्धिवृत्ति अनिचयरुप आकृतिवृत्ती व हे चांगले आहे अशा प्रकारची संकल्पवृत्ति ही सर्व शुद्ध होवोत . मी निष्पाप , रजोगुणरहित व स्वप्रकाश परब्रह्म व्हावे . माझ्या स्थूल शरीरांतील त्वचा , चर्म , मांस , रक्त , मेद , मज्जा , स्नायु व अस्थि शुद्ध होवोत व त्यामुळे मी निष्पाप , रजोगुणरहित व स्वयंप्रकाश व्हावे . माझ्या स्थूल शरीराचे मालक , हात , पाय , कुशी , पाठ , मांड्या , उदर , जंघा , शिश्न , उपस्थ व वायु हे अवयव शुद्ध होवोत व त्यामुळे मी निष्पाप , रजोगुणारहित व स्वप्रकाश व्हावे .

अर्थ -

माझ्या शरीराची उपादान कारणभूत पृथिव्यादि भूते शुद्ध होवोत . मी निष्पाप , रजोगुणरहित , स्वयंप्रकाश व्हावे . ( पुढील सर्व पर्यायांत ’ ज्योतिरहं विरजा विपाप्मा भूयासं स्वाहा ’ याचा अर्थ असाच समजावा . ) माझ्या शरीरांतील पंचमहाभूतांत असणारे जे शब्दादि गुण ते शुद्ध होवोत . माझी मन , वाणी , व शरीर यांच्या द्वारे होणारी कर्मे शुद्ध होवोत . हे परमात्म्या , ज्यांचा अभिप्राय लोकांमध्ये प्रकट केलेला नाही , अशा व्यर्थ कर्मापासून तुझ्या प्रसादाने मी मुक्त व्हावे . माझे शरीर शुद्ध होवो ; माझे अंतःकरण शुध्द होवो ; माझा परमात्मा शुद्ध होवो .

पुनरुनयन केल्यानंतर वेदोक्त किंवा पुराणोक्त प्रायश्चित्त प्रधान होम करावा . यज्ञोपवीत द्यावयाचे असल्यास होम करण्याच्या अगोदर यज्ञोपवीताचा मंत्र म्हणून ते द्यावे . प्रत्येक आहूतीचा वेळी पळीभर तूप अग्नीत टाकावे .


References :

मुद्रक व प्रकाशक - शंकर रामचंद्र दाते, लोकसंग्रह छापखाना, २७ बुधवार पेठ, पुणें.
 
सन - १९२७

लेखक - सिद्धेश्वरशास्त्री चित्राव.

अध्यात्म ४८ 
Last Updated : August 31, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP