श्रीजनार्दनस्वामींचे ताटीचें अभंग - १

श्रीजनार्दस्वामींचे ताटीच्या अभंगांचे पारायण करणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती आहे.


चहुं युगामाजीसिद्ध संत झाले । योगेंचि तरले होती तेही ॥१॥

नोहेंचि उद्धार राजयोगे वीण । घाले राम कृष्ण हरि हर ॥२॥

योगेंचि ते मुक्त शुकसनकादिक । नारद जनक शिव उमा ॥३॥

राजयोगी पुर्ण स्वामी दत्तात्रेय । जनार्दना दावी सिद्धमार्ग ॥४॥

योगेंनि साधक झाले स्वयें देव । जाणती वैष्णव स्वानुमवी ॥५॥

कवण चौपुडें तेथं सुरनर । न येचि ढेंकर तृप्तीविण ॥६॥

अनुभवें तेंचि होवोनिया आपण । स्थापिती कर्म ज्ञान भक्ति नाम ॥७॥

नेणोनि उद्धोध वेति भ्रम मुढ । आवडे तें वाड म्हणती हेंचि ॥८॥

धिक्कारिती विषय झाल्या गर्भ स्थीर । त्यागों नये घराचार म्हणुनी येरी ॥९॥

योगेविण प्राप्त कैवल्य तया नाश । बाह्मनामें ओस भक्ति ज्ञानें ॥१०॥

नलमे अक्षयसुख केलियांही कांहीं । व्यर्थनाम तें ही योगेविण ॥११॥

यागेंची होवोनि जपती तें नाम । नारदा वाल्मीक व्यास शीव ॥१२॥

न येता रुपासी आधी कैचें नाम । लक्षोनि श्रीराम गावें तया ॥१३॥

योगेंवीण नाहीं स्त्रियां पुरुषां गती । न चुके अधोगती करिता सर्व ॥१४॥

म्हणोनि गुरुसी व्हावें सर्वस्वे अर्पण । खेचरा शरण नाम ॥१५॥

म्हणे जनार्दन सावध हो उठी । उघडी भ्रम तो एकनाथ ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP