* कुर्चव्रत :
एक काम्य व्रत. फाल्गुन शु. १४ शीच्या दिवशी उपवास, पौर्णिमेला पंचगव्य प्राशन आणि वद्य प्रतिपदेचे हविष्यान्न भोजन असा याचा विधी आहे. व्रताचे फल - त्या मासातल्या पापचे निराकरण व इंद्राची प्रसन्नता.
* सर्वार्तिहरव्रत :
एक काम्य व्रत. याचा विधी असा - फाल्गुन शु. चतुर्दशीच्या दिवशी प्रात:स्नानादी नित्यकर्मे आटोपल्यावर
'मम सकलपापतपप्रशमनकामनया ईश्वरप्रीतये सर्वार्तिहरव्रतं करिष्ये'
असा संकल्प करावा. मग कामक्रोधादी विषयांचा व मिथ्या भाषणांदींचा त्याग करून सूर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत सूर्यसन्मुख राहावे. त्यानंतर पुनश्च स्नान करून विधिवत सूर्यपूजा करावी. रात्री निराहार राहून दुसर्या दिवशी उपवास सोडावा. फल - रोगमुक्ती व पापनाश.