संकष्टी :
ही वरदमूर्ती चतुर्थी आहे. या दिवशी गोमूत्र पिऊन दिवसभर उपवास करावा. सायंकाळी श्रीवरदमूर्ती गणेशाची पूजा करावी व आरती, मंत्रपुष्प करून गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. ब्राह्मणभोजन घालून मग आपण जेवावे. यायोगे एकाक्षरी मंत्राची सिद्धी प्राप्त होते. असे हे सर्वसिद्धिविनायक व्रत आहे. हे व्रत जो आचरील व कथा श्रवण करील, त्याचे निरंतर कल्याण होईल.