भाद्रपद शु. सप्तमी

Bhadrapada shudha Saptami


* अपराजित सप्तमी

भाद्रपद शु. सप्तमीला अपराजिता सप्तमी असे नाव आहे. चतुर्थीला एकभुक्‍त राहून पंचमीला नक्‍त भोजन, षष्ठीला उपवास व सप्तमीला सूर्यपूजा करून मग पारणे, असे त्याचे विधान आहे. आश्‍विनादी, मार्गशीर्षादी फाल्गुनादी व ज्येष्ठादी असे या व्रताचे चार प्रकार असून त्यांच्या देवत अनुक्रमे भर्ग, अंशुमन, अर्यमा व सविता या आहेत. या व्रतात वरील देवतांची पूजा व प्रार्थना करायची असते. हे व्रत आचरणारा युद्धात शत्रूला पराजित करतो व त्रिवर्गावर जय मिळवून सूर्यलोकात जातो, असे सांगितले आहे. व्रतावधी एक वर्ष.

* अमुक्‍ताभरणव्रत

हे व्रत मुख्यत: स्त्रियांसाठी आहे. या दिवशी शिव-पार्वतीच्या चित्राकृती स्थापून त्याच्या पार्श्‍वभागी सोन्यारुप्याच्या तारांचा अथवा सुताचा दोरा वळून ठेवतात. नंतर षोडशोपचार पूजा करतात. पूजेचा मंत्र असा-

मन्दारमालाकुलितलकायै

कपालमालाङ्‌कितशेखराय ।

दिव्याम्बरायै च दिग्मबराय

नम: शिवायै च नम: शिवाय ॥

N/A

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP