वर्णषष्ठी :
श्रावण शु. षष्ठीला हे व्रत करतात. व्रतावधी पाच वर्षे. व्रतदिनी शिवमंदिरात जाऊन शिवाची पूजा करावी अगर प्रतिमेची पूजा घरीच करावी. पूजेनंतर शिवाला वरणभाताचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्यात खारावलेल्या आंब्याचा समावेश असावा. मग हे पदार्थ ब्राह्मणाला दान द्यावेत. उद्यापनाच्या वेळी होमहवन करून त्यात चरू व आंब्यांची पाने यांच्या आहुती द्याव्यात.
फल - अपमृत्यूपासून मुक्तत.