नवमोऽध्याय:
ध्यानम्
ॐ बन्धूककाञ्चननिभं रुचिराक्षमालां
पाशाङ्कुशौ च वरदां निजबाहुदण्डै: ।
बिभ्राणमिन्दुशकलाभरणं त्रिनेत्र-
मर्धाम्बिकेशमनिशं वपुराश्रयामि ॥
'ॐ' राजोवाच ॥१॥
विचित्रमिदमाख्यातं भगवन् भवता मम ।
देव्याश्र्चरितमाहात्म्यं रक्तबीजवधाश्रितम् ॥२॥
भूयश्चेच्छाम्यहं श्रोतुं रक्तबीजे निपातिते ।
चकार शुम्भो यत्कर्म निशुम्भश्चातिकोपन: ॥३॥
ऋषिरुवाच ॥४॥
चकार कोपमतुलं रक्तबीजे निपातिते ।
शुम्भासुरो निशुम्भश्च हतेष्वन्येषु चाहवे ॥५॥
हन्यमानं महासैन्यं विलोक्यामर्षमुद्वहन् ।
अभ्यधावन्निशुम्भोऽथ मुख्ययासुरसेनया ॥६॥
तस्याग्रतस्तथा पृष्ठे पार्श्वयोश्र्च महासुरा: ।
संदष्टौष्ठपुटा: क्रुद्धा हन्तुं देवीमुपाययु: ॥७॥
आजगाम महावीर्य: शुम्भोऽपि स्वबलैर्वृत: ।
निहन्तुं चण्डिका कोपात्कृत्वा युद्धं तु मातृभि: ॥८॥
ततो युद्धमतीवासीद् देव्या शुम्भनिशुम्भयो: ।
शरवर्षमतीवोग्रं मेघयोरिव वर्षतो: ॥९॥
चिच्छेदास्ताञ्छरांस्ताभ्यां चण्डिका स्वशरोत्करै: ।
ताडयामास चाङ्गेषु शस्त्रौघैरसुरेश्वरौ ॥१०॥
निशुम्भो निशितं खड्गं चर्म चादाय सुप्रभम् ।
अताडयन्मूर्ध्नि सिंहं देव्या वाहनमुत्तमम् ॥११॥
ताडिते वाहने देवी क्षुरप्रेणासिमुत्तमम् ।
निशुम्भस्याशु चिच्छेद चर्म चाप्यष्टचन्द्रकम् ॥१२॥
छिन्ने चर्मणि खड्गे च शक्तिं चिक्षेप सोऽसुर: ।
तामप्यस्य द्विधा चक्रे चक्रेणाभिमुखागताम् ॥१३॥
कोपाध्मातो निशुम्भोऽथ शूलं जग्राह दानव: ।
आयातं मुष्टिपातेन देवी तच्चाप्यचूर्णयत् ॥१४॥
आविध्याथ गदां सोऽपि चिक्षेप चण्डिकां प्रति ।
सापि देव्या त्रिशूलेन भिन्ना भस्मत्वमागता ॥१५॥
तत: परशुहस्तं तमायान्तं दैत्यपुङ्गवम् ।
आहत्य देवी बाणौघैरपातयत भूतले ॥१६॥
तस्मिन्निपतिते भूमौ निशुम्भे भीमविक्रमे ।
भ्रातर्यतीव संक्रुद्ध: प्रययौ हन्तुमम्बिकाम् ॥१७॥
स रथस्थस्तथात्युच्चैर्गृहीतपरमायुधै: ।
भुजैरष्टभिरतुलैर्व्याप्याशेषं बभौ नभ: ॥१८॥
तमायान्तं समालोक्य देवी शङ्खमवादयत् ।
ज्याशब्दं चापि धनुषश्चकारातीव दु:सहम् ॥१९॥
पूरयामास ककुभो निजघण्टास्वनेन च ।
समस्तदैत्यसैन्यानां तेजोवधविधायिना ॥२०॥
तत: सिंहो महानादैस्तयाजितेभमहामदै: ।
पूरयामास गगनं गां तथैव दिशो दश ॥२१॥
तत: काली समुत्पत्य गगनं क्ष्मामताडयत् ।
कराभ्यां तन्निनादेन प्राक्स्वनास्ते तिरोहिता: ॥२२॥
अट्टाट्टहासमशिवं शिवदूती चकार ह ।
तै: शब्दैरसुरास्त्रेसु: शुम्भ: कोपं परं ययौ ॥२३॥
दुरात्मंस्तिष्ठ तिष्ठेति व्याजहाराम्बिका यदा ।
तदा जयेत्यभिहितं देवैराकाशसंस्थितै: ॥२४॥
शुम्भेनागत्य या शक्तिर्मुक्ता ज्वालातिभीषणा ।
आयान्ती वन्हिकूटाभा सा निरस्ता महोल्कया ॥२५॥
सिंहनादेन शुम्भस्य व्याप्तं लोकत्रयान्तरम् ।
निर्घातनि:स्वनो घोरो जितवानवनीपते ॥२६॥
शुम्भमुक्ताञ्छरान्देवी शुम्भस्तत्प्रहिताच्छरान् ।
चिच्छेद स्वशरैरुग्रै: शतशोऽथ सहस्रश: ॥२७॥
तत: सा चण्डिका क्रुद्धा शूलेनाभिजघान तम् ।
स तदाभिहतो भूमौ मूर्च्छितो निपपात ह ॥२८॥
ततो निशुम्भ: सम्प्राप्य चेतनामात्तकार्मुक: ।
आजघान शरैर्देवीं कालीं केसरिणं तथा ॥२९॥
पुनश्च कृत्वा बाहूनामयुतं दनुजेश्वर: ।
चक्रायुधेन दितिजश्छादयामास चण्डिकाम् ॥३०॥
ततो भगवती क्रुद्धा दुर्गा दुर्गातिनाशिनी ।
चिच्छेद तानि चक्राणि स्वशरै: सायकांश्च तान् ॥३१॥
ततो निशुम्भो वेगेन गदामादाय चण्डिकाम् ।
अभ्यधावत वै हन्तुं दैत्यसेनासमावृत: ॥३२॥
तस्यापतत एवाशु गदां चिच्छेद चण्डिका ।
खड्गेन शितधारेण स च शूलं समाददे ॥३३॥
शूलहस्तं समायान्तं निशुम्भममरार्दनम् ।
ह्रदि विव्याध शूलेन वेगाविद्धेन चण्डिका ॥३४॥
भिन्नस्य तस्य शूलेन ह्रदयान्नि:सृतोऽपर: ।
महाबलो महावीर्यास्तिष्ठेति पुरुषो वदन् ॥३५॥
तस्य निष्क्रामतो देवी प्रहस्य स्वनवत्तत: ।
शिरश्र्चिच्छेद खड्गेन ततोऽसावपतद्भुवि ॥३६॥
तत: सिंहश्चखादोग्रं दंष्ट्राक्षुण्णशिरोधरान् ।
असुरांस्तांस्तथा काली शिवदूती तथापरान् ॥३७॥
कौमारीशक्तिनिर्भिन्ना: केचिन्नेशुर्महासुरा: ।
ब्रह्माणीमन्त्रपूतेन तोयेनान्ये निराकृता: ॥३८॥
माहेश्वरीत्रिशूलेन भिन्ना: पेतुस्तथापरे ।
वाराहीतुन्डघातेन केचिच्चूर्णीकृता भुवि ॥३९॥
खण्डं खण्डं च चक्रेण वैष्णव्या दानवा: कृता: ।
वज्रेण चैन्द्रीहस्ताग्रविमुक्तेन तथापरे ॥४०॥
केचिद्विनेशुरसुरा: केचिन्नष्टा महाहवात् ।
भक्षिताश्र्चापरे कालीशिवदूतीमृगाधिपै: ॥ॐ॥४१॥
इति श्रीमार्कंण्डेयपुराणे सावर्णिके मन्वन्तरे
देवीमाहात्मये
निशुम्भवधो नाम नवमोऽध्याय ॥९॥
उवाच २, श्लोका: ३९, एवं ४१,
एवमादित: ५४३ ॥
ज्या वरदायिनी देवीचा रंग बंधूक आणि सुवर्ण-पुष्पाप्रमाणे पिवळसर आहे, जिच्या कंठी सुंदर व आवडती अक्षमाला आहे, हाती पाश व अंकुश घेऊन भक्त सहाय्यास जी आतुर आहे, किरीटावरील रत्नजडित चंद्रकोर जिचे सुशोभित आभूषण आहे, त्या अर्धनारीनटेश्वराच्या स्त्रीरूपाला मी सदैव शरण आहे, नम्र आहे.
राजा म्हणाला, "हे मुनिवर देवीच्या या अद्भुत कथा, देवीचे चरित्र, तिचा पराक्रम, तिचे चातुर्य, तिची युद्धनीति आणि प्रत्यक्ष युद्धातील संघर्ष या कथा रक्तबीजाचा वध देवीने केला इथपर्यंत आम्ही ऎकल्या. ॥१॥२॥
आता रक्तबीज-वधानंतर संतापाने जळून अग्नीप्रमाणे तप्त झालेले शुंभ आणि निशुंभ या दैत्यांचा वध देवीने कसा केला हे ऎकण्याची आमची उत्सुकता आता पराकोटीस गेली आहे. तेव्हा कृपया त्या कथा तुम्ही आम्हाला सांगाव्यात." ॥३॥
ऋषी म्हणाले, "रक्तबीजाचा वध देवीने केल्यानंतर व त्याच्या सर्व शूर सेनानींचा पाडाव केल्यानंतर देवीवर संतापलेले शुंभ आणि निशुंभ यांचा क्षोभ अनावर झाल्याने आता आपण स्वत: देवीशी लढण्याशिवाय पर्याय नसल्याने ते चरफडू लागले. ॥५॥
देवीबद्दल भयानक त्वेष व चीड येऊन त्याने आपली सेना संगरात घ्यायला आपल्या सामंतांना सांगून चण्डमुण्ड-वध आणि अपार सेनेसहित झालेल्या रक्तबीजाच्या वधाचा सूड घ्यायच्या निश्चयाने निशुंभ राक्षसवीराने देवीवर हल्ला चढविला. ॥६॥
आगेमागे सर्व बाजूंनी कडेकोट संरक्षणात व सेनेने घेरलेल्या रक्षण-अवस्थेत ओठ फडकावून शिवीगाळ करीत, आरोळ्या देत, त्वेष व चीड व्यक्त करीत, आता मी देवीला ठारच मारीन याच निश्चयाने त्याने चाल केली. ॥७॥
त्याच्या पाठोपाठ शुंभराज हा दैत्य महावीर आपली शस्त्रे, अस्त्रे, शक्ति-सेनासागर घेन त्याचे (निशुंभाचे) पाठोपाठ महामाया चण्डिकेला मारण्याच्याच उद्देशाने अत्यंत त्वेषावेशाने रणभूमीत पोहोचला. ॥८॥
देवी व शुंभ-निशुंभाचे युद्ध सुरू झाले. त्या वेळी मेघमालेतून जलवर्षाव व्हावा तसा बाणांचा वर्षाव उभय पक्षांकडून एकमेकांवर करण्यात आला. व घोर झुंजीस सुरुवात झाली. ॥९॥
राक्षसाकडून देवीवर आलेल्या बाणांचे चूर्ण देवी आपल्या बाणांनी तात्काळ करी. आपल्या हातांतील निरनिराळी आयुधे चालवून देवी दैत्यांवर वार करून त्यांना घायाळ करी. ॥१०॥
निशुंभाने आपली वाकडी तलवार व ढाल जी सुवर्ण व रत्नजडित असल्याने चमचमत होती ती हाती घेऊन देवीचे वाहन सिंहराजाच्या डोक्यावर एक कठीण प्रहार केला. ॥११॥
आपल्या सिंहावर वार झालेला पाहून देवी चण्डिकेने आपल्या हातातील क्षुरप्र बाणाने निशुंभाची तलवार मोडून टाकली आणि चंद्रासारखी तेजस्वी आठ दिव्यरत्ने बसविलेली राक्षसाची ढाल तोडून फोडून टाकली. ॥१२॥
आपल्या हातातील ढाल व तलवार मोडलेली पाहून निशुंभाने एक दिव्य शक्ती सोडली. देवी चामुण्डा कोणत्याही आघाताला सावध असल्याने राक्षसाची शक्ती तिच्यापर्यंत पोहोचण्याआधीच देवीने हातातील चक्राने शक्तीचे तुकडे केले. ॥१३॥
हातातील शस्त्रे देवीने याप्रमाणे मोडल्यामुळे निशुंभाने रागाने त्रिशूळ हाती घेतला; पण देवीने सावधानतेने राक्षसाचा तो शूळ हाताच्या बुक्क्यांनी तोडून मोडून टाकला. आघात होण्यापूर्वीच देवीने केवळ मुठीच्या माराने तो त्रिशूळ तोडला. ॥१४॥
तदनंतर हाती गदा घेऊन निशुंभ राक्षसाने देवीच्या अंगावर टोले मारायला सुरुवात केली. पण तोही राक्षसाचा प्रयत्न असफल होऊन देवीने त्रिशूळमाराने त्या गदेचे चूर्ण केले. ॥१५॥
त्यानंतर दैत्य निशुंभाने आपल्या हाती फरशी घेऊन चाल केली. देवीनेही सावधपणे तो आघात आपल्या बाणांनी चुकवून निशुंभाला घायाळ केले व तो दीन अवस्थेत धरतीवर पडून तडफडू लागला. ॥१६॥
निशुंभ जखमी अवस्थेत भूमीवर असहाय पडलेला पाहून त्याचा भाऊ शुंभ पराकोटीने संतापला आणि देवीला मारण्यासाठी धावून आला. ॥१७॥
रथावर बसून आलेला शुंभ आपल्या आठ हातांतील शस्त्रांची धार, शक्ती तेज सरसावीत जणू आकाशाला मागे ढकलीत रणातील अद्भुतता पाहण्यासाठीच आला असे वाटॆ. ॥१८॥
शुंभाला आलेला पाहून देवीने आपल्या हातातील शंखातून जोराने शंखनाद केला आणि धनुष्याची प्रत्यंचा वारंवार छेडून एक अतिभीषण नाद करून युद्धभूमीवर झुंजीचे वातावरण तयार केले. ॥१९॥
देवीने केलेल्या घंटानादाचा आवाज इतका प्रचंड होता की, सर्वच्या सर्व दैत्यसैन्यात व सैनिकांच्या उरांत धडकी भरली. त्यांचा तेजोभंग झाला. ॥२०॥
देवीच्या सिंहानेही आपल्या पसरलेल्या अणकुचीदार व विक्राळ दाढांनी दैत्य-सैन्याचा समाचार घेऊन त्यांचा माज उतरविला. सिंहाच्या गर्जनांचा व करकरा दात खाण्याचा आवाज दाही दिशांचा थरकाप उडवीत होता. ॥२१॥
त्यानंतर कालीने जागृत होऊन आकाशात एक उंच उडी मारली व धरतीवर एक थाप मारली (दोन्ही हातांनी भुई थोपटली) ज्याचे पडसाद तर उमटलेच पण धरतीवर पूर्वी कधीही असे आवाज झालेले नव्हते. ॥२२॥
देवी शिवदूतीही प्रकट झाली. तिने राक्षसांपुढे अमंगल व बीभत्स शब्दांनी असुरांची अवहेलना केली. त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे असुर-सैन्य-कक्षात संतापाच्या लाटा उसळल्या. ॥२३॥
देवी अत्यंत त्वेषाने शुंभाकडे पाहून म्हणाली, "हे दुराचारी दुरात्म्या दैत्या, थांब रे थांब, उभा रहा. (तुझी घटका भरली आहे). त्या वेळी आकाशात हा संघर्ष पहाणार्या देवांनी देवीचा वारंवार जयजयकार केला. ॥२४॥
शुंभाने तेथे येताच ज्वालायुक्त भीषण शक्ती देवीवर सोडली. अग्निपर्वताप्रमाणे प्रचंड येणार्या त्या अग्निशक्तिलोळाला अति परिश्रमपूर्वक आपल्या जवळ येत असताना ढकलून दिले. ॥२५॥
शूंभही सिंहावर बसूनच लढाईत भाग घेत होता. त्याच्या (सिंहाच्या) गर्जनांनी पुन्हा तिन्ही लोक हादरून गेले. घाबरले. त्या नादांनी वज्रपात झालासे वाटले. मागील सर्व रणातील आवाजापेक्षा हा आवाज भयानक होता. त्याच्यापुढे सर्वच अवाक् झाले. ॥२६॥
शुंभाने सोडलेल्या बाणांनी व देवीने सोडलेल्या बाणांनी या युद्धात इतिहास घडविला. उभय पक्षांनी एकमेकांचे बाण मोडून परतवून टाकले, व त्यांपैकी बहुतेक बाणांचे तुकडे केले. ॥२७॥
आवेशात आलेल्या चंडिकेने त्यानंतर अत्यंत आवेशाने व ईर्षेने शुंभावर आपल्या हातातील त्रिशूळाने एक भयानक वार केला, ज्यामुळे तो घायाळ होऊन खाली जमिनीवर पडला व मूर्च्छित झाला. ॥२८॥
येवढ्यातच निशुंभाला शुद्धी आली. सावधपणाने आपली आयुधे व शक्ती एकत्र करून आणि आपल्या हातातील धनुष्यबाणांनी देवी कालीला आणि देवीच्या सिंहाला घायाळ केले. ॥२९॥
निशुंभाने आपले हजार हात मदतीला घेऊन बाण व चक्रांच्या प्रहरांनी चंडिकेला झाकून टाकले. तो बाणांचा पडदा इतका झिरझिरीत होता की, राक्षसांनी टाकलेल्या बाणांनी देवी झाकली गेली. ॥३०॥
भक्तांची, अतिशय अवघड व दुर्गम संकटप्रसंगी मातृस्वरूपी माता दुर्गाच धावून येते आणि दुर्गतीच्या विळख्यातून सोडवते. तिने शुंभाच्या सैन्याकडून येणारी चक्रे, धनुष्य व इतर आयुधे व त्यांचे टोले प्रभावीपणे उखडून टाकले. नष्ट केले. ॥३१॥
मूर्छेतून सावध झालेला निशुंभ हाती गदा घेऊन देवी चंडिकेवर धावून आला. त्या वेळी त्याचे अगणित सैनिक त्याचा पाठपुरावा करीत होते. ॥ ३२॥
त्याने घाव (टोला) घालण्यासाठी उचललेली गदा चंडिकेने आपल्या हातातील थंड तलवारीने तोडून टाकली आणि आपल्या हाती त्रिशूळ घेतला. ॥३३॥
हाती त्रिशूळ येताच निशुंभाला ठार मारण्याच्या उद्देशाने चंडिकेने निशुंभाच्या छातीत त्रिशूळ प्रचंड आघाताने खुपसला व त्याची छाती फोडली. ॥३४॥
अशा प्रकारे शूलाच्या जबरदस्त माराने राक्षसाच्या छातीतून एक महाबळी महाप्रतापी पुरुष उत्पन्न झाल व त्याने 'थांब' असे म्हणत म्हणत देवीला मागे रेटले, पण देवीवर विशेष कृपा असल्यानेच देवीला नष्ट करू शकला नाही. ॥३५॥
दुसर्या दैत्याचे हे बोलणे ऎकून देवीची करमणूक झाली व ती हसू लागली. हसता हसतानाच देवीने आपल्या हातातील तलवारीने निशुंभाचे मस्तक क्षणात उडविले. ॥३६॥
देवीच्या सिंहानेही रणात शिरून दैत्यसैन्य खाण्यास सुरुवात केली. देवीच्या शिवदूतींनीही इतर दैत्यगण जिवंत असलेले वा मेलेले खाण्यास सुरुवात केली. देवीच्या शिवदूतीनीही इतर दैत्यगण जिवंत असलेले वा मेलेले खाण्याचा सपाटा चालविला. हे दृश्य फार भयानक होते. ॥३७॥
कौमारीदेवीने कित्येक दैत्यांची वाट लावली व कित्येकांना मारून या जगातून नष्ट केले. ब्रह्माणी देवीच्या शिंपडलेल्या मंत्रोच्चारित जलाने कित्येक रणातून उठले व भीतीने पळू लागले. ॥३८॥
माहेश्वरीदेवीच्या त्रिशूळ-मारांनी आणखीही कित्येक दैत्य मेले तर वाराहीदेवीच्या जबड्याच्या प्रहारांनी कित्येकांच्या हाडांचा चुरा झाला. ॥३९॥
वैष्णवीने आपल्या हातीच्या चक्र-मारांनी कित्येक असुरांचे तुकडे केले तर ऎंद्रीच्या वज्र-प्रहारांनी शेवटी यमलोकाला प्रयाण केले. ॥४०॥
कित्येक असुर युद्धात मारले जाऊन नाहीसे झाले. कित्येक युद्धातून पळून गेले तर काही इतर काली व शिवदूती यांनी खाऊन टाकल्याने नष्ट झाले." ॥४१॥
असा हा श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतर काळी घडलेल्या देवीमाहात्म्य कथेतील निशुंभवध कथेचा नववा अध्याय आहे.
- श्री महादेवी विजयते -