-
स्त्री. १ तपकीर . २ नाकाने ओढण्याचे , नाकांत घालण्याचे औषध . - एभा १० . १६ . [ सं . नस्य ; हिं . ]
-
पु. १ नाश पहा . २ नाश करणारे एक पिशाच्च . [ सं . नाश ] नासकवणी - न . दूषित , नासके बिघडलेले पाणी किंवा रस . [ नासके + पाणी ] नासका - वि . १ नासलेला ; नाशित पहा . २ सहज , कवकर नासणारा , बिघडणारा , नष्ट होणारा ; न टिकणारा . नासके केणे - न . १ लवकर खराब होणारा , नासणारा . ( फळे , भाजीपाला वगैरे विक्रीचा ) जिन्नस . २ नासलेला अथवा बिघडलेला जिन्नस . ३ ( ल . ) वाईट किंवा दुबळी वस्तु , प्राणी वगैरे . ( उदा० लग्नासाठी दाखविलेली ओगट मुलगी ; विकावयास आणलेला दुबळा तट्टू इ० ) [ नासके + केणे = पदार्थ ] नासडा - पु . पूर्ण नाश - तोटा . नासाड पहा . नासणे - उक्रि . १ नाशणे पहा . २ वायां जाणे . तरी सांगावे सुहृदी कथिला जो मंत्र तो न नासेल । - मोविकृ ८८ . ६१ . ३ गुण किंवा सत्त्व नाहीसे होणे . म्ह ० नासली मिरी जोंधळ्याला हार जात नाहीत किंवा जोंधळ्याला विकत नाहीत . ४ - अक्रि . ( ल . ) मरणे . लग्न केले परी भ्रतार नासला । हितावह झाला तोहि मज । - ब ९५ . इतर अर्थी नाशणे पहा . [ सं . नाशन ]
-
०तूस धूस धोस धूळ - स्त्रीपु . १ अत्यंत नासाडी ; सत्यानाश ; धूळधाण ; दुर्दशा . २ व्यापारांत बूड , तोटा . ( क्रि० येणे ). [ नाश द्वि + धूळ ] नासरा - वि . नाशक , नाशा पहा .
-
०वणी न. १ पिकाची नासाडी करणारा पाऊस . २ नासकवणी पहा .
Site Search
Input language: