-
न. १ रंगीत तसबीर ; रेघांनीं , रंगांनीं दगड , कागद , धातूंचीं भांडीं इ०कांवर काढलेली , किंवा माती इ० द्रव्यांनीं बनविलेली मनुष्य , जनावर , कांहीं पदार्थ , देश इ० कांची आकृति . २ पत्त्यांच्या डावांतील , गंजिफांतील चित्रांपैकीं राजा , राणी , गुलाम , यांपैकीं ) एक . ३ चित्रविचित्र रंग . ४ मृगजल . ५ आश्चर्य ; नवल . द्रोणवधें रिपु मानिति जय मानूं द्या ; न चित्र हें तोही । - मोकर्ण २ . ५ . ६ विचित्रपणा ; विचित्रपणाचे चाळे . मातें पाहुनि चित्र काय करितां कां पां ! तुम्हीही असे । - आसु ४३ . - वि . १ आश्चर्यकारक ; चमत्कारिक . २ निरनिराळया रंगाचा ; बहुविध ; नानाप्रकारचा . दिसों लागलीं चित्र चिन्हें सुखाचीं । सामाशब्द -
-
०क पु. १ चित्ता ; बिबळया वाघ . २ एक औषधी वनस्पति . ३ चित्रकार ; चितारी . गर्विष्ठ चित्रक शस्त्रधारी - गुच ३६ . ६७ . ४ एक प्रकारचें रत्न ; बेरंग ; तोर . [ सं . चित्रक ]
-
चित्राचें बाहुलें
-
०कथी कथ्या - पु . पुराणांतील राजांचीं , देवांचीं , वीरांचीं चित्रें दाखवून त्यांचें विवरण करून , त्यांच्या दंतकथा सांगून , त्यांवर उपजीविका करणारा मनुष्य . चितरकथी पहा . [ चित्र + कथणें ]
Site Search
Input language: