एकनाथी भागवत - श्लोक २० वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


देवासुरे युधि च दैत्यपतीन् सुरार्थे, हत्वाऽन्तरेषु भुवनान्यदधात्कलाभिः ।

भूत्वाऽथ वामन इमामहरद्बलेः क्ष्मां, याञ्चाछलेन समदाददितेः सुतेभ्यः ॥२०॥

समुद्रमंथनाच्या शेवटीं । क्षीरसागराचे तटीं ।

सुरां असुरां कळी मोठी । अमृतासाठीं मांडली ॥३२॥

तेव्हां अमृत विटे जें देखोनी । तो अवतारु घेतला मोहिनी ।

तेणें असुरां सुरापानी । अमृतदानी देवांसी ॥३३॥

तेथ चोरुनि घेतां अमृतग्रासा । निवटिला राहूचा घसा ।

त्याच्या कबंधावरी म्हाळसा । वास नेवासा स्वयें केला ॥३४॥

सुरसाह्य नारायणु । द्वारके कुश निर्दाळूनु ।

का लवणासुर मर्दूनु । अवतरे आपणु 'कुमार' रूपें ॥३५॥

ऐसा मन्वंतरामन्वंतरीं । निजभक्तकाजकैवारी ।

सुरकार्यार्थ श्रीहरि । नाना अवतारीं अवतरे स्वयें ॥३६॥

तो सुरसाह्य जगजीवन । स्वयें कुब्ज झाला 'वामन' ।

अंगें याचक होऊन । देवांचा अपमान उतरला जेणें ॥३७॥

दानें दाटुगा बळी । त्यासी देवांचेनि नव्हे कळी ।

मग त्रिविक्रमरूपें आकळी । याञ्चाछळें बळी छळिला जेणें ॥३८॥

तरी भावबळें बळी प्रबळु । तेणें देवो केला द्वारपाळु ।

विष्णु सत्त्व पाहे छळछळूं । शेखीं दासांचा दयाळु दास्य करी स्वयें ॥३९॥

यापरी बळीचा छळ । करूनि घेतलें दिङमंडळ ।

तेणें अमरगण सकळ । अर्पूनि तत्काळ सुखी केले ॥२४०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP