एकनाथी भागवत - श्लोक ३ रा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


भूतैर्यदा पञ्चभिरात्मसृष्टैः पुरं विराजं विरचय्य तस्मिन् ।

स्वांशेन विष्टः पुरुषाभिधानमवाप नारायण आदिदेवः ॥३॥

अवतारांमाजीं प्रथमतां । 'पुरुषावतारांची' कथा ।

द्रुमिल झाला सांगता । ऐक तत्त्वतां महाराजा ॥४४॥

नारायणें आत्मशक्तीं । पंचमहाभूतें भूताकृती ।

सृजूनियां यथानिगुतीं । ब्रह्मांडाची स्थिति निर्माण केली ॥४५॥

'विराजपुर' ब्रह्मांडा नाम । तेथ लीला प्रवेशे देवोत्तम ।

यालागीं 'पुरुष' हें नाम । पुरुषोत्तम स्वांशें पावे ॥४६॥

त्याचेनि अंशयोगें प्रकृति । झाली प्रजांतें प्रसवती ।

यालागीं 'पुरुष' नामस्थिति । जाण निश्चितीं पावला ॥४७॥

तो अकर्तात्मयोगयुक्तीं । जग चेतवी चिच्छक्तीं ।

ज्याचेनि जगा जगत्वें स्फूर्ति । त्याची गुणकीर्ति दों श्लोकीं सांगों ॥४८॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP