एकनाथी भागवत - श्लोक ४ था

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


यत्काय एष भुवनत्रयसन्निवेशो यस्येन्द्रियैस्तनुभृतामुभयेन्द्रियाणि ।

ज्ञानं स्वतः श्वसनतो बलमोजईहा सत्त्वादिभिः स्थितिलयोद्भव आदिकर्ता ॥४॥

त्रैलोक्य वसे जें कांहीं । तेंचि शरीर त्याचें पाहीं ।

ज्याचेनि योगें देही । ठायींच्या ठायीं वर्तती ॥४९॥

ब्रह्मादिक जे तनुधारी । त्यांच्या ज्ञानकर्मेंद्रियांची थोरी ।

ज्याचेनि इंद्रियेंकरीं । निजव्यापारीं वर्तती ॥५०॥

जो जगाचे नयनांचा नयन । जो जगाच्या घ्राणांचें घ्राण ।

जो जगाच्या श्रवणांचें श्रवण । रसनेची जाण रसना जो कां ॥५१॥

जो जगाच्या हातांचे हात । ज्याचे पाय जगाच्या पायांत ।

जो वाचेची वाचा निश्चित । एवं उभय इंद्रियांआंत इंद्रियें ज्याचीं ॥५२॥

जीवाच्या ठायीं जें कां ज्ञान । तेंही त्याचेनि ज्ञानें जाण ।

त्यासी ज्ञानदाता नाहीं आन । स्वयें ज्ञानघन स्वभावतांचि ॥५३॥

ज्याचेनि प्राणें जाण । जगाचा चळे प्राण ।

बळ तेज क्रियाचरण । जगासी संपूर्ण ज्याचेनि ॥५४॥

रजतमसत्त्वादिगुणयुक्त । उत्पत्तिस्थितिप्रळयान्त ।

मूळीं आदिकर्ता भगवंत । जाण तो निश्चित 'पुरुषावतार' ॥५५॥

सत्त्वादि त्रिगुणावस्था । उत्पत्तिस्थितिलयकर्ता ।

तेही गुणावतारकथा । ऐक नृपनाथा सांगेन ॥५६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP