मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
जिवलग हृदया ! मूढ वृत्ति...

राम गणेश गडकरी - जिवलग हृदया ! मूढ वृत्ति...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


जिवलग हृदया ! मूढ वृत्ति ही धारण केली कां असली ?

लाथ मार त्या चंचल जगता---प्रेमाचीं सोंगें कसलीं !

चंचल, लहरी, रंग बेगडी सुंदरतेच्या मोहानें,

कां वाटेवर पडसी हृदया विकुंनी कवडीमोलानें ?

तुझ्या जिवाच्या बोलासाठीं हपापले हे रसिक पहा ।

स्वागत करिं जा त्यांचें---त्यांना हर्ष किती होईल अहा !

नटव्या सोंगामागें लागे जें, त्या सौंदर्यासाठीं

नवलाखाचें मोल देसि कां ? कशास या आटाआटी ?

जिथें गुणांची चाड न कांहीं---कमअस्सल जें जातीचें;

सौंदर्यचि तेम कसलें ?----केवळ एक बाहुलें मातीचें !

विद्यावैभव कुठें तुझें !---तो ज्ञानाचा गौरव कोठें !

आणि कुठें रंगीत खेळणें----नवल खरोखरि हें मोठें !

उदारता तव विशाल पाहुनि देवांनाही मोह सुटे;

आणिक असलें खोटेंनाटें नकली नाणें सांग कुठें !

गर्वाचें घर खालीं पडुनी खुशाल मिळू दे मातींत;

रसिकांच्या मृदुहृदयमंदिरीं रहा, निजयशा मिरवीत !

चिताडसी कां चित्र जिवाचें पाण्यावरच्या रेघांनीं ?

’गोविंदाग्रज’ सांगे तुजला ’रहा त्याहुनी स्वस्थानीं’ !

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP