राम गणेश गडकरी - भेट जहाली पहिल्या दिवशीं ...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


अंजनीगीत
भेट जहाली पहिल्या दिवशीं
परचित नव्हतो कुणी कुणांशीं,
लाजुनि तेव्हां परस्पगंशीं,

दूर-दूर-बसलों. ॥१॥

दिवस यापरी जातां चार,
लज्जा उरली नाहीं फार,
त्नास न होतां मग अनिवार---

जवळ जरा---आलों. ॥२॥

यापरि गेले महिने कांहीं,
परिचयास मग पार न राही,
लज्जा नुरतां तिळभर पाहीं---

सांग कसे बसलें ? ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-11-14T20:26:11.1200000