मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ८ वा| अध्याय ४ था स्कंध ८ वा अष्टम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा स्कंध ८ वा - अध्याय ४ था सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ८ वा - अध्याय ४ था Translation - भाषांतर १७गजेंद्रासी मुक्त केलें हें पाहूनि । वर्षिली देवांनीं सुमनें बहु ॥१॥दुंदुभीचा नाद गंधर्वांचें गान । करिती स्तवन चारणादि ॥२॥विदारित नक्रमुखांतूनि एक । जाहला प्रगट पुरुष दिव्य ॥३॥वंदूनि ईश्वरा गेला तो स्वर्गांत । सर्वांच्या समक्ष हूहूरुपें ॥४॥देवलासी जळीं ओढितां नक्रत्व । शापें, त्या उ:शाप तैसा होता ॥५॥वासुदेव म्हणे स्वरुपतालाभ । होई गंधर्वास प्रभुदर्शनें ॥६॥१८राया गजेंद्र, तो पुरा । द्रविड देशांतील राजा ॥१॥नांव त्यांचें इंद्रद्युम्न । गांठी तपार्थ कानन ॥२॥मलयाचलीं तो एकदां । मौन घेऊनि बैसतां ॥३॥मुनि अगस्ति पातले । तयां नाहीं सन्मानिलें ॥४॥क्रोधाकुल तैं अगस्ति । नृपाळासी शाप देती ॥५॥म्हणती होईं अज्ञ गज । राव स्वीकारी तें वच ॥६॥भक्तिसामर्थ्ये गजासी । होती पूर्वजन्मस्मृति ॥७॥वासुदेव म्हणे मुक्त । पुढती झाले गज नक्र ॥८॥१९शुकमहामुनि बोलले रायासी । मुक्त गजेंद्रासी करुनि हरी ॥१॥म्हणे हे गजेंद्रा प्रभातीं, जो नित्य । जपेल हें स्तोत्र भक्तिभावें ॥२॥अंतसमयीं त्या लाभे शुद्ध बुद्धि । पावेल सद्गति जयायोगें ॥३॥ब्राह्यमुहूर्ती जे होऊनि एकाग्र । चिंतितील तुज, मजही भावें ॥४॥सरोवर, गिरी, वन, वृक्ष, लता । तेंवी या पर्वता गुहांसवें ॥५॥ब्रह्मा, विष्णु, शिवमंदिर, कौस्तुभ । क्षीराब्धि, श्रीवत्स, वैजयंती ॥६॥सुदर्शन, पांचजन्य तैं गरुड । लक्ष्मी तेंवी शेष नारदादि ॥७॥मत्स्य-कूर्मादिक अवतार माझे । सूर्यचंद्रही जे चिंतितील ॥८॥अग्नि, ओंकार तैं माया, गोब्राह्मण । धर्मसनातन, दक्षकन्या ॥९॥गंगा-यमुनादि नद्या, ऐरावत । ध्रुव, पुण्यश्लोक सप्त ऋषि ॥१०॥स्मरतील त्यांचीं दग्ध होती पापें । मोद हरिवचें वासुदेवा ॥११॥२०बोलूनि हें नारायण । हर्षे फुंकी पांचजन्य ॥१॥लीला करुनि यापरी । बैसे देव गरुडावरी ॥२॥संगें घेऊनि पार्षद । गांठी आनंदें वैकुंठ ॥३॥शुक निवेदिती राया । कल्याणाची इच्छा जया ॥४॥सूर्योदयापूर्वी तेणें । चरित्र हें गावें प्रेमें ॥५॥नित्य सुस्नात होऊन । गातां सकळ काम पूर्ण ॥६॥वासुदेव म्हणे मुक्ति । सहज लाभे सद्भक्तासी ॥७॥ N/A References : N/A Last Updated : November 19, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP