प्रसंग सहावा - परउपकार

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


महीवरी अनेक पवित्र पिकलें मज द्या ऐसे तिनें नाहीं म्‍हणितलें । तैसेंच पाहिजे सद्‌गुरूचें जालें । स्‍वयें ज्ञानें परउपकारी ॥३९॥
परउपकारालागीं आंबा पिकला । तो जरी आणिकांनीं बाजारीं नेऊनि विकला । द्रव्यास आंबा आशाबद्ध नाहीं जाला । मज द्या म्‍हणउनी ॥४०॥
शूद्री झाडती झाडफेड करी । आपण जाऊन बसवी सांदोरी । शुची म्‍हणोनि आनंदती नरनारी । शूद्र झाडणी निवांत ॥४१॥
वेळू मऊपणें महा दीर्घ थोर । परउपकारी चिरविलें शरीर । राजकुमाराचे शिरीं जाला छत्र । ऐसे गुण सद्‌गुरूचे ॥४२॥
पुढल्‍याचें अवगुण शिरी मानणें । आपले सुगुण पुढतियातें देणें । सांगतों सुपाचाळणीची लक्षणें सत्‍य सद्‌गुरूचे ठायीं ॥४३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP