मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
तळमळ तळमळ कलिमळ वारी । चि...

श्री गुरूचे पद - तळमळ तळमळ कलिमळ वारी । चि...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


तळमळ तळमळ कलिमळ वारी । चिंता शोक निवारी ।
नानाकारी चित्त विकारी । जड मूढ प्राणी तारी ॥१॥
म्हणउनी राम राम जपा हो । भले साधु राम राम जपा हो ।
श्रीराम जय राम जय जय राम । राम जपा हो ॥धृ.१॥
गज गणिका आणिका कोटी । मोचन सुरवर कोटी ।
हीन दीन प्राणी नामस्मरणें । तरले उठाउठी ॥२॥
आसनीं शयनीं गमनागमनीं । जनवनभूवन जीवनी३ ।
कल्याणमानस राममय जालें । विकल्प सांडि म्हणउनी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP