मूळस्तंभ - अध्याय ११

‘ मूळस्तंभ ’ पोथी म्हणजे शिव- पार्वती संवादरूपातील शिवपुराणावरील शोधनिबंध आहे.


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥

श्रीगुरुभ्यो नम : 

ऐसे ऐकोनि देवीचें बोलणें ॥ मग देव काय म्हणे ॥ शिवतत्व ऐक एकमनें ॥ भवानी हो ॥१॥

शिवतत्व भक्तिक्रिया ॥ त्रिविध प्रतिष्ठा चर्या ॥ तो शिव आदिकार्या ॥ प्रेमयोगी ॥२॥

जीवतत्वा समागमू ॥ एक षट्विकारी संगमू ॥ तो शिवयोगी स्वधर्मू ॥ जंगमलिंग ॥३॥

दोघांचा एकतत्वीं समागम चांग ॥ तो अनुपम नेंणें कर्मयोग ॥ तो शिवतत्वसंयोग ॥ तोचि शिवयोगी ॥४॥

जो मायाप्रपंचा विरहीत ॥ देह भावास मुक्त ॥ सर्वविकारविवर्जित ॥ तोचि शिवयोगी ॥५॥

शिवभक्त म्हणिजे सर्व भावें भजन ॥ क्रिया म्हणिजे सदाचारपण ॥ परी शिवीं सर्व निरसन ॥ या नांव शिवज्ञान ॥६॥

शिव ऐसे प्रेम बोलणें ॥ संकल्प विकल्प दटावणें ॥ शिवप्रेम मनें पवनें ॥ तें शिवतत्व ॥७॥

नित्य मनीं तप विचारणें ॥ अविनाशपद चिंतणें ॥ सोंह सदाशिव जाणणें ॥ तेचिं शिवतत्व ॥८॥

नास्ति सर्व पदार्थ फळ ॥ निरसी कर्म मनी निर्मळ ॥ निर्लेपी निष्कलंक निर्मळ ॥ तें शिवतत्व ॥९॥

नास्ति उत्पत्ति स्थिति प्रलय ॥ निराश निरामय नि :संशय ॥ निश्वळ निंवात आत्मारामीं लय ॥ तें शिवतत्व ॥१०॥

सर्व विकार विवर्जित ॥ कामना काम उपशांत ॥ भावें अति चर्चित ॥ तो शिवयोगी ॥११॥

कर्मेद्रियें संकोचली ॥ ज्ञानेंद्रियें सरलीं ॥ प्रपंचेसी आटली ॥ तो शिवयोगी ॥१२॥

शिवतत्वसागरीं ॥ बुडाली वेदवैखरी ॥ काहीं न निघे बाहेरी ॥ सांगावया ॥१३॥

निवडला तो ननुसंगी ॥ मग तूं येसी आलिंगी ॥ नुरे सर्वासि तो योगी ॥ शिवज्ञानियां ॥१४॥

जो सुखदु :खाविरहीत ॥ गुणागुणविवर्जित ॥ स्वरुपारुपातीत ॥ छाया माया परता ॥१५॥

विश्व कृपा शांति क्षमा ॥ अखंडित परब्रह्या ॥ आणिक नाहीं उपमा ॥ शिवतत्वासी ॥१६॥

निस्पृह निसंग निरापेक्षी ॥ प्रणम्यप्रसाद प्राणार्पी सुखी ॥ प्राणालिंगी संतोषी ॥ तो जाण शिवज्ञानी ॥१७॥

शांति दया क्षमा ॥ भक्ति विरक्ति प्रेमा ॥ अखंडित परब्रह्या ॥ मिळणी असे ॥१८॥

आत्मज्ञानी स्वधर्मा ॥ नातळे अबद्वकर्मा ॥ तोव शिवयोगी उत्तमा ॥ जाण देवी ॥१९॥

इंद्रियविकारां विसरली ॥ अहंममता हरपली ॥ मनबुद्वी शिवी बैसली ॥ परतेचिना ॥२०॥

चित्त हर्षेविषादिं नुचंबळे ॥ सुखदु :खासी नातळे ॥ स्तुतिमुखें सुकाळें ॥ तोचि शिवयोगी ॥२१॥

तनुगुण विकार सदा ॥ नातळें प्रकृति भिन्नभेदां ॥ नातुडे मायामोहंदा ॥ तो शिवज्ञानी ॥२२॥

जेणें विषयसुख त्यजिंले ॥ इन्द्रियें दंडिळीं ज्ञानबळें ॥ विध्वंसिलें मायाजाळें ॥ तो शिवयोगी ॥२३॥

विधिकर्मास त्रासिलें ॥ आणि काळासी ग्रासिले ॥ भावाचे पार टाकिलें ॥ शिवतत्व ॥२४॥

जेणें मन्मथ मारिला ॥ विषय रसु जाहरिला ॥ मायाप्रपंच सांडिला ॥ तो शिवयोगी ॥२५॥

अखंडित वैराग्यदशा ॥ स्वानुभव भरंवसा ॥ घातला शिवज्ञान ठसा ॥ तो शिवज्ञानी ॥२६॥

जेणें मन न्यासिलें ॥ जन्ममरणा पुसिलें ॥ लक्ष शिवीं सामावलें ॥ तो शिवयोगी ॥२७॥

व्हावया एक पिंडपदासि ॥ नाहीं प्रवेश जन्मभूमीसी ॥ जो नातळे कुळकर्मासी ॥ तो शिवज्ञानी ॥२८॥

ज्याने मायाप्रपंच सारिला ॥ शिवतत्वीं अभ्यास केला ॥ आणि शिवतत्वीं बुडाला ॥ तोचि शिवयोगी ॥२९॥

तंव शिवासी पार्वती पुसे ॥ देवा शिवतत्वीं सुख कैसें ॥ तें घडेंल कोण्या प्रयासें ॥ सांगा मज ॥३०॥

भक्तिप्राप्ती होय कैसेन ॥ कैसें क्रियाकर्म निरसन ॥ कैसें प्राणलिंग ध्यान ॥ अभ्यंतरींचें ॥३१॥

देवा हा भाव कथी ॥ जेणें फिटेल माझी भ्रांति ॥ आणि बोधाची होय प्राप्ति ॥ प्राणलिंगी ॥३२॥

जो शिवतत्वाचा मार्ग ॥ जेणें प्राप्त शिवलिंग योग ॥ जेणें फिटे भ्रमणांग ॥ तो सांगा देवा ॥३३॥

शिवतत्वाचा अभिप्राव ॥ अनुभवाचा मूळ ठाव ॥ उमा म्हणे तो भाव ॥ सांगा मज ॥३४॥

मग शंभु म्हणे दुर्गेसी ॥ शिवतत्वाची रीती ऐसी ॥ तें आचरण परियेंसी ॥ आदिशक्ति वो ॥३५॥

आचारसत्व धरिनि आचरिजे ॥ तो सत्वसदाचार म्हणिजे ॥ सत्वें मी समर्पिजे ॥ सत्यभाव ॥३६॥

अनुसरतां श्रीगुरु ॥ त्यासी फळ होय हा निर्धारु ॥ त्यांसी सिद्व होवोनी ईश्वरु ॥ स्वयेंच बोधी ॥३७॥

जो विषयसुखास विवर्जित ॥ शिवतत्वीं एकांत ॥ आणि द्दढता जो सर्वगत ॥ जितेंद्रिय ॥३८॥

वाचा सत्य इंद्रियें जीती ॥ जयाची नाहीं मळीणमती ॥ त्यासी शिवयोगप्राप्ती ॥ सायुज्येंसी ॥३९॥

कर्माकर्मे नासिली ॥ कर्माकर्मे त्रासिलीं ॥ निष्कर्मे प्रकाशलीं ॥ सर्वबोधी ॥४०॥

तेणें कर्मे क्रिया निरसे ॥ मग द्दष्टी अभ्यंतरी प्रकाशेम ॥ तेथेम षट्चक्रस्थळ असे ॥ गुरुगम्य जें ॥४१॥

हें अभ्यंतरी जाणावें ॥ अनुभवासी आणावें ॥ महाभावेंनि जाणावें ॥ स्वबोधें पैं ॥४२॥

महेश्वरप्रसादीं ॥ प्राणलिंग शरण झाली बोधी ॥ षट्चक्रस्थळ भेदी ॥ समरसें ॥४३॥

भजनी भल्त हा निर्धारु ॥ आपण म्हणिजे महेश्वरु ॥ अग्निप्रसादी प्रचारु ॥ तेज :पुंज ॥४४॥

पवन तो प्राणलिंगी ॥ शरण नाम विख्यात जगीं ॥ अपारपद महालिंगी ॥ एक स्थळ जाण ॥४५॥

हें स्थळ मेळवू जाणावें ॥ षट्स्थळ अनुभवासि आणावें ॥ मग तें आदिपद जीणावें ॥ षट्चक्राचें ॥४६॥

ऐसें ऐकोनिया भवानी ॥ पुसे षट्चक्राची उभवणी ॥ षट्चक्रें साधोनि ॥ मग काय करावें ॥४७॥

मग म्हणे महेश ॥ देवी हा ध्यानधारना न्यास ॥ मग शिवतत्वीं सौरद ॥ होय जाण ॥४८॥

प्रथम शिवतत्व उपदेश ॥ मग शिवतत्वीं प्रवेश ॥ होय पंचभूतांसी नाश ॥ एकत्व झालिया ॥४९॥

तरी तें ऐक भवानी ॥ वज्रासनीं बैसोनि ॥ मग पवनीं प्रवेशवूनी ॥ आधारभेदे ॥५०॥

मूळबंध गुदस्थानीं ॥ वोढियाणा नाभीभुवनीं ॥ जालंधर घटिकास्थानीं ॥ देईजे देवी ॥५१॥

प्रथमदळ सहजानंद ॥ द्वीतीयदळ परमानंद ॥ तृतीयदळ वीरानंद ॥ योगानंद चतुर्थदळ ॥५२॥

ऐसें चतुर्थदळींचे नामकथन ॥ आतां सांगतों त्यां चे गुण ॥ रोहा वा आरोहावा हाक पिता जाण ॥ ऐसे चार असती पैं ॥५३॥

ऐसीं दळें नामगुणी विख्यात ॥ एकएक दळासी जप दीडशत ॥ मिळोनि सर्व जपसंख्या सहाशत ॥ असे जाण ॥५४॥

हें एकतत्व हंसासी भ्रमणकरण ॥ चतुर्थदळ देवी जाण ॥ प्रथम आधाचक्र रक्तवर्ण जाण ॥ गणेश देवता ॥५५॥

सिद्वि बुद्वि शक्ति विख्यात ॥ ईश्वर ऋषि कर्म कळा मात्रा चतुर्थ ॥ यांचा जप सहाशत ॥ आधारचक्र गुदस्थान देवी ॥५६॥

बुधवारी या खालीं अपमान ॥ त्यातळवटीं शेष वराह कूर्म जाण ॥ त्याच्या माथां सप्त पाताळें गहन ॥ ऐसें आधारचक्र जाणावें ॥५७॥

हे प्रथमचक्र चतुष्कोण ॥ तें चक्र ताम्रवर्ण चारी बीजें जाण ॥ ब , श :, ष , स हा जप उच्चारण ॥ चौंअक्षरी ॥५८॥

तो आकुंचोनि मूळकंद ॥ देउनि वोढियाणा बंध ॥ मग न्यासें कुंडलिनी ऊर्ध्व ॥ पवन संचरे देवी ॥५९॥

ऐसें हें चक्र भेदावें ॥ मग आधारशक्तितें टाकावें ॥ ऐसे शक्तिस्थळ स्वभावें ॥ साध्य होय ॥६०॥

ईश्वर उवाच ॥ त्याच्या ऊर्ध्व भवानी ॥ चार अंगुळें लिंगस्थानी ॥ स्वाधिष्ठानचक्र जाणीं ॥ गुरुमुखें ॥६१॥

आतां सांगतों स्वाधिष्ठान ॥ येथेम स्थूळदेह वैखरी वाचा जाण ॥ -हस्वमात्रा ऋग्वेद विश्वाभिमान ॥ आचारलिंग पृथ्वीतत्व ॥६२॥

तत्वकळें सहा सुंदर ॥ एकेकादळीं जप एकसहस्त्र ॥ मिळोनि षट्दळीं सहासहस्त्र ॥ सलोकता मुक्ति ॥६३॥

हे स्वाधिष्ठानचक्र पीतवर्ण ॥ ब्रह्यदेवता सावित्री शक्ति जाण ॥ सूर्यऋषि व्यान पवन ॥ पार्वती वो ॥६४॥

आतां षट्दळनांमें ऐक कर्णी ॥ अव्यक्ति , वारुणि , सराहिणी ॥ रोहिणी , अमूर्ती , परिपूर्णा ॥ ऐसी सहा असती पैं ॥६५॥

आतां षट्दळगुण सांगतो पार्वती ॥ प्राणशक्ति , कीर्ति , गर्विती ॥ कुबुद्वी , अविश्वासी , मूर्छिती ॥ ऐसे सहा ॥६६॥

हें लिंग स्वाधिष्ठनी दुजें ॥ पृथ्वीतत्व सहजे ॥ येथें अनुग्रहें विराजे ॥ आपतत्व देवी ॥६७॥

हे षट्‍दळ पीतवर्ण ॥ ब्रह्या देवता कारण ॥ मातृका ब , भ , म , य , र , ल ,जेथें जाण ॥ उच्चार अक्षरें ॥६८॥

ऐसे हें स्वाधिष्ठानचक्र भेदावें ॥ तेथें ब्रह्या पंचमुख जाणावें ॥ मग हें महेश्वर स्थळ स्वभावे ॥ साध्य होय ॥६९॥

ऐसे हें षट्दळचक्र पहा ॥ त्याच्या ऊर्ध्वभागी अंगुळें सहा ॥ मणिपूर चक्र त्यासी दळें दहा ॥ असती पैं ॥७०॥

आतां सांगतो मणिपूरचक्र ॥ दग्धबीजन्याय विचित्र ॥ दशदळ नीळ सुवर्ण सुंदर ॥ पार्वती वो ॥७१॥

आणि लिंगणदेह स्वाप्र्नावस्था ॥ मध्यमा वाचा विष्णु देवता ॥ दिर्घमात्रा मुक्ति समीपता ॥ कमळाशक्ति ॥७२॥

यजुर्वेद राजसाभीमान ॥ आपतत्व प्राणसमान ॥ पवन ऋषि स्थूळ नाभिस्थान ॥ गुरुलिंग जाण पैं ॥७३॥

आतां दशदळनामं सर्वागीं शोषिणी ॥ जया , भद्रा , शांती , कसया , तोषिणी ॥ रोचना , द्विशीर्षी आणि दाक्षिणी ॥ हीं दशनामें जाना ॥७४॥

आतां सांगतों दशदळांचे गुण ॥ तृषा , इच्छा , लज्जा , पिशुन ॥ आशा , अनादी , काष्ठा , ग्रहण ॥ विषदा आणि निद्रा जाण ॥ हे गुण दशसंख्या ॥७५॥

ऐसीं दहा दळें विचित्र ॥ एकेकदळीं षट्शत जप पवित्र ॥ मिळॊनी जप सहा सहस्त्र ॥ पार्वती वो ॥७६॥

हें नाभिस्थानीं असें निरुतें ॥ मणीपूरसचक्र नाम यातें ॥ तें हें दशदळ असे निरुते ॥ त्रिकोण तेजतत्व ॥७७॥

हें दशदळांकित जाण ॥ निर्मळ असे मेघवर्ण ॥ डकारादिकारण ॥ अक्षरें दहा ॥७८॥

ड , ढ , ण , त , थ , द , ध , न , प , फ , हीं अक्षरें दहा जाण ॥ तेथें विष्णुदेव आपण ॥ लक्ष्मी शक्ति वो देवी ॥७९॥

हें दशदळ चक्र भेदावें ॥ विष्णुमंडळ जिणावें ॥ एवं प्रसाद स्वभावें ॥ साध्य होय ॥८०॥

ऐसे दशदळ निपजलें ॥ तंव पार्वतीनें पुसिलें ॥ द्वादशदळ म्हणविले ॥ कैसें देवा ॥८१॥

मग शंकर म्हणे वो पार्ती ॥ द्वादशदळ अनुहतचक्र हातीं ॥ तेंचि सांगतों तुजप्रती ॥ ऐक यथार्थ ॥८२॥

येथेम कारणदेह सुषुप्ती अवस्था ॥ सामदेव तेजतत्व रुद्र देवता ॥ ज्योतिकळा आणि मात्रा प्लुता ॥ प्रज्ञाभिमानी ॥८३॥

शिवलिंग उमा शक्ति ॥ अनुहतचक्र लालर्ण म्हणती ॥ इंद्रऋषि स्वरुपता मुक्ति ॥ इंद्राग्नि प्राणव्यान शिवलिंग ॥८४॥

आतां द्वादशदळांचीं पार्वती ॥ नामें सांगतों तुजप्रती ॥ ती ऐक तूं एकाग्रचित्ती ॥ यथार्थ ॥८५॥

संभार , रतिप्रिया , विलया , पद्मिणी ,  त्रिमाया , शोभना , सारोहिणी,  सुवासी , वधोकी , सांरगिणी सर्व रेखा आणि तारा ॥८६॥

ऐशीं द्वादशदळें विचित्र ॥ एकैकदळी जप पंचशत पवित्र ॥ द्वादशदळीं मिळोनी षट्सहस्त्र ॥ जपसंख्या जाण ॥८७॥

हें ह्रदयीं असें जाणावें ॥ यासी अनुहतचक्र म्हणावें ॥ द्वादशदळ स्वभावें ॥ जाण शक्ति ॥८८॥

तेथें अक्षरें असती बारा ॥ तीं देवी अवधारा ॥ तुजसहीत ईश्वरा ॥ असणें येथें ॥८९॥

क , ख , ग , घ ,च ,छ ,ज ,झ ,त्र ,ट ,ठ , या द्वादश अक्षरेंसीं असे मी नीट ॥ अनुहतासी अव्यक्तरुपें चोखट ॥ जाण देवी ॥९०॥

ऐसे झालें अनुहतचक्र ॥ आतां सांगतों विशुद्वचक्र ॥ तैं षोडशदळ पवित्र ॥ असें जाण ॥९१॥

विशुद्व चक्र श्वेतवर्ण पार्वती ॥ जीव देवता विद्याशक्ति ॥ प्रत्यक्ष चैतन्य सातुज्यम्यक्ति ॥ महाकारण देहा ॥९२॥

आत्मा ब्रह्याग्नि उदास प्राण ॥ तुरेयावस्था परावाचा जाण ॥ अर्धमात्रा वेद अथर्वण ॥ प्रत्यगात्माभिमानी ॥९३॥

जंगलमलिंग वायुरर्व सुंदर ॥ येथें षोडशदळीं परिकर ॥ जपसंख्या एकसहस्त्र ॥ अग्निऋषि जाण ॥९४॥

आतां दळनामें सांगतों तुज लागुनी ॥ भद्रता , प्राणधारी , प्रतिघातिनी ॥ संकटारी , लोहिता , ब्राह्यणी ॥ सभागी , सप्तम जाण ॥९५॥

नि:संगी , मदलसा , उन्मनी, नम्रता , नम्रवर्णता , भानमती ॥ प्रभा , नि :शंका , आणि नास्ती ॥ ही षोडशदळसंख्या जाण ॥९६॥

ऐसे हें कंठस्थान सहजे ॥ नाम विशुद्वचक्र म्हणिजे ॥ अकाशतत्व जाणिजे ॥ वर्तुळाकार ॥९७॥

हें षोडषदळ कमळ ॥ यामाजीं अक्षरें निर्मळ ॥ अकारादि सकळ ॥ ऐक देवी ॥९८॥

अ ,आ ,इ ,ई ,उ ,ऊ ,ऋ ,ऋ , ल , लृ , ए , ऐ , ओ , औ , अं , अं : ऐसे ते वर्ण श्वेता ॥ तेथें सदाशिव देवता ॥ सद्वरुकृपा तत्वंता ॥ अनुभवेंसी ॥९९॥

हें विशुद्व चक्र जाणावें ॥ भेदुन सदाशिव पदीं बैसावे ॥ ऐसें स्थूळदेह स्वभावें ॥ साध्य होय ॥१००॥

ऐसे द्विशुद्व चक्र संपूर्ण ॥ याच्या उरी षोडशअंगुळें परिमाण ॥ द्विदळचक्र असे जाण ॥ पार्वती वो ॥१॥

ऐसें हें द्विदळ अग्निचक्र ॥ आतां चंद्रकळा सोळा पवित्र ॥ त्यांची नामें सांगतों सुंदर ॥ ऐक देवी ॥२॥

पुरविणी , अल्हादी , शंखिनी ॥ कमोदिनी , अश्वदिनी , मोहिनी , कसुदिनी ॥ चीदा , कामिनी , लक्ष्मी , व्यापिणी , पद्मिणी ॥ मथुनी , विकासी आणि साम्य , उदाकी ॥३॥

ऐशा चंद्रकळा षोडश ॥ आतां सूर्यकळा द्वादश ॥ त्यांची नांवे परियेस ॥ पार्वती वो ॥४॥

क्रीनी , द्वालिनी , दहनी , दीपिनी , ज्योतिणी , तेजिनी , विदुपतेजिनी ॥ शशिप्रभा , शोषिणी , तापिनी ॥ लोहिकी आणि दाहकी ॥५॥

या सूर्याच्या बारा कळा ॥ आणि चंद्राच्या पूर्वोक्त सोळा ॥ ऐशा ह्या अग्निचक्रद्विदळा ॥ नेत्रस्थान म्हणिजे ॥६॥

हें द्विदळ ज्ञानदेह उन्मनी अवस्था शिवदेवता पराभवाचा सूक्ष्मवेद अग्निचक्र माणिकवर्ण हंस ऋषि परमहंसदेवता सुमनामाया

शक्ति इडापिंगला मन पवन चंद्र सूर्य रज , तम नादबिंदू शिवाशक्ति भूस्थान आकाशतत्व लय बंधु यो विराटदेह उत्पत्ति अवस्था

ब्रह्याभीमानी अकारमातृका वैखरी वाचा राजस अहंकार विकारप्राणपंचक पांच ज्ञानेंद्रियें पांच कर्मेंद्रियें क्रियाशक्ति मारणशक्ति

श्वोदळ हें भॄस्थान अग्निचक्र ॥ एकैक दळीं जप पवित्र ॥ पांचशतें मिळोनी सहस्त्र ॥ एक जाण ॥७॥

हें द्विदळ कमळ ॥ मध्य अक्षरें अखिळ ॥ ते हक्षांकिताक्षर निर्मळ ॥ गरहस्य देवी ॥८॥

तें ज्योतिर्ण अग्निचक्र ॥ भ्रुवांतरी हंस ऋषि पवित्र ॥ मायाशक्ति परमहंसदेवता द्विजपत्र ॥ पार्वती वो ॥९॥

ऐसे भ्रूमध्य जाणावें ॥ अग्निचक्र भेदावें ॥ मनपवनातें जिणावें ॥ जाण देवी ॥११०॥

ऐसें झालें द्विदळचक्र ॥ आतां अष्टदळ ब्रह्यांडींचें मनचक्र ॥ तेंचि सांगतों सुंदर ॥ पार्वती वो ॥११॥

अष्टदळकमळ पिंडींचे जाण ॥ याचें विवरण सांगेन ॥ त्वां भक्तिनें कीजे श्रवण ॥ लाभ तो फलदायक ॥१२॥

सकाम तो भोग गाढा ॥ लक्षचौ -याशींचा घडामोडा ॥ आतां अष्टदळांचा झाडा ॥ करितो पार्वती ॥१३॥

श्लोक ॥ पूर्णदळे श्वेतवणें यदा विश्रमते मन :  धैर्ये तथौदाये धर्मे कीर्ती मतिर्भवेत् ॥१॥

अग्निकोणदले रक्ते यदा विश्रमते मन :  तदा निद्रालुतालस्यौ मंदा बुद्विश्व जायते ॥२॥

कृष्णवर्णे दक्षदले यदा विश्रमते मन :  तदा क्रोधे च द्वेषे दुष्टत्वेऽपिमतिर्भवेत् ॥३॥

नैऋते नीलर्ण च यदा विश्रमते मन :  तदा स्त्रीपुत्रवित्तादिमोहजाले भवेन्मति : ४॥

पश्विमे कपिले वर्णे यदा विश्रमते मन :  तदा हास्ये विनोदे च ह्यानंदे च भवेन्मति : ५॥

वायव्ये श्यामवर्ण च यदा विश्रमते मन :  तदा तीर्थाटनं कृत्वा वैराग्य प्राप्नुयान्नर : ६॥

उत्तरे पीतवर्णे च यदा विश्रमते मन :  तदा श्रुंगारभोगादिकरणे च भवेन्मति : ७॥

ऐशाने गौरवर्णे च यदा विश्रमते मन :  तदा कृपाक्षमाशांतिज्ञानादौ च भवेन्मति : ८॥

संधौ संधौज मिश्रवर्णे यदा विश्रमते मन :  तदा रोगव्याधिग्रस्तो जायते च सदा धुवम् ॥९॥

मध्यभागे सदा वर्णे यदा विश्रमते मन :  तदा शांतौ समाधौ च चैतन्ये च भबेन्मति : १०॥

॥टिका ॥ पूर्वदळीं श्वेतवर्ण जाणा ॥ तेथें प्रवेश होय मना ॥ तरी उदारवीर्य पुण्यवासना ॥ उपजे देवी ॥१४॥

अग्निदळी वर्ण राता ॥ तेथें मनासी होय स्थिरता ॥ तरी आळस उद्योग चित्ता ॥ उपजें पैं वो ॥१५॥

दक्षिण दळीं वर्ण काळा ॥ तेथें मन संचरे जे वेळां ॥ तरी क्रोध द्वेष दुष्टवासने वेगळा ॥ नव्हे मन ॥१६॥

नैऋतीचें पातें निळें ॥ तेथें जरी मन खेळे ॥ तरी वित्तपुत्रस्त्री मोहजाळें ॥ गुंतिजे देवी ॥१७॥

पश्चिमदळ कपिलत ॥ तेथें मन जरी संचरत ॥ तो हास्यविनोद आनंदभरित ॥ सुखी होय ॥१८॥

वायुचें पातें श्याम जाणावें ॥ तेथें मन जरी स्थिरावें ॥ तरी तीर्थागमन करावें ॥ ऐसी बुद्वी होईल ॥१९॥

उत्तरपातें पीतवर्ण ॥ तेथें साचा होय विश्राम ॥ तरी अष्टभोग जाण ॥ करुं उपजे पैं ॥१२०॥

ईशानीचें पातें गौर उत्तम ॥ तेथें होय विश्राम ॥ तरी श्रवन कीर्तन हे धर्म ॥ शांतिज्ञान उपजे ॥२१॥

मग मन प्रवेशलिया संधी ॥ तरी पडे रोगव्याधी ॥ मध्यें स्थिरावें तरी समाधी ॥ किंवा शांति उपजे पैं ॥२२॥

ऐसी अष्टदळांची झडती ॥ ती सांगितली तुजप्रती ॥ आतां इच्छा वो पार्वती ॥ काय असे सांग ॥२३॥

ऐसें शिववाक्य ऐकूनि पार्वती ॥ परम संतोषली असे चित्तीं ॥ मग बोलतें झाले त्रिनयन ॥ ऐक पार्वती चित्त देऊन ॥ सतरावींचे

स्थान सांगतों ॥२५॥

आतां सतरावीचें लक्षण ॥ चंद्र सूर्य अवश्यक जाण॥ सतरावी भेदरंधुपूर्ण ॥ हिरण्यगर्भ देह पैं ॥२६॥

उकार मातृका विलयस्थिती अवस्था ॥ मध्यमावाचा विष्णुदेवता ॥ एकवटा असे पंचभूतां ॥ काळ घर ॥२७॥

सात्विक अहंकार विकार ॥ अंर :कर्ण मनबुद्वि चित्त अहंकार ॥ ब्राह्यीमाया पुरुषाक्षर ॥ आपण जाण ॥२८॥

या उपरी सहस्त्र दळभुन ॥ तेथें सर्वाचा मेळा जाण ॥ तें अवधारिजे गहन ॥ आदि शक्ति ॥२९॥

देव म्हणे वो आतां ॥ ऐक अगम्यचक्र त्वंता ॥ जे गुरु ऋषि आदि देवता ॥ पूर्णभरित ॥१३०॥

पूर्ण चैतन्य जेथें ॥ मनपवनाचा ग्रास तेथें ॥ ते आदिशक्ति जगन्नाथे ॥ सांगिजेल ॥३१॥

मग ते निर्वाणबोधीं ॥ जाण ब्रह्यरंध्र उर्वी ॥ सहस्त्रदळीं प्रवेश ॥ तंव शून्य होय प्रकाश ॥ भरुन ठेला ॥३३॥

येथें जन्म आणि मरण ॥ संचितकर्म असे जाण ॥ क्षर पुरुष आपण ॥ पार्वती वो ॥३४॥

हें सहस्त्रदळ विकासे ॥ नानावर्ण तेज प्रकाशे ॥ तेथें सोहंशब्दबीज असे ॥ महालिंग देव तेथें ॥३५॥

उन्मनीसुषुम्नेची दीप्ती ॥ निरामय स्वरुप सहस्त्रदळ ॥ साक्षयोग ॥ लोपामुद्रा ॥ सहस्त्रदळ ॥

जो मायादेव ॥ रुद्रभिमानी ॥ परा पश्यंतीवाचा मकार मातृका ॥ प्रलय अस्था ॥ अंगक्षेत्र ॥ क्षेत्रमहालिंग ॥

सत्रावीचे जीवनलक्ष ॥ मुद्रा स्थानब्रह्य ॥ ज्योतिलिंग हेमवर्ण ॥ गुरु ऋषी ॥ परमगुरु देवता ॥ ज्ञानशक्ति ॥

सहस्त्र पाकोळिका एकसहस्त्र जप इति मस्तकस्थान समाप्त ॥

तामस अहंकार ॥ द्रव्यशक्ति ॥ हेमवर्णविकार ॥ पंचभूतें ॥ पंचविषय ॥ प्रारब्धकर्म हें म्हणिजे ऊर्ध्व चैतन्य ॥

तिन्ही अहंकारांचें घर जाण ॥

ब्रह्यज्योती ॥ जैसे कोटीसोमार्क उदय होती ॥ तैसी प्रभा ॥३६॥

त्या षट्चक्राचे शेवटीं ॥ पडे नादबिंदा गांठी ॥ होय पदपिंडास भेटी ॥ मग देह नाहीं ॥३७॥

त्या आनंदपदाच्या तळी ॥ आणि चंद्रसूर्याच्या मेळीं ॥ असे सुखें गोल्हाटमंडळी ॥ प्रेमयोगी तो ॥३८॥

हा सर्व शिवविचार ॥ तुज सांगितलासे विस्तार ॥ हा विश्वावसुयुगींचा प्रकार ॥ प्रगट केला ॥३९॥

शिवतत्वीं शिव झाला ॥ आणि कामतत्वीं गुंतला ॥ गुंतोन पुन : उगवला ॥ तोचि शिवयोगी ॥१४०॥

हें विश्वासुयुग जाण ॥ तुज केलें असे कथन ॥ जीवशिव सर्वज्ञान ॥ व्हावयासी ॥४१॥

मनयुक्तयुगीं ब्रह्या शापिला ॥ तेणें अहंमती कुळकर्म रचिला ॥ त्याच कर्मे कलंक लागला ॥ मग पडे सुखदु :खी ॥४२॥

ते भोगिती पुण्यपापफळें ॥ त्यांत ज्या सुखदु :ख होय आगळे ॥ तो कल्पी पुण्यफळें ॥ ऐसा त्या जाळीं गुंतला ॥४३॥

तंव शक्ति म्हणे जी देवा ॥ ध्यान धारणा मार्ग सांगावा ॥ कोण आसन कोण पूजावा ॥ तो निवेदीं मज ॥४४॥

दोनी कर जोडुनी ॥ चरणीं लागे भवानी ॥ मग कृपाळु शूळपाणी ॥ सांगता झाला ॥४५॥

आतां अजपागायत्री सांगेन ॥ षट्सचक्रांतें केले कथन ॥ आतां ऐक वज्रासन ॥ मूळबंध ॥४६॥

सहस्त्रदळाचें अंतराळ ॥ तें निरामय निष्फळ ॥ जें शिवाचें मूळ ॥ तें ऐक देवी ॥४७॥

ईश्वर गुण साम्य अद्वैत ॥ हें महदाकाश ॥ मूळ प्रकृति देग , सर्वजय , ईश्वर माया अविद्येचा ग्रास ॥ ॐकार मातृका ,

अक्षर , कारण , परावाचा अभिमानी , सर्व प्रपंचादि प्रकृचादि , प्रकृतिदेह , सर्वेश्वर प्राण जाल पूर्ण चैतन्य . जीवेश्वराची ऐक्यता ,

सर्वज्ञा अवस्था , तेथें जप एकवीस सहस्त्र सहाशें ॥ तेथें प्रकृति पुरुष हे महदादि , हा साम्य सर्वेश्वर . स्वतें शब्दाचा

जन्म , सत्राचे शक्ति जन्म , सोहं हंसो , अक्षर हा , कूटस्थ हा , सूक्ष्म प्रपंच हा इति अजपापिंड संपूर्ण ॥

तंव पार्वती म्हणे देवासी ॥ याचे ध्यान धारणा जपांसी ॥ आसन मुद्रा नेमेंसी ॥ सांगा मज ॥४८॥

ऐसें शक्तिचें वचन ॥ ऐकोनि बोले त्रिनयन ॥ वज्रासन मूळस्मरण ॥ बीजमंत्र ते ॥४९॥

तो अठरा अक्षरांचा जप ॥ जो सदगुरुचा निरोप ॥ तो तुजप्रती सोहंदीप ॥ सांगितला ॥१५०॥

तो जप सात वेळा कीजे ॥ उत्तममुखीं पद्यासनीं बैसिजे ॥ धारणान्यायेंसीं ॥ कीजे ॥ पार्वती वो ॥५१॥

वामहरण गुदस्थळीं दीजे ॥ दक्षिण चरण स्वाधिष्ठानीम लाविजे ॥ मेंढ्यासचि सवनी राहिजे ॥ ऊर्ध्वद्दष्टि भ्रध्यानें ॥५२॥

हनुवटी लाविजे कंठी ॥ द्दष्टी द्दढ धरिजे त्रिकुटीं ॥ या त्रिबंधे कुंडलिनी ॥ उफराटी पश्विम चाले ॥५३॥

गुदस्थानीं मूळबंध ॥ नाभी ओढियाणाबंध ॥ कटी जालंदरबंध ॥ हे बंध वज्रासनीं ॥५४॥

गुदस्थानाचे बंधें ॥ प्राण अपान रुंधे ॥ आणि नाभिचेनि बंधें ॥ उल्लाट होय ॥५५॥

कंठी कीजे संकोचन ॥ तेणें जालंधर पडे जाण ॥ घटे सदा द्वार रोधून ॥ खुंटे वायुची धांव ॥५६॥

मग प्राण अपान मोहरे ॥ तो भेदी एकवीस गव्हरें ॥ सुषुम्नेच्या विवरे ॥ पवन खेळे ॥५७॥

मग तो मणिकूलभेदी ॥ ऊर्ध्व चाले सुषुम्नेची संधी ॥ ह्या आसनाच्या बंधीं ॥ साधे सर्व ॥५८॥

त्या सुष्म्नेच्या पंथी ॥ परचकें जाण असती ॥ तीं सांगेन तुजप्रती ॥ ऐक देवी ॥५९॥

व्यापिलिया विनियोग ॥ विश्वस्तदेह ॥ ॐतत् परं त्रिकुटीस्थाने ॥ काश्य पृथ्वी ऋषि ब्रह्या देवता गायत्री संध्या

पीप्रभाजाग्रती अवस्था वाचा पूरक -हं स्वं मात्रा उदात्तस्वर गार्हपती अग्नि इंद्रियाविकार सृष्टी अर्थ क्रिया सत्व गुण

ऋग्वेद महदाकाश तुर्या प्राप्ति : प्रथमप्रणव : कर्ममीमांसक दर्शन हें ज्ञान ब्रह्ययाचे हें भक्तिदर्शन हें ज्ञान ब्रह्ययाचें सौर

विद्या हें आचरन हें परमश्रेष्ठी ज्ञानयासी साहित्य आचारलिंग यासी आचारलिंग बोलिजे प्रथम ॥

॥श्लोक ॥ सूचिकाज्ञानमार्गेण मणीनां भेदितं कुलं ॥ दशशरस्येकबिंब द्दश्यते ब्रह्यचारिणाम् ॥१॥

सत्वं , रज , इडा , सुषुम्ना , पिंग , सर्पिण :  मकरोकारश्वोकारस्त्रेशून्यं लभ्यते शिरे ॥२॥

त्रिकूटे शंकरसभा द्दश्यते च पितामह :  पितामहस्तथैवाथ प्रणम्यं कुरुते सदा ॥३॥

ॐतत्परमेश्वरहटस्थाने ॥ उकारस्य प्रणव इच्छा शक्ति आव्हांन वा ॥ आपऋषि विष्णु देता त्रिष्टुप् छंद :प्रभा स्वप्न अवस्था मध्यमा

वाचा कुंभकपवन मन चंद्र रज सत्व अग्नि व्यापिलपार्थ वीणयोग यजुर्वेद आपविष्णु सनातन , उदकरांतलय प्राप्त ,

द्वितीयंप्राणवासक नैयायिकदर्शन गोपिनाथ विद्या ॥ विद्या हे आचरण उपदर्शन ॥ हे उभयभक्ति दीर्घमात्रा जाण ॥

अनुहत स्वर हें श्रीहाटस्थान ॥ पार्वती वो ॥१६०॥

भक्ति दर्शन हें ज्ञान ॥ विष्णुचें लिंग लिंगदेह ॥ रसना स्थळ जाण ॥ यासी साहित्य पूर्ण ॥ गुरुलिंग म्हणिजे ॥६१॥

रसनेहटीं श्रीहाटस्थान ॥ तेथें आप ऋषि नांदे आपण ॥ गुरुलिंग यजुर्वेद कारण ॥ जाण देवी ॥६२॥

आतां गोल्हाटस्थानींची मात ॥ शक्तिसी म्हणे जगन्नाथा ॥ हा ब्रह्यांडीचा वृत्तांत ॥ ऐक देवी ॥६३॥

हें गोल्हाट चक्र ॥ ॐतत्पर ॥ गोल्हाटस्थान सकारस्य मातृका ॥ तेज ऋषि , रुद्र , देवता , जगती छंद ॥ अलोहीत

प्रभा , सुषुप्ति अवस्था , कारणदेह , पश्यंति वाचा , रेचक पवन , बुद्वीयुक्त सूर्य तमोगुण , प्लुत मात्रा , दीक्षाज्ञान शक्ति संघातार्थ

चापल्यार्थ विनियोग , प्राज्ञ , कारन , माया , देह , साम वेद स्वारितेवरुद्रस्वस्थता , मकारलय प्राप्त ॥ प्रथम प्रणवास चार्वाक

दर्शन ॥ अघोरपति विद्या जाण ॥ हेंचि स्वात्म आचरण ॥ पार्वती वो ॥६४॥

हें ज्ञान असे रुद्रांचे ॥ यासी साहित्य समाधीचें ॥ हेंचि शिवलिंग म्हणिजे साचे ॥ जाण देवी ॥६५॥

चक्षु गोल्हाट चक्रकमळ ॥ तेथें तेजऋषि करी झळाळ ॥ शिवंलिंग सामवेद केवळ ॥ असे देवी ॥६६॥

सुषुप्ति अवस्था तत्स्थानीं ॥ आणि देवता पिनाकपाणी ॥ हे समस्तही लालवर्णी ॥ शोभती सुरंगे ॥६७॥

आतां ब्रह्यांडींचे ओट पीठ ॥ जेथें देव नीळकंठ ॥ तें सांगा जी मजसी वरिष्ठ ॥ देवराया ॥६८॥

ऐसेम बोले आदिशक्ति ॥ मग देव म्हणे वो पार्वती ॥ औटपीठाची कैसी स्थिति ॥ ती तुज सांगतो ॥६९॥

ॐतत्पर औटपीठ ॥ पुण्याग्नि स्थान म्हणिजे ॥ तेथें स्तंभिजे ॥ ॐकारस्य अर्धमात्रा वायु ऋषि , ॐकार ईश्वर

नारायण देवता , विराटछंद : सर्व न्यास , समूळकाबीज , नील प्रभा , तुर्यावस्था , षीकंद , परावाचा , त्राहाटक पवन ॥ अथर्वण

वेद , नादबिंदू , चिद्छंद , ॐकार सविनता , अग्नि , भक्ति , क्रिया , ध्यान , व्याप्तलयार्थ विनियोग ॥ प्रत्यगात्माभीमानी . महाकारण

देह , याचा नाशी , ॐकारासी नाश , वैशेषिक दर्शन ॥ वेदांत उपदर्शन , अनवम्लेच्छ सप्रेम हंस उपदर्शन , हें भक्तिदर्शन ॥

हेंचि ज्ञान ईश्वर ॐकाराचे ॥ यासी साहित्य समाधी साचें ॥ आणि जंगमलिंग बोलिजे वाचे ॥ जाण देवी ॥१७०॥

ऐसी ही चारी स्थानकें जाण ॥ तुज निरोपिली गहन ॥ जेणे फिटे अज्ञान ॥ ब्रह्यांडीचे ॥७१॥

दुर्गा म्हणे देवा परियेसें ॥ या चहूं उपरी काय असे ॥ तें सांगावें संतोषें ॥ मजलागीं ॥७२॥

मग बोले शूळपाणी ॥ ऐक म्हणे वो भवानी ॥ आतां चक्र जाणीं ॥ सदाशिव देवता अव्यक्त छंद कृष्ण वर्ण॥ उन्मनी अवस्था पैं ॥७४॥

अतिपरावाचा काळ आन ॥ आत्मा महाअद्‍भुत जाण ॥ विस्मृति केवळ देवज्ञान ॥ ओंकारस्थ साहित्य ॥७५॥

अभिमानी सदाशिव बौद्वदर्शन ॥ पैन्य उपदर्शन भक्ति विद्या जाण ॥ साहित्य हें विद्या समाधी आचरण ॥ सदाशिवांचे ॥७६॥

हें प्रसादलिंग श्रोती गुंफाभ्रमर ॥ तेथें आकाश ऋषि महालिंग थोर ॥ आणि प्रसादलिंग उच्चार ॥ सूक्ष्मवेदाचा ॥७७॥

तेथें अवस्था उन्मनी बाळी ॥ सदाशिव देवता जवळी ॥ यासी कृष्णर्ण झळाळी ॥ मिरवतसे ॥७८॥

ऐक देवी याउपरी ॥ ब्रह्यरंध्र सहस्त्रदळाभीतरीं ॥ तेथें जीव शिव निर्धारी ॥ एक झाले ॥७९॥

गुरुकृपेचा अभयकर ॥ मस्तकीं ठेवी निरंतर ॥ तरी ह्योतिरुपी प्रकाशर ॥ प्राप्त होय ॥१८०॥

येथें नास्ति देव आपण ॥ अवस्था देवतादि वर्ण ॥ येथें समस्तांसीं लय होय जाण ॥

ॐतत्पर ब्रह्यरंध्रे द्वादशबिंदुस्तत्र नित्यपुरुषो वसतु ॥

कोटी दिनकरसुतेजसु ॥ कोटी कोटी सोमशा सुमित प्रकाशु ॥ दयास्त नास्ति , अखंड प्रकाश , ताद्दश पुरुष , हें

सहस्त्रदळ ब्रह्यरंध्र भुवन प्रात :स्मरण ॥ नाना भास नाना प्रकाश , नाना शनि , अनुहत वाद्य , पूर्णस्थ ब्रह्य , शिवदर्शन ,

योगयाता पात ,जलदेह उपदर्शन हें भक्तिंसर्शन , हें ज्ञान पुरुषाचें , यासी साहित्यसमाधी , महालिंग बोलिजे ॥गुणादि चक्रांस ॥८१॥

येथें कोटी प्रकाशती भास्कर ॥ वोप देती कोटी चंद्र ॥ ऐसे हें समाधिसुख परात्पर ॥ परमहंस भुवन ॥८२॥

इति अजपा ब्रह्यांडीची संपूर्ण ॥ आतां चतुर्थशून्य सांगेन ॥ तें देवी ऐक चित्त देऊन ॥ मग तूं जाणसी पूर्णघन ॥ सदोदित ॥८३॥

श्र्लोक॥ अश :शून्यं मध्यशूनुमूर्ध्वशून्यं निरामयम् ॥ त्रिशून्यं यो विजानाति स वै मुच्येत बंधनात् ॥१॥

याचें नाम अध :शून्य ब्रह्य ॥ ॐतत्पंर अश :शून्यं च माया चेतना बंधलेशस्तस्य तुपं च तस्मात् ॥ ईश्वर्यो भवंतु देव मम ग्रहो ,

द्वौ उपयाते विलयाते , पुरुषो किंसदाबुदबुदायवास , पुरुष कोटीप्रकाश , ताद्दश शक्ति , प्रात :स्मरतु नाना भास , प्रभांकित , हें

श्रीविद्येचें स्वरुप , शक्तिउपासक दर्शन ॥ महामाया हें ज्ञानचैतन्य , हें स्वरुप , यासी स्वानुभवसिद्वांत जाण देवी ॥

इति अध :शून्य संपूर्ण ॥१॥

आता मध्य शून्य ॥ ॥ ॐपत्पर मश्यशून्यं च प्रवक्ष्यामि मायानिर्व्कार निर्भयाभास सदोदोतस्य ॥ ॐहुंआनंदमूर्ती ॥

आलेखिनीनिश्वळ निष्कंलक परब्रह्य ॥ सुशीतळ साद्दश्यनिर्लेप ब्रह्य ॥ नास्ति भ्रमण अर्थ स्मरामि ॥ आगमनिगमनिर्भयनिरास्थिर ॥इति मध्य शून्य संपूर्ण ॥२॥

आतां ऊर्ध्वशून्य ॥ ॐपत्पंर र्ध्वशून्यं च प्रवक्ष्यामि ॥ केवल परब्रह्यं च ॥ अनुस्वापनिरतं च ॥ तस्य आत्मा आलेखो भवतु ॥

श्वर कोटी प्रकाश ॥ ईश्वर कोटी सुशीतळ ॥ ताद्दशं परब्रह्य स्वरुंप दयादर्शनं अस्तु ॥ इति तृतीय ऊर्ध्वशून्यं संपूर्णम् ॥३॥

आतां चतुर्थशून्यप्रारंभ ॥ यासी महाशून्य नाम ॥ ॐतत्परं चतुर्थशून्यं च ॥ हें शुद्व अगोचर च परमात्मस्वरुप अच्छेद अढळ

अकळ ॥ आनंदरुप जगन्मूर्ती व्यवस्थत ॥ जीव आत्मत्व तत्र निस्वरुपी ॥ अगोचर , अकल्पित , श्रीगुरुपद , हें घटाकाश ,

महदाकाश , लवण जलमिश्रित , तत्र गमेह आगम ,  आकाशमेव वदन तें , यदा मुक्तिर्भवतु , योगी उक्ति , रती भक्ति , उचिते

नारोचित सर्व सायो , आनंदमूर्ती क्रीडात्रेन नारायणो योगी भवतु , अगोचर लभ्यतें अनंत स्वखगचिते चतुर्थ शून्य संपूर्ण ॥४॥

आतां पंचमशून्यप्रारंभ ॥ ॐपत्पंर पंचशून्यं च ॥ ॐ अक्षरनाम शुद्व ,  अव्यक्तगति मूर्ती ॥ पार्वती आलगती

प्रवक्ष्यामितंशिवऐश्वर्य भवत्साहंकारकेवलं , र्ध्व उल्लेख , भावाभावविवर्जित कार्याकार्यज्ञान ॥ केवलस्वरुपी ॥

न पुण्यपाप विवर्जित ॥ अहं भावेन विवर्जित ॥ अनुहतस्यशब्दं च ॥ ध्वनिध्वनि निरंतर अंतर्गतमाया विलंय याति॥

ताद्दश्यं परमंपदं ॥ शक्तिकोटी प्रकाश शक्तिकोटी सुशीलता ॥ द्दश्य स्वयेंस्मतु नानाभास हें ईश्वराचें स्वरुप ॥

महात्म उपदर्शन ॥ श्रीकृष्णस्मरण ॥ केवलं ईश्वरो भवेत् ॥ इति पूर्ण चैतन्याची चाउरी ॥ वरी बैसुनी गोसावी राज्य करी ॥

यश १ श्री २ ओदार्य ३ ज्ञान ४ विज्ञान ५ दया ६ माया ७क्रिया ८ अविनाश ९ करुणा १० पर ११ परमेश्वर ॥१२॥

हा जाण देवी ॥ पंचमशून्य संपूर्ण ॥५॥ हे अकथन कथन जाये ॥ तुजप्रती कथिलें भबानिये॥ परि अज्ञान नरदेह पाहें ॥

नेणती मज ॥८४॥

जे अज्ञान मूढमती ॥ हा ग्रंथ न द्यावा त्यांचे हातीं ॥ आणि दिधलिया त्यांचे हातीम ॥ पूर्वजांसी महानरक ॥८५॥

हे गुह्यबीज जाण ॥ हें उपदेशिलेम मंत्रानुष्ठान ॥ हें प्रगट करितां पतन ॥ होय प्राणियांसी ॥८६॥

ऐसी पापपुण्य संचनी ॥ भोगिता पडिजे पतन भ्रमणीं ॥ नाना जन्ममरणीं ॥ असंख्य जीव पडले ॥८७॥

आतां येथून आयुष्यप्रमाण ॥ देहासी घडामोडी जाण ॥ हें मनयुक्तयुग प्रमाण ॥ जाहलें देवी ॥८८॥

हें मनयुक्तयुग समाप्त ॥ आतां ऐक युग अलंकृत ॥ पार्वतीसी सांगे जगन्नाथ ॥ म्हणे ईश्वर ॥१८९॥

इति श्रीमूळस्तंभे शिवनिबंधे ईश्वरपार्वतीसंवादे एकादशो‍ऽध्यायः ॥११॥

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP