गणपतीची आरती - हरिहरब्रह्मादीकी तुजला पू...

Ganapati Arati - Prayer to Lord Ganesha गणपतीची आरती - हरिहरब्रह्मादीकी तुजला

गणपतीची आरती
हरिहरब्रह्मादीकी तुजला पूजीलें।
म्हणोनि त्यांचे कार्य सिद्धी त्वां नेले॥
ऎसा तू गणराजा नवसा योजिले।
वर्णावया नकळे तुझी पाऊलें॥१॥
जय देव जय देव जय गजानना।
आरती ओवाळू तुज सुंदर वदना॥जय.॥धृ.॥
तुज ऎसा सुंदर आणिक न दीसे।
जिकडे पहावे तिकडे गणराज भासे।
श्रवणी कुंड्लांची दीप्ती प्रकाशे॥
चंद्र सूर्य दोन्ही हेलावति जैसे॥जय.॥२॥
गंधपुष्पे दुर्वा तुजला जे वाहती।
ते नर भाग्यवंत लक्ष्मी पावती॥
दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती।
सहज नामा याणें गाइली आरती॥जयदेव॥३॥
Translation - भाषांतर
N/A

References : N/A


Last Updated : 2012-08-30T21:28:25.0800000