गणपतीची आरती - आवडी गंगाजळें देवा न्हाणी...

Ganapati Arati - Prayer to Lord Ganesha गणपतीची आरती - आवडी गंगाजळें देवा

गणपतीची आरती
आवडी गंगाजळें देवा न्हाणीलें॥
भक्तीचें भूषण प्रेमसुगंधे अर्पीले॥
अहं हा धूप जाळू गणपतीपुढे॥
माझ्या मोरयापुढें॥
जंव जंव धूप जळे तवं तवं देवा आवडे॥१॥
पंचप्राणहीत धूपदीप जो केला॥
नैवेद्याकारणे उत्तम प्रकार अर्पिला॥
मध्वनाथस्वामी पंचोपचारि पूजीला॥
मग एकार्तीसी प्रेमे प्रारंभ केला॥२॥
Translation - भाषांतर
N/A

References : N/A


Last Updated : 2012-08-30T21:28:25.0800000