-
पु. १ पंचांग , कुंडल्या समजून गांवांत सांगणारा ; ज्योतिषी ; भविष्य वर्तविणारा ; भिक्षुकी , जोसकी करणारा ब्राह्मण ( विशेषत : धंदेवाईक ); ग्रामजोशी . पूर्वी ही वृत्ति असे व जोशाला गांवांत बलुतें देण्याचीहि वहिवाट असे . २ एक कुणब्यांतील जात ; कुडबुडे जोशी ( कुणब्यांतील ); हे सहदेवी मताचे मुहूर्त , ज्योतिष जाणतात . ३ बगळयाच्या जातींतील एक पक्षी ; कुकुडकुंभा . [ सं . ज्योतिषी ; प्रा . जोइस , जोइसिअ ] जोसकी , जोसपणा , जोसपण - स्त्रीपुन . गांवजोशाची वृत्ति , धंदा , वतन . जोसगंड - पु . जोशास निंदार्थी म्हणतात .
-
जोशीबोवा कोठें गेले? गोवर्या थापत हात गेलें ! कान गेल्याला किती दिवस झाले? चारहि उडवे म्यांच केले !
-
(व.) एका ग्रामजोशाची बायको बहिरी होती व तिला गोवर्या थापण्याचा उद्योग असे. एकजण जोशीबोवाकडे काही कामानिमित्त आले, व त्यांनी विचारले जोशीबोवा कोठे गेले? बाई गोवर्या थापीत होती. ती जोशीबुवांचा पत्ता सांगण्याऐवजी म्हणते, गोवर्या थापून थापून हात निकामी झाले. या उत्तरावरून त्याने विचारले, किती दिवसांपासून तुम्ही बहिर्या झाला? बाई म्हणते, समोरच्या चारहि उडव्यांतील गोवर्या मीच आपल्या हाताने केल्या. बहिरेपणामुळे असा घोटाळा उडाला. विचारावे एक व उत्तर यावे विलक्षणच, अशा स्थितीला ही म्हण लागते.
-
An astronomer or astrologer, esp. one by profession. 2 An individual of a class among Shúdras. They are fortune tellers, soothsayers &c. 3 A bird, a sort of crane.
Site Search
Input language: