हे व्रत आहे सरस्वतीचे लाभदायक फळ देणारे ।
या व्रताची सुरुवात करावी ज्येष्ठ मासी ।
शुद्ध तृतीयाचे दिवशी घ्यावे ब्राह्मण मुहर्ती ।
होऊन शुर्चिभूत मुक्तकेशावस्थेत स्मरावे देवतेस ।
करुन नमस्कार पती देवाशी करावे प्रसन्न ।
त्याच्या सेवेत करु नये खंड असे आचारावे सदैव ।
आपल्या व्रताची कल्पना न द्यावी यतकिंचति ।
मुक्तकेशा निळ वस्त्र धारण करुन स्मरावे देवीस ।
चौरंगावर करावे धान्याचे शुभकारक असे मंडल ।
त्यावरी ठेवावा तांब्याचा कळस पवित्रेचे प्रतीक ।
त्यामधील जल मानावे सरस्वतीचे शुभ प्रतीक ।
कळस मुखावर ठेवावे पाच ताजे पिंपळपान ।
तबक ठेवावे त्याच्यावर सरस्वतीमूर्ती सुंदर ।
सभोवती करावी आरास केळीच्या खुंटाची मनोहर ।
सोपस्कारे अर्पावे शुभ्र वस्त्र, गंध आणि पुष्पाते ।
ऐ वाग्वादिनी वदवाद स्वाहा.............
ओम ऐ र्ही क्ली सरस्वते नमः .................
असा जप करावा मनोभावे एकशे आठ वेळा ।
मंत्र जप करावा पूर्ण एकाग्रता ठेवून चित्ती ।
कथा संपता प्रेमभावे केळीचा प्रसाद करावा सेवन ।
आरती करावी मातेची मनोभावे तन्मयतेने ।
तीन दिवस करावा हा विधी नित्य नियमाने ।
करावा फलाहार उपवास करावा शुद्ध चित्ताने ।
दोन प्रहरी करावे निमिष भोजन स्वहस्त करुन ।
पंचधान्याचे करावे थालीपीठ भोजनासाठी ।
चौथ्या दिवशी षष्ठीला करावे पारायण ।
असे करावे पाच वेळा अश्विन मासापर्यंत ।
आश्विन शुद्ध षष्ठीस करावी व्रत समाप्ती अशी ।
नित्य पूजे नंतर बोलवावे पंच कन्यका ते ।
करुनी यशोचित सत्कार त्या कन्यकांचा ।
जेवू घालावे थालीपीठासह केळीचे शिकरण ।
सायंकाळी करावा हळदी कुंकु अकरा सुहासींना ।
सौभाग्याचे देणे द्यावे सरस्वतीव्रत कथासह ।
नित्यपाठाचा ग्रंथ द्यावा प्रसाद रुपाने त्यासह ।
अशा तर्हेने करावे व्रत यथाकाल शास्त्रात्वे ।
व्रताने होते सरस्वती प्रसन्न करावयास सकळ कल्याण ।
देते पती सुख महान आणि आविधवा मरणाचा मान ।
स्वर्गलोकी पतीसमवेत भोगतात नाना विलासभोग ।
या व्रताने ऐसे मिळते सरस्वतीचे वरदान सदैव ।
ऐसे सांगून व्रताचे आचरण तथास्तु म्हणाले ब्राह्मण ।
सेवाभावे एकचित्ते ऐकीले कथनाचे वृतांत ।
साष्टांग दंडवत करुनी विप्रा दिले यथायोगदान ।
पांढरे वस्त्र, शिधा पांढर्या शुभ्र गंधाचे लेपन ।
देऊनी आशीर्वाद होऊन समाधानी त्यानी गेले गमन ।
॥ इति अध्याय दुसरा लिलापाख्याने समस्त ॥