विष्णुधर्मोत्तरपुराणम् - प्रस्तावना

विष्णुधर्मोत्तर पुराण एक उपपुराण आहे.


विष्णुधर्मोत्तर पुराण एक विश्वकोशीय उपपुराण आहे. कथांशिवाय ह्यात ब्रह्माण्ड, भूगोल, खगोलशास्त्र, ज्योतिष, काल-विभाजन, कलुषित ग्रह ह्याशिवाय नक्षत्र शांती, प्रथा, तपस्या, वैष्णवांचे कर्तव्य, कायदे अथवा  राजनीति, युद्धनीति, मानव आणि पशुंसंबंधी रोगांची चिकित्सा, त्यांचे खाणेपिणे, व्याकरण, छन्द, शब्दकोश, भाषणकला, नाटक, नृत्य, संगीत आणि अनेकानेक कलांची चर्चा केलेली आहे. विष्णुधर्मोत्तरपुराणाच्या तृतीय खण्डातील सहाव्या अध्यायात ३२ तन्त्रयुक्त्या सांगितल्या आहेत. अशी मान्यता आहे कि, हे पुराण विष्णुपुराणाचे परिशिष्‍ट आहे.
विष्णुधर्मोत्तर पुराणाच्या 'चित्रसूत्र' नामे अध्यायात चित्रकला या विषयाचे महत्त्व खालील शब्दात सांगितले आहे..

कलानां प्रवरं चित्रम् धर्मार्थ काम मोक्षादं।
मांगल्य प्रथम् दोतद् गृहे यत्र प्रतिष्ठितम् ॥३८॥

(अर्थ : अनेक कलांमध्ये चित्रकला सर्वोच्च आहे, ज्यात धर्म, अर्थ, काम आणि मोक्षची प्राप्ती होत आहे. सबब ज्या घरात चित्रांची प्रतिष्ठा अधिक असते, तेथे सदा मंगल वातावरण असते.

संरचना

वर्तमान काळातील उपलब्ध पुराण ग्रन्थांत तीन खण्ड आहेत. पहिल्या खंडात २६९ अध्याय आहेत, द्वितीय खंडात १८३ अध्याय आणि तृतीय खंडात ११८ अध्याय आहेत.

वास्तविक विष्णुधर्मोत्तरपुराण स्वयं एक वृहद पुराण आहे. त्यात जवळपास १६ हजार श्लोक आहेत, ज्यांचे संकलन ६५० ई. च्या आस-पास झाले. प्रथम खण्डात २६९ अध्याय आहेत, ज्यात इतर पुराणांप्रमाणेच जगाची  उत्पत्ति, भूगोल सम्बन्धी वर्णन, ज्योतिष, राजे आणि ऋषींची वंशावळी इत्यादी आणि शंकरगीता, पुरूरवा, उर्वशीची कथा, श्राद्ध, वृत इत्यादी विषय आहेत.

द्वितीय खण्डातील १८३ अध्यायांत धर्म, राजनीति, आश्रम, ज्योतिषातील पैतामह-सिद्धान्त, औषधि विज्ञान इत्यादी मानवाच्या नित्य जीवनातील संबन्धि विषय आहेत.

तृतीय खण्डात ११८ अध्याय आहेत. ज्यात संस्कृत आणि प्राकृत व्याकरण, शब्दकोष, छन्दशास्त्र, काव्यशास्त्र, इत्यादी साहित्यिक विषय आहेतच शिवाय नृत्य आणि संगीत इत्यादि ललित कला आणि वास्तु जशी ललित शिल्प-कलेचे पण विस्तृत विवेचन आहे.
महत्त्व
इतके विषय आणि त्यांचे इतक्या सूक्ष्म रूपातील वर्णन इतर कोणत्याही पुराणात नाही. म्हणूनच विष्णुधर्मोत्तरपुराण अन्य सर्व महापुराण और उपपुराणांमध्ये अधिक महत्वपूर्ण पुराण आहे. विशेषकरून शिल्पशास्त्राच्या शास्त्रीय अध्ययनासाठी खण्ड अपूर्व आहे. ललित कलांसंबंधि जी माहिती मिळते ती इतर ठिकाणी उपलब्ध होत नाही. ह्याची गणना निस्सन्देह प्राचीन भारतातील ललित कलांसाठी सर्वागीण आणि महानतम शास्त्रांत होत आहे.

N/A

References : N/A
Last Updated : March 13, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP