गोपालकृष्णाष्टक - जन्मोनी व्रज गोकुळीं यदुक...
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
जन्मोनी व्रज गोकुळीं यदुकुळीं मूर्ती बरी सावळीं ।
शोभे भूषणयुक्त रूप बरवी मंडीत मुक्ताफळी ।
ज्याचा पार अपार सार मथितां वेडावल्या त्या श्रुती ।
सद्भावें नमितो लया यदुविरा गोपाळकृष्णाप्रती ॥१॥
देहूडा पद ठेवुनी निशिदिनीं व्यक्ती बहू ठेंगणी ।
लीला दाउनि फारसी बहु करी वेणूचिया सुध्वनी ॥
पंचत्री न करी धरी बहु परी नाना अयूधाप्रती ।
सद्भावें नमितों तया यदुविरा गोपाळकृष्णाप्रती ॥२॥
माळाचक्र गळां सुशंख बरवा गोवर्धनातें धरी ।
मर्दूनी फणिपाळ काळ रगडी पायांतळीं श्रीहरी ॥
गाई वत्ससहीत युक्त बरव्या पादांबुजा चाटिती ।
सद्भावें नमितों तया यदुविरा गोपाळकृष्णाप्रती ॥२॥
कर्णीं कुंडल शोभताति बरवे मकराकृती ते बरे ।
वाटे चंद्र दिवाकरासि उपमा निर्मीत हे दूसरे ॥
हस्तीं कंकण शृंखळा बहुबर्या त्या सुप्रभा विलसती ।
सद्भावें नमितों तया यदुविरा गोपाळकृष्णाप्रती ॥३॥
माथा मूगुट साजिरा बहु बरा शोभे तयासी तुरा ।
भाळीं टीळक रेखिला परिमळा चर्चूनिया केशर ॥
स्वच्छंदें निजमस्तकीं धरितसे शिवसांबगौरीप्रती ।
सद्भावें नमितों तया यदुविरा गोपाळ कृष्णाप्रती ॥५॥
राधारुक्मिणि यूवत्या बहुबर्या दोहीकडे साजिर्या ।
वस्त्रें भूषणयुक्त फार बरव्या लाहानशा गोजिर्या ॥
पायांचे निकटीं वसे खगपती वैचित्र्य त्याची गती ।
सद्भावें नमितों तया यदुविरा गोपाळकृष्णाप्रती ॥६॥
गंगेपासुनि दीडयोजन असे मोहोदधी क्षेत्रहो ।
नांदे त्यास्थळिं प्रेमयुक्त बरवा श्रीकृष्णगोपाळ हो ।
ज्याचे पादपदांबुजासि नमितां जोडे बहू संपती ॥
सद्भावें नमितों तया यदुविरा गोपाळकृष्णाप्रती ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 23, 2016
TOP