व्रतराजे

प्रस्तुत ग्रंथात मंत्र, व्याख्यान, मराठी अर्थ आणि मंत्रविधान एकत्र मिळाल्याने जिज्ञासूंची तृप्ती पूर्ण होईल असा विश्वास आहे.


व्रतराजे - “देशकालादिस्मरणं देवतास्मरणं तथा । संकल्पे विधिवत्कार्यं  नित्यं धर्मस्य हेतवे ॥” इति बृहद्वयासोनिक्तिमनुसृत्य धर्मस्य हेतुभूतत्वात्‌ यथासंभवं यथाचारं संकल्प: कार्य: । श्रीमन्महागणाधिपतये  नम इत्यादि श्रुतिस्मृतिपुराणोक्तफलप्राप्त्यर्थं श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं इतिसामान्यमुक्त्वा यां देवतामुद्दिश्य कर्म क्रियते तद्देवातनाम्‌, श्रीमहाविष्णुखपंचायतनदेवताप्रीत्यर्थं, श्रीरामप्रीत्यर्थं, श्रीसूक्तानुष्ठाने श्रीभगवती महालक्ष्मी जगदंबाप्रीत्यर्थमित्युक्त्वा यथाज्ञानेन यथासंभृतसंभारै: यथामीलितोपचारैर्वा
देशकालाद्यनुसारत: षोडशोपचारै: पूजनमहं करिष्ये, इति । प्रधानकर्मण: संकल्पं पूर्वं कृत्वा एककालत्वे सति तदंगमित्यादि प्रधानोत्तरमंगकर्मणां संकल्प: कार्य: । भिन्नकालत्वे तु श्व: परश्वो वेति व्यवहितदिनसंख्यामुक्त्वा करिष्यमाणऽमुककर्मणि, निर्विघतासिद्धयर्थं श्रीमहागणपतिपूजनं ग्रहानुकूल्यार्थं ग्रहयज्ञं इत्यादि यदिष्टमङंग तस्योह: स्वातंत्र्येण कर्तव्य: । महारुद्रस्वाहाकाराद्यनेकदिनसाध्यप्रयोगे तदाधिकरणीभूततिथ्यादिकालानां संकल्पवावय  ऊह: कर्तव्य इति मय़ूखे । यद्वा अद्यप्रभृत्यमुकदिनपर्यंतमिति
इष्टदिनसंख्यामुक्त्वा प्राग्वत्कुर्यादिति हिरण्यकेशिसूत्रे । काम्यकर्मणि यदर्थं कर्म क्रियते तस्याप्युच्चारो‍ऽवश्यं कर्तव्य: । एवं संकल्प्यान्ते साक्षतकुशोदकं देवतीर्थेनहस्तेनजलादौ ताम्रपात्रे वा प्रक्षिपेन्न भूमौ ।

अर्थ :--- याप्रमाणें देवता, देश, काल, संवत्सर, अयन, ऋतु, मास, तिथि, वारादींचा उच्चार करून इष्टदेवतेच्या उद्देशानें जें करिष्यमाण कर्म असेल त्याचा वाणीनें उच्चार करून देवतीर्थानें म्हणजे हस्तांच्या अंगुल्यग्रानें साक्षतोदक उदकांत  अथवा ताम्रादि पात्रांत सोडावें. जमिनीवर सोडूं नये. विशिष्ट कामनेनें कर्म करणें
असेल तर ‘पुत्रादिकामनया सत्पुत्रफलप्राप्त्यर्थं’ इत्यादि कामनेचा संकल्पांत उच्चार करावा. एककालत्व म्हणजे एकाच दिवशीं साङग कर्म कर्तव्य असतां प्रधानकर्माचा संकल्प पूर्वी करून नंतर ‘तदंगं’ म्हणून अंगभूत कर्मांचा संकल्प करावा. भिन्न कालीं म्हणजे सौकर्यार्थ गणपतिपूजन - स्वस्तिवाचनादि अंगभूत कर्म पूर्वदिवशीं वा तत्पूर्वीं कर्तव्य असतां श्व: परश्वो वा किंवा याहीपेक्षां व्यवहित काल असेल तर त्या दिनसंख्येचा चतुर्थेऽहनि असा उच्चार करून ‘करिष्यमाणामुककर्मणि’ असा संकल्प स्वतंत्रत्वानें करावा. महारुद्रस्वाहाकारासारखें रोज केले जाणारें अनेकदिनसाध्य कर्म असेल तर त्या कर्माचा समाप्तिदिनपर्यंत तदधिकरणीभूत सर्वतिथिवारादिकांचा संकल्पवाक्यांत ऊह करावा. अथवा अद्यदिनमारभ्य (द्वित्रादि) अमुकदिनपर्यंतं असा दिनसंख्येचा संकल्पवाक्यांत उल्लेख करावा. इत्यादि मयूखोक्ति व्रतराजांत व हिरण्यकेशिसूत्राच्या टीकेंत आहेत. असा हा संकल्याच विशेष अलीकडे लक्षांत घेतला जात नाहीं हें अयुक्त आहे.


References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP