यद्यपि पुरस्चरणविधौ तंत्रशास्त्रे भूमिशोधनकूर्मावलोकनादयो बहव: पदार्था निरूपितास्तथापि ते तांत्रिकमंत्रानुष्ठान एव विशेषेणापेक्षिता: न वैदिकमंत्रानुष्ठाने इति विश्वामित्रकल्पे, अत एवात्र श्रीसूक्तस्य वैदिकत्वात् भूमिशोधनादिकं नावश्यकमिति कृत्वा नोच्यते ।
अर्थ :--- तंत्रशास्त्रामध्यें कोणत्याही मंत्राच्या पुरश्चरणानुष्ठानापूर्वीं भूमिशोधन म्हणजे ही भूमि आपणांला सिद्धिद आहे किंवा नाहीं हें पाहणें, तसेंच ज्या ठिकाणीं बसावयाचें त्या स्थलीं कूर्मचक्र पाहणें. इत्यादि पुष्कळ गोष्टी सांगितल्या आहेत. पण तांत्रिक मंत्रालाच विशेषेंकरून त्या उक्त आहेत. वैदिकमंवानुष्ठानाकरितां याची आवश्यकता नाहीं. तें ऐच्छिक आहे. असें विश्वामित्रकल्यांत आहे. येथें श्रीसूक्त हें वैदिक असल्यानें त्याची आवश्यकता नाहीं म्हणून मी त्याविषयीं लिहीत नाहीं.