अथ प्रसंगात् सर्वत्र तत्तन्मंत्रजपाद्यनुष्ठानादिकर्मसु विहिताया
मानसपूजाया: विधि: मुद्राश्च प्रदर्श्यंते ।
तावदादौ इदमत्रावधेयं
यत् - मानसपूजा नाम तत्तदिष्टदेवतां हृदि विभाव्य मानसैर्मना:- कल्पितैरुपचारैस्तद्देवतापूजनम् इति ।
तदुक्तं श्रीमस्तद्नुरुसमर्थरामदासस्वामिभि:- ऐसी पूजा न घडे बरवी ।
तरी मानसपूजा करावी । मानस अगत्य व्हावी । परमेश्वरासी ॥
मनें भगवंतासी पूजावें । कल्पूनि सर्वही समर्पावें । मानसपूजेचें जाणावें । लक्षण ऐसें ॥
जें जें आपणास पाहिजे । तें तें कल्पूनि वाहिजे । येणें प्रकारें कीजे । मानसपूजा ॥
(ओवी ३१ ते ३४ द.४ स. ५ दासवो.)
भगवत्पदैकनिष्ठानां भक्तिमार्गनिरतानां भक्तिमार्गे विहिता इयमेव मानसपूजा ।
कर्ममार्गे तु तंत्रांतरे उदिता मानसपूजा त्वन्या, सा यथा - ‘आराध्यदेवतां हदि विभाव्य तत्तद्देवतानाम नमोऽन्तं चतुर्थ्यंतमुच्चार्य तत्तद्वीजपूर्वकं गंधादिपंचोपचारान् समर्पयेत् ।
तदेवं ॐ श्रीदेव्यै नम: ।
अथवा ॐ श्रीभगवतीमहालक्ष्म्यै नम: ।
ॐ लं पृथिव्यात्मकान् गंधान् कल्पयामि ।
इत्युक्त्वा उभयकरांगुष्ठाग्रेण
उभयकनिष्ठिकयोर्मध्यमपर्वणो: स्पृशन् गन्धं कल्पयेत् ।
ॐ श्रीदेव्यै नम त्यादि पूर्वबत् देवतानाम उक्त्वा ॐ हं आकाशात्मकं पुष्पं कल्पयामि इत्युच्चार्य उभयतर्जन्यग्रद्वयेन अंगुष्ठमध्यदेशयो: स्पृशन् पुष्पाणि कल्पयेत् ।
ॐ श्रीदेव्यै० ॐ यं वाय्वात्मकं धूपं कल्पयामि इति उभयांगुष्ठाग्रेण तर्जन्या मध्यदेशे स्पृशन् धूपं कल्पयेत् ॥
ॐ श्रीदेव्यै० ॐ रं अग्न्यात्मकं दीपं कल्पयामि इति उभयांगुष्ठाग्रेण मध्यमामध्यपर्वणो: स्पृशन् दीपं कल्पयेत् ।
ॐ श्रीदेव्यै० ॐ वं अमृतात्मकं नैवेद्यं कल्पयामि इति पूर्ववत् उभयांगुष्ठाग्रेण अनामिकयोर्मध्यदेशे स्पृशन् नैवेद्यं कल्पयेत् ।
यद्वा केवलनैवेद्यमुद्राप्रदर्शनेन मानसपूजा कार्येति आचारेन्दौ ॥
तृचभास्करे तु - कनिष्ठिकातर्जनीमध्यमानामिकानां अंगुष्ठाग्रेण मूलपर्वस्पर्श: गंधधूपदीपनैवेद्यानां क्रमान्मुद्रा; स्यु: ।
पुष्पमुद्रा तु तर्जन्यग्राभ्यां अंगुष्ठमूलयो: स्पर्श: पुष्पमुद्रा इत्युक्तम् ॥
अर्थ :--- जपादि अनुष्ठानप्रसंगीं कर्ममार्गांत अवश्य व विहित असलेल्या मानसपूजेचा प्रकार सांगतों -
प्रथम मानसपूजा म्हणजे इष्ट देवतेची मूर्ति हृत्कमलांत आणून एकेक उपचार आठवून मनानेंच श्रीचरणीं अर्पण करणेंही खरी भक्तिमार्गांतील बक्तांकडून आचरली जाणारी मानसपूजा होय. समर्थांनीं मानसपूजेचें लक्षणदा. बो. द. ४ स. ५ ओ. ३१ ते ३४ वरील ओव्यांत दिलें आहे. कर्ममार्गांतील मानसपूजाप्रकार पुढीलप्रमाणें आहे :--- इष्टदेवताध्यान करून तत्तद्देवतेचें नांव चतुर्थ्यंत व नमोन्त उच्चारून तद्वीजपूर्वक गंधादि पंचोपचार त्या त्या मुद्रेनें समर्पण करणें. तें असें - ॐ श्रीदेव्यौ नम: (अथवा ॐ श्रीभगवतीमहालक्ष्म्यै नम:) ॐ लं पृथिव्यात्मकान् गंधान्कल्पयामि, असें म्हणून दोन्ही हस्तांच्या आंगठ्याच्या अग्रांनीं कनिष्ठिकेच्या मध्यम पर्वाला स्पर्श करणें ही गंधमुद्रा. या मुद्रेनें गंधोपचाराची कल्पना करावी. ॐ श्रीदेव्यै नम: ॐ हं आकाशात्मकं पुष्पं कल्पयामि, असें म्हणून दोन्ही तर्जन्यग्रांनीं अंगुष्ठमध्यपर्वाला स्पर्श करून पुश्पसमर्पण कल्पना करणें ही पुष्पमुद्रा होय. याप्रमाणेंच पूर्ववत् देवतानाम उच्चारून ॐ य वाय्वात्मकं धूपं कल्पयामि, असें म्हणून दोन्ही अंगुष्ठाग्रांनीं तर्जनीमध्यपर्वाला स्पर्श करणें अंगुष्ठाग्रांनीं मध्यमेच्या मध्यदेशाला स्पर्श करणें ही दिपमुद्रा. पूर्ववत् नाम उच्चारून ॐ वं अमृतात्मकं नैवेद्यं कल्पयामि, म्हणून अंगुष्ठाग्रांनीं अनामिकेच्या मध्यदेशाला स्पश ‘करणें ही नैवेद्यमुद्रा होय. याप्रमाणेंगंधादि पंचोपचारांच्या या पंचमुद्रा होत. यांचा सुलभ प्रकार असा : प्रथम अंगुष्ठाग्रानें करांगुलिमध्यपर्वाला स्पर्श. नंतर तर्जन्यग्रानें अंगुष्ठमध्यपर्वाला स्पर्श तदनंतर अंगुष्ठाग्रानें तर्जनी, मध्यमा, अनामिका यांचे मध्यपर्वाला क्रमानें स्पर्श करावा. म्हणजे क्रमानें या पंचमुद्रा होतात. याप्रमाणें पंचमुद्रा करुन अथवा केवळ नैवेद्यमुद्राप्रदर्शनानें मानसपूजा करावी. असें आचारेन्दूमध्यें आहे. तृचभास्करामध्यें मुद्राप्रकार थोडा भिन्न आहे. म्हणजे तेथें अंगुलींच्या मूलपर्वाला स्पर्श सांगितला आहे. दोन्ही ग्रंथ कान्य असल्यानें विकल्प समजून कोणताही एक प्रकार आचरावा. सप्तशती इत्यादि ग्रंथाचा पाठ पुष्कळजण वाचतात. पण मानसपूजा कोणत्या पद्धतीनें करावी याची
कल्पना फारच थोडयांना असते. केवळ ‘लं पृथिव्यात्मकं गंधं कल्पयामि’ इत्यादि उच्चारणें हीच मानसपूजा अशी पुष्कळांची समजूत आहे. तरी तसें न करतां वर
लिहिलेल्या पद्धतीनें सर्वत्र मानसपूजा मुद्राप्रदर्शनपूर्वक करणें युक्त होय.
॥ इति प्राय: सर्वकर्मण्युपयुक्तन्यास - मानसपूजामुद्रादिविचार: ॥