मराठी मुख्य सूची|विधी|पूजा विधी|गृहप्रवेश| वरुण स्थापना गृहप्रवेश गृहप्रवेश करण्यापूर्वी पूजा प्रारंभ गणपति पूजन नवग्रह देवतांचे आवाहन वरुण स्थापना गृहप्रवेश - वरुण स्थापना नवीन घर घेतल्यावर वास्तुशांत करावयाचे नसल्यास गृहप्रवेश विधी करून राहायला जाता येते. Tags : poojavidhiगृहप्रवेशपूजाविधी वरुण ( मंगल कलश ) स्थापना Translation - भाषांतर वरुण ( मंगल कलश ) स्थापना आपले दोनही हात उताणे करुन कराग्रांनी भूमीला स्पर्श करुन भूमीची प्रार्थना करावी. -सर्वेषामाश्रया भूमिर्वराहेण समुद्धृता ।अनन्तसस्यदात्री या तां नमामि वसुन्धराम् ॥उताणे केलेल्या हाताच्या बोटांनी चौरंगावरील धान्यराशीला स्पर्श करावा. -यासामप्यायकः सोमो राजायाः शोभनाः स्मृताः ।ओषध्यः प्रक्षिपाम्यत्र ता अद्य कलशार्चने ॥वर सांगितल्याप्रमाणे कलशाला स्पर्श करुन कलशाची प्रार्थना करावी. कलशस्य मुखे विष्णुः कण्ठे रुद्रः समाश्रितः ।मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाः स्मृताः ॥कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ।ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो ह्मथर्वणः ।अङ्गैश्च सहिताः सर्वे कलशं तु समाश्रिताः ।अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरी तथा ।आयांतु देवपूजार्थं दुरितक्षयकारकाः ॥उजव्या हाताने पळीभर पाणी कलशात वाहावे. गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति । नर्मदे सिन्धु कावेरि कुम्भेऽस्मिन् संनिधिं कुरु ॥कलशात गंध-अक्षता-हळद-कुंकू-फुले व दूर्वा वाहाव्यात. मलयाचलसम्भूतं घनसारं मनोहरं ।ह्रुदयानन्दनं दिव्यं चन्दनं प्रक्षिपाम्यहम् ॥दूर्वेऽमृतजन्मासि वन्दिताऽसि सुरैरपि ।सौभाग्यसन्ततिकरी सर्वकार्येषु शोभना ॥आंब्याचा टहाळा ( टहाळ्याचे डेख कलशांत जाईल अशा रीतीने ) कलशाच्या मुखावर ठेवावा.अश्वत्थोदुम्बरप्लक्षचूतन्यग्रोधनपल्लवाः ।पञ्चभङ्गा इति ख्याताः सर्वकर्मसु शोभनाः ॥कलशामध्ये सुपारी व दक्षिणा ( सव्वा रुपयाची नाणी ) वाहावी.फलेन फलितं सर्व त्रैलोक्यं सचराचरम् ।कलशेऽस्मिन् क्षिपामीदं सर्वकर्मफलप्रदम् ॥हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसोः ।अनन्तपुण्यफलदं कुम्भेऽस्मिन् प्रक्षिपाम्यहम् ॥कलशामध्ये अक्षता वाहून वरुण देवतेचे आवाहन करावे.पाशहस्तं च वरुणं यादसांपतिमीश्वरम् । आवाहयामि यज्ञेऽस्मिन् पूजनार्थं नमामि तम् ॥अस्मिन् कलशे वरुणाय नमः ।वरुणं सांगं, सपरिवारं सायुधं, सशक्तिकम् आवाहयामि ।यानंतर नवग्रह व वरुण यांची एकदमच पुढील उपचार वाहून पूजा करायची आहे. सर्वांसाठी आवाहित देवताभ्यो नमः ।असे म्हटले आहे.आवाहित देवताभ्यो नमः ।ध्यानार्थे नमस्कारं समर्पयामि ।आसनासाठी देवाला अक्षता वाहाव्या. आवाहित देवताभ्यो नमः ।आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।डाव्या हाताने पळीत पाणी घेऊन ते पाणी फुलाने किंवा दूर्वेने देवावर शिंपडावे. आवाहित देवताभ्यो नमः ।पादयोः पाद्यं समर्पयामि ।अर्ध्यपात्रातील पाणी डाव्या हाताने पळीत घेऊन ते अर्ध्य फुलाने देवावर शिंपडावे. आवाहित देवताभ्यो नमः ।हस्तयोः अर्ध्य समर्पयामि ।पुनः साधे पाणी देवावर शिंपडावे.आवाहित देवताभ्यो नमः ।आचमनीयं समर्पयामि ।स्नानासाठी देवावर पुनः पाणी शिंपडावे.आवाहित देवताभ्यो नमः ।स्नानं समर्पयामि ।देवाला कापसाची २ वस्त्रे वहावीत. नसल्यास अक्षता वाहाव्या.आवाहित देवताभ्यो नमः ।वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं, अक्षतान् वा समर्पयामि ।देवाला जानवे वाहावे. नसल्यास अक्षता वाहाव्या. आवाहित देवताभ्यो नमः ।उपवस्त्रार्थे यज्ञोपवीतं, अक्षतान् वा समर्पयामि ।देवाला करंगळीजवळच्या बोटाने गंध लावावे - आवाहित देवताभ्यो नमः ।विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि ।देवाला अलंकारासाठी अक्षता वाहाव्यात.आवाहित देवताभ्यो नमः ।अलङ्कारार्थे अक्षतान् समर्पयामि ।देवाच्या अंगभूत असणार्या देवीला अगोदर हळद् व नंतर कुंकू वाहावे. आवाहित देवताभ्यो नमः ।हरिद्रां कुङ्कुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि ।देवाला शेंदूर अष्टगंध इत्यादि वाहावे. आवाहित देवताभ्यो नमः ।परिमलद्रव्यं समर्पयामि ।दूर्वांची जुडी सोडून गंध-अक्षता-हळद-कुंकू यांच्यासह आपल्याकडे दूर्वाग्र करुन वाहावी. आवाहित देवताभ्यो नमः ।दूर्वाङ्कुरान् समर्पयामि ।( सूर्य, मंगळ व वरुण या देवांना ) देवाला लाल फूल वहावे. ( फुलाचे डेख देवाकडे करावे ) आवाहित देवताभ्यो नमः ।पूजार्थे कालोद्भवपुष्पं समर्पयामि ।उजव्या हाताने अगोदर उदबत्ती व नंतर नीरांजन ओवाळावे. डाव्या हाताने घंटा वाजवावी.आवाहित देवताभ्यो नमः ।धूपं आघ्रापयामि ।आवाहित देवताभ्यो नमः ।दीपं दर्शयामि ।देवाच्या समोर किंवा चौरंगावर पाण्याने चौकोन करुन त्यावर एका वाटीत पेढे ठेवावीत. उजव्या हातात पाणी घेऊन ते नैवेद्याभोवती एकदा फिरवावे, व हात जोडावेत.सत्यंत वर्तेन परिषिंचामि ।आवाहित देवताभ्यो नमः ।नैवेद्यार्थे उपलब्धनैवेद्यं समर्पयामि ।प्राणाय नमः ।अपनाय नमः ।व्यानाय नमः ।उदानाय नमः ।समानाय नमः ।ब्रह्मणे नमः ।नैवेद्या भोवती पुनः एकदा पाणी फिरवून पळीभर पाणी ताम्हनात सोडावे व हात जोडावेत.नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि ।अपनाय नमः ।व्यानाय नमः ।उदानाय नमः ।समानाय नमः ।प्राणाय नमः ।ब्रह्मणे नमः ।उजव्या हातावरुन चार वेळा ताम्हनात सोडावे आणि देवाला गंध फूल वहावे. उत्तरापोशनं समर्पयामि ।हस्तप्रक्षालनं समर्पयामि ।मुखप्रक्षालनं समर्पयामि ।आचमनीयं समर्पयामि ।करोद्वर्तनार्थे चन्दनं समर्पयामि । चौरंगावर विडा, दक्षिणा, खारीक, बदाम, किंवा उपलब्ध असलेले फळ ठेवून त्यावर उजव्या हातावरून पाणी सोडावे. आवाहित देवताभ्यो नमः ।मुखवासार्थे पूगीफलं तांबूलं, खर्जुरीफलं, वाताम्बुफलं, यथासम्पादित कालोद्भवफलं समर्पयामि ।सुवर्णपुष्पदक्षिणां च समर्पयामि ।देवाला गंध-फूल वाहून नमस्कार करावा. आवाहित देवताभ्यो नमः ।मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि ।नमस्करोमि ।उजव्या हातावरुन ताम्हनात पाणी सोडावे. अनेन कृतपूजनेन आवाहित देवताः प्रीयतां न मम ।पूजा झाल्यावर गणपतीची, देवीची आरती करुन मंत्रपुष्पांजलि म्हणून झाल्यावर सर्वांनी प्रार्थना करावी. हात जोडावेत. आवाहनं न जानामि, न जानामि तवार्चनम् ।पूजां चैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर ॥मंत्रहीनं क्रियाहीनं, भक्तिहीनं सुरेश्वर ।यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे ॥उजव्या हातावरुन पुनः पाणी सोडावे.कृतस्य कर्मणः सांगतासिद्धयर्थं ब्राह्मणाय यथाशक्ति दक्षिणा-प्रदानं करिष्ये ।एका विडयावर गंधाक्षतफूल, नारळ व दक्षिणा ठेवून त्यावर पळीने पाणी वाहून नमस्कार करावा. पूजा पूर्ण झाल्यावर यजमानाने घराच्या प्रवेश दाराच्या खालच्या उंबरठयावर कोपर्यात दोन्ही बाजूला कुंकुमाने स्वस्तिक काढावे. वरच्या बाजूला तोरण बांधावे. दारावर ॥ शुभ ॥ लाभ॥ श्री गणेशाय नमः । असे लिहावे. नवीन घरात प्रवेश असेल तर गणपतीचे चित्र चिकटविणे. यजमान-पत्नीने स्वयंपाकाच्या ओटयावर कुंकमाने स्वस्तिकं काढावे. स्टोव्ह / गॅसची शेगडी यांची पूजा करावी. दूध तापत ठेवावे. थोडे दूध उतू गेल्यावर नंतर चहा / कॉफी करावी. सर्वांना यथाशक्ति अल्पोपहार व चहा / कॉफी द्यावी. अथवा रस, सरबत आदि शुद्ध पेय द्यावे. पेढे वाटावे. दुसर्या दिवशी आपण ज्या देवतांची पूजा केली त्यांचे अक्षता वाहून विसर्जन करावे. यांतु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवीं ।इष्टकाम प्रसिद्धयर्थं पुनरागमनाय च ॥कुलदेवतेला ठेवलेला विडा नारळ आपण प्रसाद म्हणून घरात वापरावा. क्षेत्रपालाचा विडा / नारळ रखवालदाराला द्यावा. अन्य सर्व उरलेले विडे, नारळ, तांदूळ सुपार्या व वर सांगितलेला विडा व दक्षिणा आपल्या गुरुजींना द्यावी. यानंतर आपल्या सोईप्रमाणे नव्या घरात सर्व घर सामान व्यवस्थित लावून झाल्यावर आपल्याला यथोचित वेळी वास्तुशांती करावी. N/A References : N/A Last Updated : May 24, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP