कर्जे काढणे - कलम २९२ ते २९३

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.



भारत सरकारने कर्जे काढणे. २९२.
संसदेकडून कायद्याद्वारे वेळोवेळी निश्चित केल्या जातील अशा जर काही मर्यादा असतील तर त्या मर्यादांमध्ये. भारताच्या एकत्रित निधीच्या प्रतिभूतीवर कर्जे काढणे आणि अशा प्रकारे निश्चित केल्या जातील अशा जर काही मर्यादा असतील तर त्या मर्यादांमध्ये हमी देणे, हे संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या कक्षेत येईल.

राज्यांनी कर्जे काढणे. २९३.
(१) या अनुच्छेदाच्या तरतुदींना अधीन राहून, अशा राज्याच्या विधानमंडळाकडून कायद्याद्वारे. वेळोवेळी निश्चित केल्या जातील अशा जर काही मर्यादा असतील तर त्या मर्यादांमध्ये. राज्याच्या एकत्रित निधीच्या प्रतिभूतीवर भारताच्या राज्यक्षेत्रात कर्जे काढणे आणि अशा प्रकारे निश्चित केल्या जातील अशा जर काही मर्यादा असतील तर त्या मर्यादांमध्ये हमी देणे. हे राज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या कक्षेत येईल.
(२) भारत सरकार, संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे, किंवा त्याखाली घालून दिल्या जातील अशा शर्तींना अधीन राहून. कोणत्याही राज्याला कर्जे देऊ शकेल अथवा अनुच्छेद २९२ खाली निश्चित केलेल्या कोणत्याही मर्यादा ओलांडल्या जात नाहीत तेथवर. कोणत्याही राज्याने उभारलेल्या कर्जासंबंधी हमी देऊ शकेल. आणि अशी कर्जे देण्याच्या प्रयोजनार्थ आवश्यक असलेल्या कोणत्याही रकमा भारताच्या एकत्रिता निधीवर प्रभारित केल्या जातील.
(३) भारत सरकारने किंवा त्याच्या पूर्वाधिकारी सरकारने राज्यास जे कर्ज दिलेले असेल किंवा ज्याच्याबाबत भारत सरकारने किंवा त्याच्या पूर्वाधिकारी सरकारने हमी दिलेली असेल. त्या कर्जाचा कोणताही भाग अजून येणे बाकी असेल तर, त्या राज्याला भारत सरकारच्या संमतीशिवाय कोणतेही कर्ज उभारता येणार नाही.
(४) खंड (३) खालील संमती, भारत सरकारला योग्य वाटेल अशा जर काही शर्ती घालावयाच्या असतील तर त्यांना अधीन राहून देता येईल.

N/A

References : N/A
Last Updated : January 13, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP