गुरुसंस्था - बारा प्रकारचे गुरु

मंत्रशास्त्राकार जगन्नाथपुरीचे ब्रह्मीभूत पूज्य श्रीशंकराचार्य योगेश्वरानंदतीर्थ ह्यांचा हा मंत्रसाठा सिद्ध आहे ,


पांडवप्रतापाच्या पांचव्या अध्यायांत पुढें दिल्याप्रमाणें ’ बारा प्रकारचे गुरु आहेत --

१ . धातुर्वादीगुरुः शिष्याकडून तीर्थाटन करवून नाना साधनें सांगून शेवटीं ज्ञानप्राप्ति करून देतो .

२ . चंदनगुरुः चंदनवृक्ष जसा आपल्या जवळच्या वृक्षांना आपल्यासारखाच चंदन बनवितो . पण ( पण हिंगणवेळू व केळें हे वृक्ष सोडून ) तसा अमक्त शिवायकरून आपल्या केवल समागमानेंच हा गुरु भक्तांस तारून नेतो .

३ . विचारगुरुः नित्यानित्यविचारानें शिष्यास ज्ञान करून देऊन पिपीलिकार्मानें साक्षात्कार करून देतो .

४ . अनुग्रहगुरुः शिष्याव्र कृपानुग्रह करतो . त्याच्या प्रतापानेंच सायास न होतां शिष्यास ज्ञान होतें .

५ . परीसगुरुः परीस ज्याप्रमाणें स्प्रर्शमात्रेंकरून लोह तें सुधर्ण बनवितो त्याप्रमाणें स्पर्शानें शिष्यास गुरुत्व प्राप्त होतें .

६ . कच्छपगुरुः कूर्म म्हणजे कासवी ज्याप्रमाणें नुसत्या अवलोकनानें पिलांचें पोषण करिते , त्याप्रमाणें हा कृपावलोकनानेंच शिष्याचा उद्धार करतो .

७ . चंद्रगुरुः चंद्र उदय पावतांच चंद्रकांतास पाझर फुटतो , त्याप्रमाणें याचें अंतर द्रवतांच दूरचे शिष्यही तरतात .

८ . दर्पणगुरुः आरशांत पाहिल्याबरोबर आपलें मुख आपणांस दिसतें . त्याप्रमाणें त्याच्या नुसत्या दर्शनानें स्वरूपज्ञान होतें . कसलेच आयास पडत नाहींत .

९ . छायानिधिगुरुः छायानिधि या नांवाचा एक मोठा पक्षी आकाशांत फिरत असतो . त्याची छाया ज्याच्यावर पडते तो राजा होतो . त्याप्रमाणें ह्या गुरूची छाया ज्याच्यावर पडते तो तत्काळ स्वानंद साम्राज्याधिपति होतो .

१० . नादनिधिगुरुः नादनिधि नांवाचा मणि आहे . ज्या धातूचा घ्वनि त्याच्या कानांत पडतो त्या सर्व धातू स्वस्थानीं सुवर्ण बनतात . त्याप्रमाणें मुमुक्षूची करुणवाणी त्याच्या कानीं पडतांच मुमुक्षूस दिव्य ज्ञान होतें .

११ . क्रौंचपक्षीगुरुः क्रौंच नांवाची पक्षीण समुद्रतीरीं पिलें ठेवून चारा घेण्यासाठीं सहासहा महिने दूरदेशीं फिरावयास जाते . व बारंबार आकाशाकडे डोळे करून पिलांची आठवण करते . त्या योगानें तेथें पिलें पुष्ट होतात . त्याचप्रमाणें हा गुरु ज्यांची आठवण करितो ते आपापल्या स्थानीं असतांच तरून जातात .

१२ . सूर्यकांतगुरुः सूर्यदर्शनानें सूर्यकांत मण्यांत अथवा भिंगांत अग्नी पडतो व खालीं घरलेला कापूस जळून जातो . ( सूर्याची इच्छा नसतांनाहीं ) त्याप्रभाणें ह्या गुरूची द्दष्टि जिकडे झळकतेते पुरुष तात्काळ विदेहत्व पावतात . रुद्रयामलांत सांगितलें आहे कीं , ग्रंथवाचनानेंच व गुरुप्राप्तीशिवाय जपतपादि साधनें केलीं तर त्यांच्या विशेष उपयोग होणार नाहीं . अधिकारी गुरूशिवाय इष्टदेवता साधन प्राप्त होणार नाहीं . गुरुतंत्रांत सांगितलें आहे कीं ," शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरौ रुष्टे न कश्चन । तस्मात् ‌ शुद्धमना नित्यं तमेवाराधयेत् ‌ गुरुं " श्रीसमर्थ रामदासस्वामींनीं नवविधा भक्तीचें वर्णन करितांना अर्चन व पादसेवन गुरूचेंच करावें असें सांगितलें आहे . त्याचें रहस्य हेंच होय .

वरील उद्‌धृत केलेत्र्या मंत्रग्रंथांतील वचनांवरून गुरुदेव ही व्यक्ति मनुष्य जीवरूप नसून देवतारूप आहे , असा साधकानें निश्चय करावा . गुरुदेव मनुष्यच आहे अशी शंका घेतली तर ज्याअर्थां ब्रह्यरूपी गुरुशाक्ति गुरूचे ठिकाणीं जागृत होते , व देवतेच्या ठिकाणीं देवताशाक्ति जागृत झालेली साधकांस अनुभवास येते त्या अर्थां ती देवताही मृणमय , वालुकामय अगर पाषाणमय नसली पाहिजे , व गुरुदेव ही व्यक्ति मनुष्य नसली पाहिजे . म्हणून आपण घेतलेल्या शंका व्यर्थ आहेत , असा निष्कर्ष काढण्यास कांहीं प्रत्यवाय नाहीं . वस्तुतः गुरुतत्त्व अविभाज्य , सर्वस्पृक् ‌ आणि अनंत आहे . ब्रह्य सर्वव्यापी असल्यानें तें मृत्तिका अथवा पाषाणांत आहेत आहे , व म्हणून त्यास विशिष्ट स्थाननिष्ट म्हणतां येत नाहीं . मृत्तिका अगर पाषाण यांपुरतीच जर ब्रह्यरूपाची व्याप्ति रहात नाहीं , तर एका मनुष्याच्या ठिकाणींच केवळ त्याची व्याप्ति कशी राहील . साधकाला आपल्या साधनाबलानें अचेतन मूर्तीच्या ठिकाणीं ब्रह्यशक्ति जागृत करितां येते . परंतु जो साधक नाहीं , व अधिकारी साधक होण्याची प्रतीक्षा करीत असतो , त्याला मूर्तीच्या ठिकाणीं प्राणशक्ति जागृत आहे ,असा अनुभव येणार नाहीं . म्हणून साधकानें मूर्तीच्या ठिकाणीं प्राणशक्तीची जागृति व सप्तावस्था यांतील फरक समजण्याची शक्ति गुरुसमाश्रयानें प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे . प्राणशक्ति जागृत करण्याची कला ज्याला अवरगत आहे , त्याला अचेतन मूर्तीच्या ठिकाणीं प्राणशक्ति प्रगट करितां येते . मग सचेतन साधकाचे ठिकाणीं जागृत करितां येईल यांत काय संशय ? म्हणून शास्त्रकारांनीं अशा प्रकारच्याच सत्पुरुषाला . साधकानें गुरु करावा , असें सांगितलें आहे . शास्त्रनिपुण गुरूंनां प्राणशक्तीची जागृति कशी करावी हें शास्त्राधारें शाब्दिक ज्ञानानें सिद्ध करून दाखवितां येईल , परंतु ही शक्ति बाह्यशक्ति होय . म्हणजे असे गुरु शाब्दे निष्णात असल्याची खात्री पटेल , परंतु गुरु ’परेच निष्णात :’ म्हणजे अंतःशक्तिसंपन्न असला पाहिजे . म्हणजे त्याला साधकाचे ठिकाणीं अंतःशक्ति प्रत्यक्ष जागृत करितां आली पाहिजे . म्हणजे तो ’शाब्दे परे च निष्णातः ’ असा असला पाहिजे व त्यालाच गुरुदेव अथवा सद्‌गुरु ही पदवी देणें इष्ट आहे . शास्त्रांत गरूबद्दल इतकी चर्चा करून गुरूची इतकी कसोटी पाहाण्याची आवश्यकता ठेविली आहे , त्याचें कारण वेषधारी गुरु , धंदेवाईक गुरु . बोवाबाजी करणारे गुरु , यांच्यापासून साधकाचा बचाव व्हावा हेंच होय .

कुलागमांत असें सांगितलें कीं , दिव्यज्ञान व दिव्यशक्तिसंपन्न सत्पुरुषांनीं ज्या साधकाला उपदेश दिला आहे , व दीक्षा दिली आहे , तो साधक दिव्यज्ञान व दिव्यशक्तिसंपन्न होतो . बाह्यशक्तिसंपन्न अथवा शाब्दिकज्ञानसंपन्न असलेला पुरुष , दुसर्‍याला शब्दज्ञान देईल . म्हणजे मंत्र सांगून देईल . परंतु त्याचे ठिकाणीं मंत्रशक्ति जागृत करून देऊं शकणार नाहीं . ज्याला मंत्रशक्ति अवगत आहे तोच दुसर्‍याला ती देऊं शकेल . विश्वसार तंत्रांत सांगितलें आहे कीं , गुरु सर्वशास्त्रज्ञ , मंत्रशक्तिसंपन्न , सुशोभित , सर्वावयवसंपन्न , संयमी , पितृभक्त , वर्णाश्रधर्मानुकूल वर्तन करणारा , कुलाचारसंपन्न , कुलीन ( कुल म्हण जे मुलाधार चक्र व कुलीन म्हणजे मूलाधारादि षट्‌चक्र -भेदन जाणणारा ), शांतचित्त , शिष्याचे जवळ राहणारा ( शिष्य व गुरु एकाच प्रांतांत राहणारे असावे ), शिष्याची चिंता बाहणारा व ब्राह्यण असावा . भुवनेश्वरी तंत्रांत सांगितलें आहे कीं , ब्राह्यण हा सर्व वर्णानां दीक्षा देऊं शकतो . ब्राह्यण उपलब्ध नसेल तर सदाचारसंपन्न क्षत्रिय गुरु वैश्य व शूद्र यांना दीक्षा देण्यास पात्र आहे . व वैश्य गुरूंनीं शूद्रास दीक्षा देण्यास हरकत नाहीं .शाक्ततरंगिणींत सांगितलें आहे कीं , शूद्रानें शूद्रापासून दीक्षा घेऊं नये ,

रुद्रयामलांत सांगितलें आहे कीं पतीनें पत्नीस , पित्यानें कन्येस व पुत्रस , भ्रात्यानें भ्रात्यास दीक्षा देऊं नये . परंतु पति अगर पिता सिद्धमांत्रिक असला तर त्यानें वरील नियमाला अपवाद म्हणून कन्येला व पुत्राला दीक्षा देण्यास हरकत नाहीं , असें क्रमार्चनचंद्रिका या ग्रंथांत सांगितलें आहे . सिद्धमांत्रिक याचा अर्थ असा कीं ज्याला काली , तारा , षोडशी , भुवनेश्वरी , भूमावती , बगला इत्यादि विद्यांचा उपदेश झालेला आहे तो सिद्धमांत्रिक गुरु होय . तसेंच कालीकल्पांत सांगितलेलें आहे कीं , तीन पिढयांपर्थंत वरील मंत्रापैकीं एक चालू असेल , तर तो सिद्धमंत्र होतो . मत्स्यसूक्तांत सांगितलें आहे कीं , ज्येष्ठ पुत्र अगर कोणताही पुत्र जर सदाचार संपन्न व पितृभक्त असेल तर त्याला पित्यानें मंत्रदीक्षा द्यावी . रुद्रयामलांत सांगितलें आहे कीं खियाही गुरुपदवीला योग्य आहेत . पण त्या स्त्रियांच्या पितृवंशांत षट्‌चकांचा अभ्यास करणारे पुरुष असावे व ’ कुलं तु ब्रह्यशक्तिः स्यात् ‌ अकुलं ब्रह्य चोच्यते कुलाकुलात्मतत्त्वज्ञः कुलीनः स च कथ्यते ’ अशा कुलीनाची स्त्री व कुल म्हणजे मूलाधारचक्राचे जवळचें चक्र व अकुल म्हणजे सहस्त्रार चक्र यांच्या ज्ञानानें व अभ्यासानें पुनीत झालेली अशी कुलजा व कुलीन , सदाचारशील , पतिव्रता , पवित्र , इंद्रियनिग्रही , वृद्धांची सेवा करणारी , मंत्रज्ञ , मंत्रार्थज्ञ , व मंत्रजपपरायण व इष्देवताप्रसाद मिळालेली , अशा स्त्रियेपासूनही उपदेश घेतां येतो . विधवेला उपदेशाधिकार नाहीं . तथापि स्त्रियांनीं पुत्रांनां दीक्षा देण्यास हरकत नाहीं , सिद्धमंत्रसंपन्न स्त्रिया असतील तर त्यांनांही मंत्रदीक्षा देतां येते . पुत्रसंपन्न सती पतिव्रता आपण होऊन मंत्रदीक्षा देते , असें ती म्हणेल , तर त्या मंत्राचें फल आठपट येतें . श्रीसमर्थांनीं स्त्रियांस शिष्य करण्याची आज्ञा दिली होती . त्यांचा आधार तरी याच रुद्रयामलांतील वरील वाक्यावर असावा .

स्वप्नांत मंत्र मिळाल्यास गुरु करण्याची आवश्यकता नाहीं . तरी गुरूपदेशाचा संस्क्रार करावयास पाहिजे , तो असाः स्नान करून आपले पुढें पाटावर तांदूळ पसरून त्यावर ताम्रपात्र ( घट ) ठेवावें , त्यांत आम्रपल्लव ठेवावें व फुलें वहावीं , व त्यांवर स्वप्नांत ज्यांनीं मंत्र दिला त्यांचें आवाहन करावें . मग पिंपळाच्या पानाव्र कुंकुमानें ( केशर ) तो मंत्र बिल्व किंवा तुळसीच्या काडीनें लिहावा , गुरूचें ध्यान मनांत आणून तो वाचावा , अशा प्रकारचा स्वप्नमंत्राचा विधि योगिनीतंत्रांत सांगितला आहे . गुरुवंश अथवा कुलगुरु म्हणजे आपल्या गुरूचे पुत्रपौत्र असतील त्यांस आपल्या पुत्रांनीं किंवा पौत्रांनीं गुरु करावें , परंतु त्यांच्या ठिकाणीं गुरूचीं लक्षणें नसतील तर त्यांनां गुरु करूं नये . एकदां गुरुपद कोणास दिल्यावर त्यास जर कांहीं रोग झाला , तरी त्यांस आदर दाखाविण्याचें विसरूं नये , परंतु ज्याला असे रोग असतील त्याला गुरुपद देऊंच नये . म्हणजे त्याला गुरु करूं नये .

मनाप्रमाणें शुद्धाचरणी गुरु मिळत नाहीं असें झालें व योग्य गुरु न मिळाला , तर गुरु करण्याचा विधि पूर्वजन्मस्मृत म्हणजे आपणास आवड जशी असेल त्याप्रमाणें किंवा आपल्या कुळांत जी कुलदेवता चालू असेल त्या देवतेचा मंत्र मंत्रमहोदधी अथवा मंत्रमहार्णव , मेरुतंत्र इत्यादि ग्रंथांतून निवडून काढावा , किंवा कोणाकडून निवडून घ्यावा व मेरुतंत्रांतील विधीप्रमाणें विधि करून , तो मंत्र मंत्रदेवतेकडून आपणांला मिळाला अशी भावना करून मंत्रोपासना करावी . तो विधि असा आहे --

अथ तांत्रिकमंत्राणां दीक्षां श्रृणु गुरुं विना ।

शुक्लपक्षे त्रयोदश्यां चंद्रताराबलान्विते ॥

गत्वा च दक्षिणामूर्तेः सन्निधौ पूजयेच्च तम् ‌ ।

कलश -स्थापनं कृत्वा तदग्रे तु परिक्षिपेत् ‌ ॥

तालपत्रे लिखित्वाथा मंत्र -देवंच पूजयेत् ‌ ।

देवोगुरुरिति ध्यात्वा मंत्रं व्यक्तं तु वाचयेत् ‌ ।

अष्टोत्तरशतं चैव मंत्रग्रहणमुच्यते ।

एतत्तत्वं समाख्यातं गोप्यं मातरि जारवत् ‌ ॥

गुरौ लोभादयो दोषास्तस्मादुद्विजते जनः ॥

मेरूमंत्र

चंद्रताराबल पाहून त्र्योदशीदिंनी दक्षिणार्मूर्त ( शंकर ) मंदिरांत जाऊन किंवा जी जी उपास्य देवता असेल तिच्या मंदिरांत जाऊन षोडशोपचार पूजा करावी . अथवा श्रीज्ञानराज , श्रीसमर्थ यांची पूजा करून त्यांचेकडून मंत्र मिळाला , अशी भावना करावी . मंत्र ताडपत्रावर किंवा अश्वत्थपर्णावर लिहून त्याची पूजा करावी . नंतर सूर्यरूप पिंगला नाडीनें ( उजव्या नाकपुडीतून वाहाणार्‍या श्वासानें ) आपला वासनामय देह दग्ध झाला अशी भावना करावी व चंद्रामृतरूप डाव्या नाकपुडींतून वाहणार्‍या इडेनें अमृतवर्षाव करून देह पुनीत करावा . नंतर उपास्य देवतेचें गुरु म्हणून किंवा श्रीज्ञानराज अथवा श्रीसमर्थ यांचें नांव घेऊन तो मंत्र वाचावा , व मंत्र मिळाला अशी भावना करावी . या विधींत समोर माता , वडीलबंधु , पिता , गुरुबंधु अथवा धेनु असावी , असा विधि करून मंत्र घेतल्यानंतर पुढें जर उत्तम सद्‌गुरु भेटले तर स्वतः घेतलेला मंत्र गुरूकडून उजळून घ्यावा . हा मंत्र ग्रहणविधि गौण होय .

संप्रदाय सुरतरु ( श्रीगुलाबराव महाराज )

मंत्रग्रहण करून त्याचें अनुष्ठान करण्याचा हेतु ज्ञानप्राप्ति हा आहे . मंत्रोदित ज्ञानानें धर्म प्राप्त होतो , इष्टपदार्थ प्राप्त होतात , आणि शेवटीं गुरुकृपेनें विज्ञान प्राप्त झालें म्हणजे त्याच्या योगानें मोक्ष प्राप्त होतो . अशा ऐहिक व पारमार्थिक लाभाकरितांत साधक आपल्या इष्टदेवतेची आरावना करितो . आणि तपस्त्येचें व तदंगभूत भक्तीचें फळ ज्ञानच आहे , श्रीतुकाराममहाराज म्हणतात -"भक्ति ज्ञानाची माऊली , भक्तीपासून मुक्ति जहाली "

मधुलुब्‌धो यथा भृंगः पुष्पात् ‌ पुष्पांतरं व्रजेत् ‌ ।

ज्ञानलुब्‌धस्तथा शिष्यो गुरोगुर्वन्तर व्रजेत् ‌ ॥

मधूची इच्छा करणारा भ्रमर जसा एका पुष्पापासून दुसर्‍या पुष्पावर जातो त्याप्रमाणें ज्ञानलालसा असणार्‍या शिष्यानें एका गुरुपासून ज्ञान घेतल्यानंतर दुसर्‍या गुरूकडे जावें . शिष्याचें हत्तापहरण करणारे , शिष्यास सिद्धमंत्रविद्या देणारे फारच विरळा ." अज्ञानतिमिरांधस्य ( शिष्यस्य ) ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन स एव गुरुरुच्यते ," शिष्याचें अज्ञान घालवून त्यास तृतीय नेत्राचा अनुभव देणारा गुरूच खरा गुरु होय . व अशा गुरूजवळ राहून गुरुशुश्रूषया विद्या गुरूची सेवा करून विद्या म्हणजे ब्रह्यविद्या संपादन करावयास पाहिजे .

वरीलप्रमाणें गुरूची योग्यता सांगितली . त्या चप्रमाणें शिष्याची अथवा , साधकाची योग्यताही सांगितली पाहिजे . साधकानें ज्याप्रमाणें गुरूची परीक्षा करावी , तशीच गुरूनेंही साधकाची परीक्षा करावी . वशिष्ठ आणि याज्ञवल्क्याप्रमाणें गुरु पाहिजेत तर शिष्यही श्रीराजारामचंद्र आणि श्रीजनकाप्रमाणें पाहिजेत . पूर्ण संस्कारयुक्त तयार होऊन योग्य गुरूकडे जावें .

N/A

References : N/A
Last Updated : March 02, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP