मंत्रप्रकरण - कमला-मंत्र

" श्रद्धावान लभते फलं" म्हणजे श्रद्धालु पुरूषालाच मंत्रानुष्ठानाची यथोक्त फलप्राप्ति होते.


" श्री " ह्या एकाक्षरी मंत्राने कमला ( लक्ष्मी ) ची उपासना करावी. या मंत्राचा बारा लक्ष जप झाला म्हणजे एक पुरश्चरण होते. नंतर घृत, मधु व शर्करायुक्त बारा हजार पद्म अथवा तिलद्वारा होम करावा.

कमला - ध्यान

कान्त्या कांचनसन्निभां हिमगिरिप्रख्यैश्चतुर्भिर्गजैः।

हस्तोत्क्षिप्तहिरण्मयामृतघटौरासिच्यमानां श्रियम।

बिभ्राणां वरमब्जयुग्ममभयं हस्तैः किरीटोज्वलाम।

क्षौमाबद्धनितम्बबिंबललितां वंदेऽरविंदस्थिताम ॥१॥

भावार्थः -

सुवर्णाप्रमाणे जिची कांति आहे ; हिमालयादि चार दिग्गज आपल्या सोंडेने सुवर्णमय अमृताने भरलेल्या घटांनी जिला सिंचन करतात ; एका हातांत वर व एका हातांत अभय आणि दुसर्‍या दोन हातांत दोन कमले जिने धारण केलेली आहेत , मस्तकी किरीट व रेशमी वस्त्र परिधान करुन कमलासनावर स्थित असलेली जी कमला तिला माझा नमस्कार असो .

कमलास्तोत्र

इन्द्र उवाचः -

नमस्तेऽस्तु महामाये श्रीपाठे सुरपूजिते।

शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥

आद्यन्तरहिते देवि आद्यशक्तिमहेश्वरि।

योगजे योगसंभूते महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥१॥

स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्ति महोदरे।

महापापहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥२॥

नमस्ते गरुडारुढे कोलासुरभयंकरि।

सर्वपापहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥३॥

सर्वज्ञे सर्व वरदे सर्व दुष्ट भयंकरि।

सर्वदुःखहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥४॥

सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनी।

मन्त्रमूर्ति सदा देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥५॥

पद्मासनस्थिते देवि परब्रह्मरुपिणि।

परमेशि जगन्मातर्महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥६॥

श्वेतांबरधरे देवि नानालंकारभूषिते।

जगत्स्थिते जगन्मातर्महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥७॥

महालक्ष्म्यष्टकं स्तोत्रं यः पठेत भक्तिमान्नरः।

सर्व सिद्धिभवाप्नोति राज्यं प्राग्नोति सर्वदा ॥८॥

एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनम।

द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्यसमन्वितः ॥९॥

त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रुविनाशनम।

महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा ॥१०॥

तात्पर्यार्थः -

ह्या स्तवाचे नित्य एकवार पठण केले असतां महापाप नाश पावते . नित्य दोनदां पठन केले असतां महापाप नाश पावते . नित्य दोनदां पठन केल्यास धनधान्य विपुल असते ; नित्य तीन वेळां पठन केल्याने बलाढ्य शत्रूचा देखील पराभव होऊन श्री महालक्ष्मीही नित्य प्रसन्न होते ; तशीच ती मंगलकारक होऊन वरप्रदान देते .

कमला - कवच

र्‍हीँ बीजं मे सदा पातु कमला कमलालया।

हृदयं सततं पातु श्रींरुपा विष्णुरोहिनी।

मुखबिंब सदा पातु कर्णौ गंडौ च नासिकाम ॥

सर्वांग पातु मे देवी श्री लक्ष्मी प्रणवात्मिका।

दिग्विदिक्षु सदा पातु वाग्भवी सर्वसिद्धिदा ॥

कवचं धारयेद्यस्तु स भवेत्कमलासुतः।

इहलोके सुखं भुक्त्वा चांते निर्वाणमाप्नुयात ॥

तात्पर्यार्थः -

जो मनुष्य हे कवच धारण करतो , तो श्रीलक्ष्मीस पुत्राप्रमाणे अत्यंत प्रिय होतो ; आणि इहलोकी सुख भोगून अंती मोक्षपदाप्रत प्राप्त होतो . ( तंत्र नं . ३ व यंत्रप्रकरण पहा . )

श्रीलक्ष्मीचा अन्य मंत्र

ॐ र्‍हीँ श्रीं लक्ष्मीमहालक्ष्मी सर्वकामप्रदे सर्वसौभाग्यदायिनी अभीष्टार्थ प्रयच्छ सर्वे सर्वगते सुरुपे सर्वदुर्जयविमोचनि र्‍हीं सः स्वाहा .

विधि -

जो मनुष्य शुद्धचित्त होऊन एकाग्रतेने ह्या मंत्राचे जपद्वारां अनुष्ठान करितो , त्यास यथाभिलषति लक्ष्मीची प्राप्ति होते .

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP