* आरोग्यव्रत
एक काम्य व्रत. फाल्गुन अमावास्येस उपवास. वर्षप्रतिपदेच्या दिवशी सूर्यप्रतिमेची स्थापना व पूजा. सल्ल्की वृक्षाचा धूप व तुपाचा दिवा लावणे. ब्राह्मण भोजन झाल्यावर यजमानाने ग्रासमात्र अन्न भक्षण करणे. याप्रमाणे प्रत्येक शु. प्रतिपदेस करायचे असते. व्रतावधी एक वर्ष. नंतर उद्यापन. त्या प्रसंगी होम व सूर्यप्रतिमेचे दान करतात.
फल - आरोग्यलाभ व उत्तम गती.