घृतकंबलदान
हे व्रत माघ महिन्यातील कोणत्याही अष्टमीस वा चतुर्दशीस करतात. पांढर्या किंवा काळ्या गाईचे घट्ट तूप शिवलिंगावर माखणे व त्याचे दान देणे. दानाचा विधी - प्रथम संकल्प करून शिवाची पूजा करतात व शिवलिंगावर तूप थापतात. नंतर तीळ, मोहर्या, बेलाची पाने या वस्तू देवला वाहतात. शेवटी
'शिवाय नम:'
या मंत्राचा यथाशक्ती जप करतात. मग ते माखलेले तूप दान देतात. रात्री जागरण करतात. प्रात:काळी स्नान झाल्यावर पुनश्च शंकराची पूजा करून शिवभक्तांना भोजन घालतात. स्वत: भोजन करून व्रतसमाप्ती करतात.
फल - दारिद्र्यनाश, सुखोपभोगाची प्राप्ती व शिवलोकाची प्राप्ती.